सांगली जिल्ह्यातील प्रशासनाने शिक्षकांना दिली लाईव्ह वेबिनार मधून ऊर्जा
ऑनलाईन शिक्षण हे शिक्षक, पालक आणि मुले यांच्यासाठी हा एक आशेचा किरण आहे.
कोव्हीड -19 अर्थात कोरोनाने जगात धुमाकूळ घातला असून........ या विषाणूमुळे जग आणि भारताबरोबर, राज्यातील शाळा कधी सुरू होतील याचा आजतरी अंदाज कोणीही बांधू शकत नाही . 15 जूनला शासनाने शाळा सुरू होतील असं जाहीर केलं; पण शाळा सुरू करता आल्या नाहीत .त्यानंतर मात्र शासनाने 'शाळा बंद पण शिक्षण सुरू' ही घोषणा केली. शासनाने ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय समोर आणला. खरेतर एप्रिल पासूनच काही शाळांनी ऑनलाईन शिक्षण द्यायला सुरुवात केली होती. काही उत्साही शिक्षणाधिकाऱ्यांनी तर एप्रिल मध्येच पुढील वर्षाचे क्लास सुरु केले. त्या मानाने शासन पातळीवर ऑनलाईन शिक्षणाची तयारी अधिक दिसली नाही. जूनच्या शेवटी शासनाने आवाहन करून शिक्षकांना एक ऑनलाईन नावाचं व्यासपीठ निर्माण केलं आहे .ते म्हणजे 'शाळा बंद पण शिक्षण सुरु' या उपक्रमांतर्गत ऑनलाईन शिक्षणाचा .खरंतर ऑनलाईन शिक्षणाला प्रचंड मर्यादा असून देखील काही मंडळींनी ऑनलाईन शिक्षणाचा विडा उचलला आहे . मे मधील सर्व्हे नुसार ग्रामीण भागातील मुलांच्या घरी अँड्रॉइड फोन अथवा टीव्ही नाही. तरीदेखील ऑनलाईन शिक्षणाशिवाय आता इतका मोठा पर्याय सध्यातरी उपलब्ध नाही. मोठ्या प्रमाणात साधन सुविधा नसतानाही शासन ऑनलाईन शिक्षणाला समर्थन देत आहे. त्याचं करण असं की कोरोना कधी संपेल हे सांगता येत नाही. ऑनलाईन शिक्षण हा ठोस पर्याय नसला तरी भविष्याचा वेध मात्र नक्की आहे, हे आपल्याला सध्या मान्य करावे लागेल. काहीजणांच्या मते विद्यार्थ्यांचे एक वर्ष गेले याची खंत नाही, पण फेस टू फेस शिक्षण चांगले . बरोबर आहे - फेस टू फेस शिक्षण द्यायला अजून चार सहा महिने तरी शक्य नाही. त्यामुळे काही न करण्यापेक्षा नवीन आवाहन स्वीकारलेले चांगले .
शिक्षकांना कोणत्याही प्रकारचं टेक्नो प्रशिक्षण नसल्यामुळे थोडासा त्रास होत आहे. गणित-विज्ञान विषय तरी आपल्याला टीव्ही अथवा मोबाईलवर शिकावे लागणार आहेत .त्याची तयारी करावी लागणार आहे . शिक्षाकांना कॅमेऱ्यासमोर शिकवायची सवय नाही. मुलांच्यासमोर शिकवणे आणि कॅमेऱ्यासमोर शिकवणे यात फरक आहे . आपल्यासमोर मुलं नसताना शिक्षकांना हावभाव निर्माण करावे लागतात. त्यासाठी लेक्चर ची तयारी करणे, पीपीटी बनवणे, व्हिडीओ बनवणे .शिवाय तास तास मोबाइल समोर उभं राहणं थोडंस त्रासदायक ठरत आहे. सर्वच शिक्षक तंत्रस्नेही नसल्यामुळे शिक्षकांना तंत्रस्नेही शिक्षकांची मदत घ्यावी लागणार आहे. ऑनलाईन शिक्षणाला मर्यादा आहेतच; पण परिस्थिती बदलली नाही तरी ही पूर्वतयारी करणे चांगलेच आहे.
ऑनलाईन शिक्षणात बऱ्याच मर्यादा येतात, अडचणी आहेत. विद्यार्थ्यांना संकल्पना समजली की नाही हे शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या चेह-यावरून कळतं. इथे विद्यार्थ्यांचे चेहरे दिसत नाहीत. ऑनलाईन शिक्षणात शिक्षकांना अध्यापनाचे कोणत्याही प्रकारचे समाधान मिळत नाही. परंतु कंटेंट विद्यार्थ्यांपर्यंत पोचवणे गरजेचे आहे. शिक्षण म्हणजे क्रिया- प्रतिक्रिया हे मान्य. ऑनलाईन शिक्षण हे एक मार्गीच होतं. यात विद्यार्थांचा चटकन सहभाग आपण घेऊ शकत नाही.
ऑनलाईन शिक्षणात विद्यार्थ्यांचे बरेचसे हाल सुरू आहेत . विद्यार्थ्यांकडे स्वतःचे असे अँड्रॉईड मोबाईल नाहीत. त्यामुळे पालकांच्या मोबाईलवर अवलंबुन राहावे लागते. पालक जर घरी राहणारे नसतील तर अडचणी फारच मोठ्या प्रमाणावर जाणवतात . विद्यार्थी घरात शिकताना कॉन्सन्ट्रेट करून ऑनलाईन शिक्षण घेऊ शकत नाही. घरात टिव्ही, आजुबाजुचा आवाज, घरातील लहान मुले, घरातील कामे यामुळे लक्ष विचलीत होते. शिवाय भाऊ अथवा बहिणीचेही ऑनलाईन क्लास असतात. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरात अभ्यासाची स्वतंत्र खोली नाही. शिवाय पुरेल एवढं नेटडाटासुद्धा विद्यार्थ्यांकडे नाही. रेंजचा प्रॉब्लेम तर सार्वत्रिक आहे. शिवाय तासन् तास, काही न बोलता, एकचित्त छोट्याश्या मोबाईल स्क्रीन मध्ये डोकावणे विद्यार्थ्यांना अवघड जाईल. पाठ्यपुस्तक आणि ऑनलाईन शिक्षण याचा ताळमेळ शासन, प्रशासन,शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांना घालावा लागणार आहे .तरीही यावर उपाय म्हणून रेकॉर्डेड व्हिडीओज, सेव्हड फाईल्सच्या रुपात रेंज /डेटा नसलेल्या पालक आणि विद्यार्थी यांच्यापर्यंत पोचवता येतील. अथवा डाउनलोड टॅब देऊन डाउनलोड करून घेता येईल .
सद्यपरिस्थिती पाहता शिक्षक, पालक, विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणाच्या संदर्भात मनात शंका बाळगून आहेत. राज्यातील आश्रम शाळेतील मुले, भटक्या विमुक्त शाळेतील मुले, आदिवासी पाड्यातील मुले, आर्थिक दारिद्र्यरेषेखालील मुले ऑनलाइन शिक्षण घेण्यात अनेक अडचणी येत आहेत . शासनाला या मुलांना ऑनलाईन साधनं उपलब्ध करून द्यावी लागतील. तरीही प्रशासन, तज्ञ मंडळी आणि टेक्नो टीचर यांनी कंबर कसली आहे . याला शिक्षकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला पाहिजे .तर दर्जेदार साहित्य आपण पालक आणि विद्यार्थी यांच्यापर्यंत पोचवू शकू .
याचा पहिला प्रयत्न म्हणजे सांगली जिल्ह्यात दिनांक 29 जून 2020 ते 4 जुलै 2020 पर्यंत झालेले ऑनलाईन प्रशिक्षण अर्थात लाईव्ह वेबिनार . या वेबिनार मध्ये प्रशासन, अधिकारी आणि टेक्निशियन उत्सुक आहेत . मा. मुख्यकार्यकारी अधिकारी गुडेवार साहेब, मा . प्राथमिक शिक्षण अधिकारी वाखारे मॅडम , माध्यमिक शिक्षण अधिकारी आणि भुतडा साहेब तसेच सर्व संघटनांचे पदाधिकारी यांच्या सहकार्याने ऑनलाईन शिक्षण आपण कसं सोपं करू शकू या विषयी मार्गदर्शन केले . तसेच या वेबिनार मध्ये ऑनलाईन विद्यर्थ्यांपर्यंत कसं पोहोचायचं याचं टेक्निक शिक्षकांना दिलं जातंय . ई-मेल तयार करण्यापासून , युट्युब चॅनल कसा क्रिएट करायचा, व्हिडीओ कसे बनवायचे. एडिट कसे करायचे ? याबाबतीत सविस्तर माहिती वेबिनार मध्ये दिली जात आहे . यात सर्व संघटना ,प्रशासन , टेक्नो-शिक्षक, मुख्याध्यापक यांच्यासाहित सर्व शिक्षक सहभागी होताना दिसत आहेत.
प्रशिक्षणात काही भाग समाजाला नाही तर पुनःपुन्हा वेबिनार सेव्हड फाईल्स मधून पाहता येणार आहे . याद्वारे शिक्षकांना तयार व्हावे लागणार आहे . या प्रशिक्षणाने शिक्षकांना ऊर्जा मिळणार आहे .सर्वच शिक्षकांना सर्व विषयाचे कॅमेऱ्यासमोर प्रिप्रेशन करताना अडचणी येणार आहेत .त्यासाठी इयत्ता वाईज आणि विषय वाईज डिस्ट्रुबुशन करून व्हिडीओ तयार केले तर दर्जेदार आणि कमी वेळेत अधिकाधिक व्हिडीओ तयार होतील.
ही टेक्नो टीचर्सना एक पर्वणी आहे . सांगली जिल्ह्यातील एक अनोखा प्रयोग उद्याचा भविष्याचा वेध घेणारा आशेचा किरण नक्कीच आहे . याला महाराष्ट्रातील बोलीभाषेच्या अडचणी येतील ,पण विभाग वाईज नियोजन करून व्हिडीओ तयार करता येतील . तेव्हा ऑनलाईन साठी आपण साहित्य तयार करू शकू आणि कोरोना विरोधात शिक्षण चालू ठेऊ शकू, ही आशा आहे ............................!
#####################################
( हा लेख लिहिण्याचा उद्देश म्हणजे ऑनलाईन शिक्षण देण्यास सज्ज होण्याची एक ऊर्जा म्हणून आहे . या लेखात लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत . धन्यवाद ! )
🙏🙏🙏🙏🙏
इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
bhausahebmahanor.blogspot.com
ला भेट द्या./ ब्लॉगला फॉलो करा.
🙏🙏🙏🙏🙏
एखादा ब्लॉग आवडल्यास आपल्या मित्रांना whatsapp किंवा facebook द्वारे share करु शकता.
🙏🙏🙏🙏🙏
👌👌👌👌
ReplyDelete