माझे इतर लेख वाचण्यासाठी ब्लॉगच्या होम पेज वर कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शनला जा आणि आपल्या आवडीचा ब्लॉग वाचा. आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना whatsapp, facebook द्वारे शेअर करा. किंवा पेजची लिंक तुमच्या whatsapp ग्रुपला share करा.धन्यवाद.....!

Wednesday, April 08, 2020

जागतिक माणुसकीचे दर्शन -कोरोना लॉकडाऊन

कुठे लोपली माणुसकी ?
 कोरोनाबाधितावर प्रशासनाकडून अंत्यसंस्कार

 साताऱ्यात मृतदेह स्मशानभूमीपर्यंत नेण्यासह सरपण रचण्यापर्यंतची जबाबदारी पार पाडत प्रशासनाकडून माणुसकीचे दर्शन घडले .............
   
            एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याचे कुटुंबीय, नातेवाईक, शेजारी-पाजारी, मित्रमंडळी अगदी सारेजण त्याला शेवटचा निरोप देण्यासाठी एकत्र जमतात. पण, सोमवारी दि. 6 एप्रिल 2020 रोजी  साताऱ्यात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेनंतर माणसानं कुठेतरी माणुसकीलाच 'शेवटचा निरोप' दिलाय की काय, असे विदारक चित्र पाहायला मिळालं. साताऱ्यात आढळून  आलेल्या पहिल्या कोरोनाबाधित रुग्ण ,वय ६३ , आज सकाळी मृत्यू झाल्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करताना प्रशासनास मोठया  अडचणींना सामना करावा लागला. नातेवाईक, मित्रमंडळी तर सोडा; एरवी समाजसेवेच्या नावाखाली अन्नधान्याची दोन-चार पाकिटं वाटप केल्यानंतर 'फोटोसेशन' करण्यात मश्गुल असलेली मंडळीसुद्धा अशा दुःखद प्रसंगात मदतीसाठी पुढे आली नाहीत.

                     शेवटी प्रशासनानेच सरपण गोळा करत या रुग्णावर अंत्यसंस्कार केले आणि माणुसकी अजूनही जिवंत आहे, ती कधीच मरणार नाही, असा संदेश दिला. हा ६३ वर्षीय रुग्ण कोरोना बाधित असल्याने क्वारंटाईन करण्यात  आला होता.  मात्र त्याला १४ दिवसांसाठी क्वारंटाइन करण्यात आल्यानंतर  या कोरोनाबाधित रुग्णास जिल्हा शासकीय  रुग्णालयात विलगिकरण कक्षात उपचारासाठी ठेवण्यात आले होते. सदर व्यक्ती दक्षिण अमेरिकेतील कॅलिफोर्नियावरून प्रवास करून  आली होती. दुसऱ्यादिवशी   त्याचा अंतिम अहवाल येणार  होता, मात्र आज सकाळी त्याच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. या रुग्णाचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र धक्याने झाल्याचा प्राथमिक अंदाज त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी नोंदवला.

             दरम्यान, या रुग्णाच्या कुटुंबीयांना लॉकडाऊन           असल्याने इच्छा असूनही त्यांना  त्यांच्या अंतिम दर्शनास अथवा अंत्यसंस्कारास  जाता आले नाही. आता या रुग्णाच्या
अंत्यसंस्कार विधी करण्याची जबाबदारी प्रशासनावर पडली. त्याचा मृतदेह स्मशानभूमीत नेण्यासाठी रुग्णवाहिका  अथवा शववाहिनीची गरज होती .ओळखीची     रुग्णवाहिका उपलब्ध होती पण तिच्यातून  स्मशानपर्यंत  नेण्यास साऱ्यांनी  नकार दिला.  तर काही शववाहिनी चालकांनी आपापले मोबाईल स्विच  ऑफ करून ठेवले .

अखेर, वैकुंठ अंत्यसंस्कार संस्थेने हा मृतदेह वाहून नेण्यासाठी आपली शववाहिनी देण्याची तयारी दाखवली .
प्रशासनाच्या अथक  प्रयत्नानंतर   मृतदेह स्मशानभूमीपर्यंत  नेण्याची तयारी झाली. पण, त्याहीपेक्षा मोठं संकट प्रशासनावर येऊन ठेपले.

   आता वेळ  येऊन ठेपली होती ती अंत्यसंस्काराची.  संबंधित मृत व्यक्तीचा कुणीही नातेवाईक किंवा  व्यक्ती याप्रसंगी उपस्थित नसल्याने   हे काम प्रशासनाने हाती घेतले.

आम्ही तुम्हाला वाचवू शकलो नाही, पण अंत्यसंस्कार  तरी    करू शकलो अशी प्रतिक्रिया प्रशासनाने दिली.       
इथही प्रशासनच त्याचे नातेवाईक बनले आणि त्यांनीच अंत्यसंस्कार केले.
              गावातील स्मशानभूमीतच या कोरोनाबधित प्रेताचे     अंत्यसंस्कार होणार असल्याचे कळताच माहुली ग्रामस्थांनी  प्रेताजवळ विरोध केला. माणसाला माणूस आडवा झाला . फॉरेन रिटर्न माणसाला किती किंमत असते! पण आज सारं दूर होतं.   मात्र  प्रशासनाने शासकीय आदेश दाखवल्यानंतर ग्रामस्थांचा विरोध मावळला
       
            दरम्यान, हा अंत्यसंस्कार विधी आटोपल्यानंतर या अंत्यविधीच्या जागेची औषध फवारणी करून स्मशानभूमीचे संपूर्ण निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.
                 
             मृतदेहावर हा हृदयद्रावक प्रसंग पाहून यातून एक मात्र बोध सर्वांनी घेणे गरजेचे आहे. घरातच राहा. काहीही झाले तरी बाहेर पडू नका. कारण माणसाच्या मुळावर उठलेला कोरोना नावाचा राक्षस आपण कधी बाहेर येतोय याचीच वाट पाहतोय. आपली एक चूक आपल्याला घरातून थेट स्मशानभूमीची वाट दाखवू शकते. वरील प्रसंग पाहाता तो कुणाच्याही आयुष्यात असं घडू नये, एवढेच !
    आपण सर्वजण सूज्ञ आहोत .दररोज चार वेळा जेवत असाल तर तीनवेळा जेवा. जर तीनवेळा जेवत असू तर , लॉकडाऊन मध्ये दोनवेळा जेवा. कधीच उपवास केला नसेल तर आठवड्यातून एकदिवस उपवास करा.  अन्न धान्य टिकवून खा.  एकवेळचं जेवण हरवू ,पण जीवन हरवू नका..
       आज जगाच्या प्रगतीचं चाक थांबलंय.  सारी मानवजात धोक्यात आली असताना आपलं सामान्य माणसाचं दान कोणतं आहे ?
लॉक डाऊन राहणे आणि कर्फ्यु कायम ठेवणे.
 संयम ठेऊ या.आणि कोरोनाला हद्दपार करू या ..........



🙏🙏🙏🙏🙏
 इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
 bhausahebmahanor.blogspot.com
ला भेट द्या./ ब्लॉगला फॉलो करा ./subscribe करा ....
 🙏🙏🙏🙏🙏

🙏🙏share करण्या साठी निळ्या रंगामधील whatsapp किंवा facebook वर टच करा.🙏🙏

3 comments:

  1. खूपच छान लेख👌👌

    ReplyDelete
  2. मानवी मनाचं वास्तवदर्शन देणारा लेख आहे .कोरोना संकटाची भयानकता दिसून येते.😢👌

    ReplyDelete