आमचं गाव आमची परंपरा -किल्ले रामपूर
जत शहरापासून पश्चिमेला साधारण चार किमी अंतरावर, जत- सांगली रस्त्यापासून रामपूर फाटी वरून दक्षिणेला अर्धा पाऊण किमी अंतरावर किल्ले रामपूर हे गाव आहे.
गावची लोकसंख्या अडीच ते तीन हजार असेल . या महसुली गावामध्ये रामपूर मल्लाळ ग्रुप ग्रामपंचायत आहे. रामपूर गावात दक्षिणेला घाटगेवाडी आणि म्हारनुर वस्ती पश्चिमेला माळी वस्ती, उत्तरेला तुराईवस्ती, वायव्य दिशेला कोळेकर वस्ती ,साळे वस्ती हे भाग येतात. गडीच्या पायथ्याला जो गावभाग आहे त्यात रामोशी, होलार आणि हरिजन समाज राहतो. लिंगायत (माळी) समाज माळीवस्तीवर तर धनगर समाज कोळेकर वस्ती आणि तुराईवस्तीवर राहतो. प्रत्येक वस्तीवर प्राथमिक शाळा आहेत. तर मळीवस्ती वर प्राथमिक शाळे बरोबर आदर्श माध्यमिक विद्यामंदिर आहे. तेथेच पूर्वी खंडासरी हा छोटेखानी साखर कारखानाही माळीवस्तीवर होता. तुराईवस्ती वरील केवळ वीस पट असणारी शाळा विद्याधर गायकवाड सर आणि संगीता येडेकर मॅडमनी स्कॉलरशिप च्या मार्गदर्शनाच्या जोरावर चाळीस पटावर नेऊन ठेवली आहे.
सदर गावाला नाव ,शेजारी असलेल्या रामगड नावाच्या गडीवजा किल्ल्यावरून पडलेले आहे. रामगड हा किल्ला नसून गडी आहे. पूर्वी ही गडी डफळे संस्थान मध्ये होती. पुन्हा पुरातत्व कडून सध्या वनीकरण विभागाकडे आहे. आंबाबाईचा डोंगर आणि आडवा डोंगर यांच्या दरम्यान असलेल्या डोंगर रांगेतील मध्यंतरावर असलेल्या आणि डोंगर रांगेपासून अलग अशा टेकडीवर ही गडी आहे. ही गडी टेकडीच्या नैसर्गिक आकारावर बांधलेली आहे. गडीचा आकार ,आग्नेय कोपरा सोडून इंग्रजी L आकारात आहे. गडीला प्रवेशव्दार पूर्वाभिमुख असूना प्रवेशद्वारापासून पूर्वेला पाहिले तर एकदीड किमी अंतरावर हनुमान व दुर्गामाता म्हणजे मरीआई चे देऊळ आहे.
गडीचे प्रवेशद्वार मध्यम घडाई दगडात आहे. प्रवेशद्वाराची उत्तरबाजू ढासळलेली आहे. तरीही कमान अजून शाबूत आहे. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर नैऋत्य बाजूचे दोन बुरुज पडल्याचे अस्तित्व दाखवतात. त्याच्या आधी उत्तरेला वाट वळते .पश्चिम बाजूला दगडांचा ढीग पडलेला दिसतो ,ती घोड्यांची पागा होती असे स्थानिक लोक सांगतात. तिथून सरळ उत्तरेला पाहिलं की शिवमंदिर दिसते. सदर मंदिर हेमाडपंथी असून किल्ला सुमारे नऊशे ते हजार वर्षापूर्वीचा असावा . मंदिराच्या गाभाऱ्यात शिवलिंग आहे. सभामंडपाची पडझड झालेली आहे. मंदिराच्या बांधकामाचे दगड इतस्ततः पडलेले दिसतात. गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर गणपती कोरला आहे. शिवलिंग जमिनीच्या समपातळीत बसवलेले दिसते.
मात्र शिवलिंग वरील अभिषेकाचे पाणी पूर्वेला जाण्याची सोय केलेली आहे. मंदिर हे दक्षिणाभिमुख असून मंदिराच्या उर्वरित आवशेषाला आठरा कोने आहेत. गडीच्या पूर्वेला ढासळलेला परंतु गडी पेक्षा उंच बुरुज आहे. सदर बुरुजावर शिवसैनिक शिवजयंतीला भगवा फडकवतात.
गडावर सद्यस्थितीत घाण बाभळीचे साम्राज्य आहे.
गडावर पाणी साठवणीसाठी कोणतेही साधन नाही. टाके, विहीर अथवा हौद गडावर नाहीत. नैऋत्य पश्चिम बाजूकडून खाली उतरायला एकेरी पायरीची वाट आहे. गडीवरून उतरणारी ही वाट प्रथम एकेरी वाटणारी एक माणसाची असली तरी पुढे खाली पंचवीस तीस फूट रुंद होते. ही वाट गडीच्या पायथ्याला असणाऱ्या विहिरत जाते. ही वाट दोन्ही बाजूने बांधून काढलेल्या बंदिस्त आणि सुरक्षित मार्गाने खाली विहिरीत जाते. विहिरीला काहीजण भुयार म्हणतात. ते भुयार तिथून राजवाड्यात जाते असे सांगतात. पण ते भुयार नसून ती केवळ विहीर आहे. बंदिस्त आणि दोन्ही भिंती मधून बाजूने पायऱ्या असणारी ती विहीर आहे. खाली उतरण्याच्या वाटेवर दोन्ही बाजूंचे भिंती कोसळून दगडांचा भला मीठ ढीग पडलेला आहे. मध्यंतरी टप्यावर सपाट भाग असावा असे दिसते. विहिरीत उतरण्याच्या वाटेवर स्वयंपाकगृह, स्नानगृह आदी असावेत. गडीच्या पश्चिमेला शंभर मीटर लांबीचा दगडी तलाव बांधून काढलेला आहे. तलावातील आणि विहिरीतील पाण्याची पातळी समान राहावी अशी रचना केलेली आहे. विहीर आतून चौकोनी असून बाहेरून वर्तुळाकार बुरुजप्रमाणे आहे. सद्यस्थितीत विहिरीच्या भिंती आतील बाहेरील पडलेल्या आहेत.

गडीच्या प्रवेशद्वारासमोर एक पत्राशेड आहे, तो अलीकडील लोकांनी पीर म्हणून ठेवला आहे. पायथ्याला धान्याची कोठारे म्हणजे पेव होती ,आता त्यावर लोकांनी घरे बांधलेली आहेत. गडीच्या पायथ्याला रामोशी समाज आहे. त्यातील काहींना जमिनी मिळालेल्या आहेत,असे सांगतात. यावरून ही गडी या रामोशी लोकांच्या ताब्यात असावी असे दिसते. तर अलीकडे काहींनी जमिनी विकत घेतलेल्या आहेत.
गावाच्या दक्षिण बाजूला गौसिध्द मंदिर आहे. जत शहारातील पेठकरी, लिंगायत समाज देवाला येतो. वर्षातून एकदा श्रावण महिन्यात नैवद्य असतो .
गावाच्या दक्षिण बाजूला गौसिध्द मंदिर आहे. जत शहारातील पेठकरी, लिंगायत समाज देवाला येतो. वर्षातून एकदा श्रावण महिन्यात नैवद्य असतो .
गडीच्या पूर्वेला एकदीड किमी अंतरावर दुर्गामाता म्हणजे मरीमता चे मंदिर आहे. गावकऱ्यांनी त्याची स्थापना आता गावात केली आहे. वर्षातून तीनवेळा दुर्गामातेला नैवेद्य करतात. पाडव्याच्या आधी येणाऱ्या शुक्रवारी खारा नैवद्य असतो. म्हणजे देवीला बोकड कपतात. त्या आधीच्या शुक्रवारी पालखी हल्ल्याळ तालुका अथणी येथे नदीवर पालखी धुण्यासाठी खांद्यावर घेऊन जातात. सोमवारी नदीवर मुक्काम असतो. मंगळवारी पहाटे पालखी धुवून काढतात. मंगळवारी रात्री पालखी पार्धनहळ्ळी (ता-अथणी) येथे मुक्कामाला असते,तर बुधवारी रात्री साळमळगेवाडीत तर गुरुवारी रात्री पालखी रामपूर मध्ये येते. शुक्रवारी दिवसभर देवीची यात्रा असते. हा पालखी उत्सव होलर समाज व मातंग समाज करतो. देवीला आषाढ महिन्यात आकाडी करतात तर नवरात्रात गोडवा नैवद्य असतो.
माळीवडीत लिंगायत समाज बस्सवेश्वर जयंती साजरी करतात तर रामोशी समाज शिवजयंती साजरी करतात. शिवजयंतीला गडावर रंगीत विद्युत रोषणाई ,रांगोळी आणि सजावट करतात. गावातील हरिजन समाजातील सुशिक्षित तरुण मंडळ एकत्र येऊन गेली सात आठ वर्षे
आंबेडकर जयंती साजरी करतात. आंबेडकर जयंती उत्सवामध्ये सलग तीन दिवस समाजप्रबोधन म्हणून व्याख्यानमाला आयोजित केली जाते.
आज समाज बदलेला आहे. विचार बदललेले आहेत. आता गावाने विचार बदलायला हवेत. समाज उपयुक्त उत्सव सर्वांनी एकत्र येऊन साजरे केले पाहिजेत.
परंतु गावपातळीवर थोर पुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी किंवा उत्सव एकत्र येऊन करायला हवेत. तसेच
वनीकरण विभागाने गडीवर आणि भोवताली हाय डेन्सीटी वृक्षारोपण करणे गरजेचे आहे. बदलत्या काळात सर्वांनी एकत्र येऊन बदलायला हवे. अशी अपेक्षा सर्वांनी बाळगायला हवी.

(या लेखाचा उद्देश अंधश्रद्धा पसरविणे किंवा कोणत्याही जाती अगर धर्माचा प्रसार तसेच विशिष्ट लोकांप्रती आकस नसून , गावच्या परंपरा समाजासमोर ठेवणे हा आहे.)
इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
bhausahebmahanor.blogspot.com
ला भेट द्या./ ब्लॉगला फॉलो करा ./subscribe करा ....
🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏share करण्या साठी निळ्या रंगामधील whatsapp किंवा facebook वर टच करा.🙏🙏
उत्कृष्ट लेखन, छान माहिती.
ReplyDeleteहोय सर बरोबर आहे.पण समाज एकत्र येत नाही. त्या साठी नेते मंडळी यांनी पुढाकार घ्यावा.
ReplyDeleteसर छान माहिती टाकली आहे
ReplyDelete