माझे इतर लेख वाचण्यासाठी ब्लॉगच्या होम पेज वर कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शनला जा आणि आपल्या आवडीचा ब्लॉग वाचा. आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना whatsapp, facebook द्वारे शेअर करा. किंवा पेजची लिंक तुमच्या whatsapp ग्रुपला share करा.धन्यवाद.....!

Sunday, April 26, 2020

आगड्यात पगडं

आगड्यात पगडं

आगड्यात पगडं
गड्याचं रुमनं
गडी गेला येसी
दोन पाय तासी
तास तास वाण्या
वाण्याचं पॉर
पाळतंय म्हार
म्हाराची मुळी
पळातूय कोळी
कोळ्याचा भांग
सटव्या मांग
साटव्या मांगाच्या
गुरात टिक्का रेडा
पाटलाच्या गुरात
गुलाबी रेडा
आली वरसाची दिवाळी
सोन्या रूपानं ववाळी

खडकावरचं बेलं
खडकावरचं बेलं
प्वार पाणी पेलं
पोरा पोरा हुकी
चांद चांद चुकी
चांदावरली भिंगरी
आठ पाय नांगरी
नांगुर सरला
गोठा भरला
गय गोमटी
हारान शिंगटी
दे गं म्हातारी
खोबऱ्याची वाटी
न्हायतर घालीन
कुबडात काटी

का काकू का काकू

का काकू का काकू
कुंच्या बैलाला
घालू जू ,घालू जू
रतन्या  बैलाला
घालू जू,घालू जू
रतन्या बैल
 गुणाचा गुणाचा
पाठीवर सजलाय
फुलाचा फुलाचा
फूल फूल
 देव्रषी देव्रषी
देवरशाचा
घोडा घोडा
घोडा गेला
 करंजाडी करंजाडी
करंजाडीनं दिला
मार मार
गुराख्या पोराला
आला राग, राग
रागात मारला
वाघ वाघ
आडी पीडी जाऊ दे
बळीचं राज इऊ दे

No comments:

Post a Comment