चांगल्या संतती पेक्षा चांगली संपत्ती मिळवणे सोपेअसते
असं म्हंटलं जातं की,
पुत्र व्हावा ऐसा गुंडा ,त्याचा तिन्ही लोकी झेंडा ।
म्हणजे आपली संतती अशी असावी की त्याचा तिन्ही लोकांमध्ये म्हणजे पृथ्वी ,स्वर्गआणि पाताळ कुठेही गेला तरी विजय व्हायला हवा . अनेक दिवसातून आपले आप्तेष्ट,मित्र सहकारी भेटले तर आपल्या संपत्तीचं कौतुक करतात , त्यानंतर मात्र मुलं बाळं कशी आहेत ?चांगली की वाईट , कमावतात की चंगळवादी आहेत ? चांगल्या मार्गाला आहेत की कुमार्गाला आहेत ? याची चौकशी होते.
आपण किती संपत्तीं कमावली आहे त्याचबरोबर त्या संपत्तीचा वारसदार कसा आहे हे ही पाहिले जाते.......
वेलीला फूल आल्याशिवाय वेलीला महत्व नसते, ते वेलीचं यश असते ,तसेच माणसाच्या जीवनात आपली संतती योग्य मार्गावर असणे हे महत्वाचे आहे .
केवळ चांगल्या विचाराने माणसाचे पोट भरत नाही . त्यासाठी आहार घ्यावा लागतो . पण घेत असलेने आहार कितपत योग्य आहे ? हे कळण्यासाठी मात्र चांगले विचार असावे लागतात. माणसाला जगण्यासाठी पैसा लागतो,पण पैसा कमवताना आपली संतती हरवू नये. हे मोठे अपयश आहे. देवाला आपण पैसा मागितला अन देवाने पैसा देऊन अक्कल दिली नाही तर पैसा काही कामाचा ठरू शकत नाही. अष्टपुत्र नव्हे तर इष्टपुत्र सौभाग्यवती हो असा अशीर्वाद दिला जातो. आज T V व वर्तमानपत्र यामध्ये टिन एज्ड मुलांच्या सुसाईड होताना दिसतात. यामध्ये गरीब कुटुंबातील मुलांपेक्षा कमी वेळेत पैसे कमवणाऱ्या आणि श्रीमंत कुटुंबातील मुलांची संख्या अधिक आहे. आपलं वैभव पाहून एखाद्याने प्रश्न विचारला ,की मुलं काय करतात ? या प्रश्नाला आपण निरुत्तरीत होत असू तर आपले वैभव हे यश नाही.
स्वदेशे पुज्यते राजा ,
विद्वान सर्वत्र पुज्यते ।
विद्वत्ता ही राजमुकुटापेक्षा ही श्रेष्ठ आहे . राजदरबारी देखील रा
इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
bhausahebmahanor.blogspot.com
ला भेट द्या. / ब्लॉगला फॉलो करा ./ subscribe करा .
🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏share करण्या साठी निळ्या रंगामधील whatsapp किंवा facebook वर टच करा.🙏🙏
todays reality sir
ReplyDelete