अजून आपल्याला भरपूर शिकायचं आहे !
शिक्षणाने माणूस शहाणा होतो हे मी ऐकलंय , पण पाहिलं नाही . याचं कारण असं, शिक्षणाने माणूस हुशार होतो ठीक आहे पण शहाणा होईल की नाही ही शंका आहे . अदिम मानावापसून माणसाच्या प्रगतीचा विचार केला तर ,माणसाची प्रगती केवळ शिकण्यावर झालेली आहे . काहीही झालं तर शिक्षणाने माणूस हुशार होईल पण शहाणा होईल की नाही सांगता येत नाही ..........
परवा महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा उफाळून आला. याचे पडसाद , या गोष्टींची मजल मुख्यमंत्र्यांचे पुतळे जाळण्यापर्यंत गेली. ज्ञान, प्रेम व दया यांना भाषा,देश व धर्म यांच्या सीमे पलीकडे माणुसकी असते.पण कारभाऱ्यांनी एकमेकांना गोळी घालण्याची भाषा केली तर सामान्य माणसांनी काय बोध घ्यायचा ?
खरं तर धर्म ही अफूची गोळी आहे.... एकदा का भिनले , शरीरात, मेंदूत .तरी त्याची पुन्हा सुटका नाही . जगातील बहुतेक धर्म दया,प्रेम व माणुसकी ही मूल्ये शिकवतात. तरीही माणसं आपापसात का भांडतात हे कळत नाही. श्रेयवाद , हट्ट, वर्चस्व हा स्वार्थ मनाच्या तळाशी अजूनही आमच्यात आहेत. भारत माता अखंड राहावी म्हणून अनेक जणांनी प्रयत्न केले. शिक्षणाचा योग्य प्रकारे प्रसार करता यावा आणि स्थानिक प्रशासन व्यवस्थित चालावे म्हणून भारतात भाषावार प्रांत रचना झाली . मराठी असो की कन्नड ,ज्या प्रदेशात जी भाषा बोलली जाते तो भाग सलग भाषा प्रांताला जोडायला हवा. त्या त्या भाषिक लोकांना आपले स्वातंत्र्य आबाधित राखता आले पाहिजे. घटनेनी दिलेले हक्क जनतेला मिळाले पाहिजेत.
महाराष्ट्रात अगर कर्नाटकात जाळपोळ ,दंगल झाली तरी सीमाभागातील नागरिकांचे व्यवहार हे द्वि भाषेतून चालणार , हे नाकारता येणार नाही. सीमा भागातील नागरिक एकमेकांना विरोध करतात का ? मग हा नेमका विरोध कोणाचा ? न्यायालयाने दिलेल्या निकालाचा आपण मान राखतो का ? प्रत्येक राज्याने आपल्या राज्यात इतर भाषिक जनतेला सक्तीने राज्याची भाषा शिकायला लावणे / लादणे हे केव्हाही अन्यायकारक आहे.
बेळगावचा प्रश्न न्यायालयीन असताना ,कर्नाटक सरकारने बेळगावला उपराजधानी म्हणून घोषित केले .तसेच विधान भवन बांधले, मराठी फलक सक्तीने काढणे ,मराठी फलक काढून जाळणे , गावांची नावे बदलणे . हे योग्य नाही. दोन्ही राज्यांना संस्कृत, हिंदी ,इंग्लिश या भाषा चालतात मग मराठीला कन्नड आणि कन्नड ला मराठी का चालू नये. शिकणाऱ्या लहान मुलांनी कोणता बोध घ्यायचा ?
राज्याच्या देसशाच्या सीमा ओलांडून परदेशात जाऊन परकीय भाषा शिकतो. मग कन्नड- मराठी असा भेद का ? माणुसकीचा संदेश देणारे सर्वच संप्रदाय आहेत , पण युद्ध कोणालाही थांबवता आले नाही अथवा टाळता आले नाही.
जिथं गणित, विज्ञान ,भूगोल यातील शोध प्रमाण मानले जातात .तेव्हा आपण त्या संशोधकाची भाषा आपण पाहत नाही . सीमाभागात दळणवळण कशी होते, व्यवहार कसे चालतात . याचा विचार समाज व्यवस्था आणि मानव विकास या पातळीवर व्हायला हवा .
प्रत्येक गावाचे नाव त्याचा इतिहास सांगते. बेळगाव हे अस्सल मराठी नाव आहे, हे कन्नड भाषा शास्त्रज्ञांना देखील माहीत आहे. कन्नड भाषेमध्ये गावासाठी 'उरु' असा प्रत्यय असतो. मराठी मध्ये ' गाव ' हा प्रत्यय असतो . कर्नाटक सरकारने बेळगाव चे बेळगावी हे नाव बदलून काय साध्य केले? कन्नड भाग आहे हे दाखवण्याचा अट्टाहास ना ?
सीमावाद म्हणजे अश्म युगातील टोळी युद्धासारखे आहे. आपल्याला गुण्यागोविंदाने रहायचे झाले तर ,अजून आपल्याला माणुसकीचे भरपूर धडे शिकावे लागणार आहेत .
_____________________________________________
🙏 🙏🙏🙏🙏
इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
bhausahebmahanor.blogspot.com
ला भेट द्या. / ब्लॉगला फॉलो करा ./ subscribe करा .
🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏share करण्या साठी निळ्या रंगामधील whatsapp किंवा facebook वर टच करा.🙏🙏

No comments:
Post a Comment