माझे इतर लेख वाचण्यासाठी ब्लॉगच्या होम पेज वर कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शनला जा आणि आपल्या आवडीचा ब्लॉग वाचा. आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना whatsapp, facebook द्वारे शेअर करा. किंवा पेजची लिंक तुमच्या whatsapp ग्रुपला share करा.धन्यवाद.....!

Tuesday, August 06, 2024

आमचं गाव आमची परंपरा- अमृतवाडी

 आमचं गाव आमची परंपरा- अमृतवाडी

एकही मुस्लिम व्यक्ती  नसलेल्या अमृतवाडीत साजरा होतो मोहरम


 जतपासून पाच किलोमीटरवरील अमृतवाडीत एकही मुस्लिम बांधव नसताना मोहरम सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पंधराशे लोकसंख्या व सात सदस्य असलेल्या या गावाच्या पार्वती बयाजी पडळकर या - महिला सरपंच आहेत. गावात सर्वात जाती-धर्माचे लोक मोहरमनिमित्त एकत्रित येतात. माजी सरपंच विठ्ठल पवार, धोंडाप्पा व्हनवाडे, बसाप्पा बेडगे, तानाजी पवार तसेच चंद्रकांत निलजगी इत्यादी प्रमुख मंडळी एकत्रित येऊन मोहरम सण उत्साहात साजरा करतात. येथे मोहरम सणानिमित्त पंजे बसवण्याची परंपरा आहे. एकही व्यक्ती मुस्लिम नसलेल्या या गावात पंजांची स्थापना करण्यासाठी ग्रामस्थांनी मशीद  देखील बांधली आहे. सलग दहा दिवस गावात मोठा उत्सव साजरा केला जातो. या सणानिमित्त ग्रामस्थ कुदळ पडल्यापासून ते देव पाण्याला जाईपर्यंत दहा दिवस एकत्रित येतात.

No comments:

Post a Comment