माझे इतर लेख वाचण्यासाठी ब्लॉगच्या होम पेज वर कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शनला जा आणि आपल्या आवडीचा ब्लॉग वाचा. आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना whatsapp, facebook द्वारे शेअर करा. किंवा पेजची लिंक तुमच्या whatsapp ग्रुपला share करा.धन्यवाद.....!

Saturday, March 30, 2024

आसंगी(जत)शाळेची भरारी

 जत तालुका  जनरल चॅम्पियनशिप मिळवण्यात आसंगी(जत)शाळेचा सिंहाचा वाटा.

जि. प.शाळांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये आसंगी(जत)शाळेची भरारी


जत प्रतिनिधी :  सन 2023/24 या  शैक्षणिक वर्षातील जिल्हा परिषद शाळांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा दिनांक 27 व 28 मार्च 2024 रोजी नव कृष्णा व्हॅली पब्लिक स्कूल कुपवाड, ता.- मिरज, जि.- सांगली. येथे मोठ्या उत्साहात पार पडल्या. या क्रीडा स्पर्धांमध्ये जत तालुक्यातील खेळाडूंनी जास्तीत जास्त इव्हेंटमध्ये आपल्या कामगिरीची चुणूक दाखवून जिल्ह्यातील जनरल चॅम्पियनशिप अर्थात सर्वसाधारण विजेतेपद जत कडे खेचून आणले. जानेवारीपासून लांबणीवर पडलेल्या क्रीडा स्पर्धा अखेर 27 व 28 मार्च 2024 रोजी नव कृष्णा व्हॅली कुपवाड स्कुलच्या मैदानावर  मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडल्या. या क्रीडा स्पर्धेचे नियोजन सांगली जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी मा. श्री मोहनराव गायकवाड साहेब आणि जिल्हा परिषद सांगली च्या सीईओ मा. तृप्ती धोडमिसे मॅडम यांनी  हिरीरीने आणि नेटके नियोजन करून तीन दिवस चालणाऱ्या क्रीडा स्पर्धा दोन दिवसात पार पाडून दाखवल्या. उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन सकाळी साडेसात ते साडेदहा व सायंकाळी चार ते साडेसहा या वेळेत विद्यार्थ्यांच्या मनावर आणि शरीरावर कोणतेही दडपण न आणता अगदी आनंदी आणि उत्साही वातावरणात पार पाडण्यात सांगली जिल्हा परिषद ची टीम यशस्वी झाली आहे.

जिल्हा परिषद शाळेत शिकणारे सर्वच विद्यार्थी हे स्कुल गेम्स मध्ये सहभागी होत नाहीत ,अशा खेळाडूंना आपल्या हक्काचे मैदान आणि खेळाचे कौशल्य दाखवण्यासाठी तसेच खेळाची प्रेरणा उत्पन्न होण्यासाठी सांगली जिल्हा परिषद या स्पर्धांचे आयोजन गेली अनेक वर्षे करीत आहे.

            या स्पर्धेमध्ये लांब उडी,  गोळाफेक व धावणे  हे वैयक्तिक  खेळ प्रकार आणि  कबड्डी, खो-खो,रिले हे सांघिक खेळ प्रकार घेण्यात आले. यामध्ये लहान गट इयत्ता 1 ते 4  व इयत्ता सहावी ते आठवी चा मोठा गट,  मुले  व मुली अशा चार गटांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. क्रीडा स्पर्धेचे नियोजन जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी मा. गायकवाड साहेब यांनी पिन पॉईंटेंड आणि मायक्रो प्लॅनिंग करून या स्पर्धा पार पाडण्यात  यशस्वी झाले. सकाळी साडेसात वाजता जत, शिराळा, कडेगाव व आटपाडी  पासून लांबून येणाऱ्या खेळाडूंचे आणि त्यांना प्रशिक्षण देणार्‍या शिक्षकांची जेवणाची सोय उत्तम प्रकारे केली गेली. सकाळी नाश्ता केळी, दुपारी जेवण सायंकाळचे जेवण हे पहिल्या दिवशी तर दुसऱ्या दिवशी देखील केळी व जेवण अशा प्रकारची जिल्हा परिषदेकडून सोय उत्तम प्रकारे सोय करण्यात आली  होती. जेवणाची सोय केल्यामुळे खेळाडूंमध्ये एक चांगले आनंदाचे वातावरण पसरले होते.प्रत्येक वर्षी प्रमाणे या ही वर्षी रेफरी, पंच हे असोसिएशन आणि महानगरपालिका क्षेत्रातील शिक्षक यांची नियुक्ती करण्यात आली होती. आरोग्य खात्याचे कर्मचारी त्यांची टीम  आणि सर्व सहकारी यंत्रणा यांचे सहकार्य लाभले. मागील वर्षापर्यंत तीन दिवस  चालणाऱ्या क्रीडा स्पर्धा चालू वर्षी मात्र केवळ दोन दिवसात आणि त्याही कोणताही दंगा , गोंधळ ,  गडबड, अति घाई असं न होता या स्पर्धा निकोप, उत्साही आणि आनंदाच्या वातावरणात पार पडल्या. जिल्ह्यातील सर्व ग.शि.अ., विस्तार अधिकारी, क्रीडा समिती,  स्पर्धांचे रेकॉर्ड मेंटेन करणारी प्रशासकीय यंत्रणा, सर्व संघटनांचे पदाधिकारी , केंद्रप्रमुख , सहभागी शाळा आणि कोच (प्रशिक्षक शिक्षक)  यांची झूम मिटिंग घेऊन नियोजन करण्यात आले.

        खेळाडूंनी आपलं कौशल्य एकदम उत्तम प्रकारे दाखवले. मिरज विरुद्ध  तासगाव कबड्डीचे दोन सामने आणि घोलेश्वर(जत) विरुद्ध वाळवा आणि जत विरुद्ध मिरज हे खो-खो चे  सामने अक्षरशः  प्रेक्षणीय आणि रोमहर्षक ठरले. दोन दोन वेळा टाय होऊन देखील हे सामने खेळाडूंनी खिलाडूवृत्तीने  विजय मिळवला. 

स्पर्धांचे नियोजन अतिशय उत्कृष्ट आणि नेटके केल्यामुळे वेळेनुसार स्पर्धा पार पडल्या.  यामध्ये ध्वनी, स्टेज, पाणी ,आरोग्य सेवा, मैदान पुरवणारी शाळा, त्याचबरोबर क्रीडांगण व्यवस्था तसेच क्रीडांगणावरील पंच, सरपंच, वेळाधिकारी,  सामनाधिकारी त्याचबरोबर प्रत्येक विभागाचे सामना प्रमुख यांनी उत्साहाने आणि अतिशय प्रामाणिकपणे काम करून या स्पर्धा चालू वर्षी एकदम उत्साहाच्या वातावरणात पार पडण्यात जिल्हा परिषद सांगली यशस्वी झाली. 

          या स्पर्धेमध्ये जत तालुक्यातील विद्यार्थ्यांनी जत तालुक्यात पाण्याचा दुष्काळ असला तरी विद्येचा आणि खेळाचा दुष्काळ अजिबात नाही हे गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी दाखवून दिले.  गेल्या वर्षी जनरल चॅम्पियनशिपमध्ये जत द्वितीय क्रमांक वर होता तर चालू वर्षी या क्रीडा स्पर्धा मध्ये जत तालुक्याला प्रथम सर्वसाधारण विजेतेपद अर्थात जनरल चॅम्पियनशिप  आणि तीही  अनेक गुणांच्या फरकाने खेचून आणण्यात आसंगी (जत)शाळेचे  खेळाडू आणि क्रीडा शिक्षक, मुख्याध्यापक यांचा सिंहाचा वाटा आहे. ही  वैशिष्ट्यपूर्ण बाब लक्षात घेण्याजोगी आहे. या सर्व खेळाडूंना जत तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी मा. अन्सार शेख साहेब  यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचबरोबर पंचायत समितीचे सर्व विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक त्याचबरोबर विविध खेळाडूंना मार्गदर्शन करणारे त्यांचे प्रशिक्षक /कोच या सर्वांच्या सहकार्याने  हा विजय खेचून आणला. शेवटी जत तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी शेख साहेब आपले मत व्यक्त करताना म्हणाले की, सैन्य लढते आणि विजय मात्र सेनापती किंवा राजाचा होतो. मी केवळ गटाचा प्रमुख आहे.प्रत्यक्ष खेळाडूंनी आपले कौशल्य पणाला लावले आहे. जनरल विजेतेपदाचा  हा चषक ज्या सर्व खेळाडूंनी जिंकून आणला त्या सर्वांना मी हा चषक अंतःकरणपूर्वक अर्पण करत आहे.


जनरल चॅम्पियनशिपचे मानकरी 


जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये जत तालुक्याची दणदणीत सुरुवात....

दिनांक 27 /03/2024 रोजीचा परफॉर्मन्स..

 १)लांब उडी मोठा गट मुले-  प्रथम क्रमांक जिल्हा परिषद शाळा बाज 

२)लांब उडी मोठा गट मुली-  प्रथम क्रमांक जिल्हा परिषद शाळा असंगी (जत )

३)गोळा फेक मोठा गट मुली -  प्रथम क्रमांक जिल्हा परिषद शाळा काराजनगी 

४)गोळा फेक लहान गट मुली - प्रथम क्रमांक जि प शाळा घाटगेवाडी 

५)गोळा फेक मोठा गट मुले -  तृतीय क्रमांक जि प शाळा शिंगणापूर 

६)लांब उडी लहान गट मुले  - द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद कन्नड शाळा उमराणी

७)लांब उडी लहान गट मुली - प्रथम क्रमांक जि प शाळा मिरवाड


सांगली जिल्हा परिषद क्रीडास्पर्धा 2023-24

जत तालुका दिनांक 28/03/2024  दुसऱ्या दिवसाचा परफॉर्मन्स......!

(1) लहान गट मुले 50 मीटर-  सोरडी दुसरा क्रमांक   

(2) लहान गट मुली 50 मीटर-  रावळगुंडवाडी प्रथम क्रमांक

(3)लहान गट मुली 50 मीटर- मिरवाड द्वितीय क्रमांक 

(4) मोठा गट मुले 100 मीटर- जाडर बबलाद द्वितीय क्रमांक (5)मोठा गट मुली 100 मीटर आसंगी (जत) प्रथम क्रमांक 

(6) मोठा गट मुली 100 मीटर  - उंटवाडी द्वितीय क्रमांक 

(7) लहान गट मुली 100 मीटर - रावळगुंडवाडी प्रथम क्रमांक

(8) मोठा गट मुली 400 मीटर - आसंगी (जत) प्रथम क्रमांक 

(9) रिले लहान गट मुले - सोरडी ,तृतीय क्रमांक 

(10) मोठा गट मुली रिले  - आसंगी जत ,द्वितीय क्रमांक 

(11) कबड्डी लहान गट मुली -  प्रथम क्रमांक जालिहाळ(खु)

(12) खो खो मोठा गट मुले - घोलेश्वर, द्वितीय क्रमांक

(13) खो खो मोठा गट मुली - काराजनगी, द्वितीय क्रमांक


स्पर्धेचा निकाल पाहता, आसंगी(जत)शाळेने उत्कृष्ट कामगिरी करून खेळाचे प्रदर्शन केले.





No comments:

Post a Comment