माझे इतर लेख वाचण्यासाठी ब्लॉगच्या होम पेज वर कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शनला जा आणि आपल्या आवडीचा ब्लॉग वाचा. आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना whatsapp, facebook द्वारे शेअर करा. किंवा पेजची लिंक तुमच्या whatsapp ग्रुपला share करा.धन्यवाद.....!

Thursday, April 28, 2022

सेवानिवृत्ती एका शिक्षकांची

 श्री आण्णाराव रुद्राप्पा  पाटील सर यांच्या 

सेवानिवृत्ती निमित्त



श्री आण्णाराव  पाटील सर , (सनमडी )

हे  एक मनमिळावू ,विद्यार्थीप्रिय ,समाजप्रिय ,आणि उपक्रमशील शिक्षक असून त्यांना अद्याप पर्यंत अध्ययनाची आणि अध्यापनाची अत्यंत रुची होती. आणि त्यांनी ती टिकवून ठेवली.

प्रत्येक शाळेमध्ये पाटील सरांनी वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. मराठी , गणित या विषयांच्या बरोबर पात्र पदवीधर शिक्षक  म्हणून त्यांनी इंग्लिश या विषयाचे अध्यापन देखील उत्कृष्ट पद्धतीने केले आहे. इंग्रजी अध्यापनात त्यांचे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम शाळेत राबवले गेले.  तसेच त्यांचे काही इंग्रजी  कृती संशोधनपर लेख प्रसिद्ध आहेत. पाटील सरांचे  हे उपक्रम संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबवले गेले आहेत.  इंग्रजी भाषेत त्यांचा हातखंडा होता आणि अजूनही आहे. शिकवणे हे  एक केवळ सोपवलेले किंवा लादलेले  काम नसून ही एक कला आहे आणि ती कला विद्यार्थीप्रिय विद्यार्थ्यांना रुचेल समजेल अशा भाषेत, सोप्या  पद्धतीने समजावून देण्याचा त्यांचा नेहमी अट्टाहासअसतो.  

           पाटील सरांच्या नोकरीची सुरुवात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नरळेवाडी येथून झाली. आज 31 मे 2022  रोजी  त्यांची सेवानिवृत्ती जिल्हा परिषद प्राथमिक मॉडेल स्कुल, काराजनगी या शाळेतून होत आहे. 

सरांची अखंड नेमणूक तारीख 18/3/ 1989 जि. प. शाळा नरळेवाडी  येथे सहाय्यक शिक्षक म्हणून झाली.
20 /1/ 1998  रोजी   पात्र पदवीधर  शिक्षक, बेवनुर शाळा, 1/ 6/ 1998 काराजनगी शाळा, 
2004 निगडी खुर्द तालुका जत जिल्हा सांगली .
26/ 6 /2012 निगडी, तालुका-  शिराळा . 29/  5 / 2018 कोळगीरी, तालुका जत  20 /9/ 2019 काराजनगी  शाळेत वरिष्ठ मुख्याध्यापक म्हणून  सेवा केली.

त्यांच्या सेवाकाळात सन 1998 साली  जत तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार ( पं.स.जत) ,  2008 साली सांगली जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार( जि प सांगली ) 2018चा सी.आर.  सांगलीकर फाउंडेशन पुरस्कार . आणि 2019 साली पाणी फाउंडेशन सनमडी  चा जलमित्र पुरस्कार. असे पुरस्कार देऊन  सरांच्या कामानिमित्त  गौरव केला आहे . 
शिक्षकांच्या प्रश्नांसाठी कायम झटत त्यांनी उदार मनाने सेवा केली . पात्र पदवीधर आणि केंद्रप्रमुख सभा संघटने मध्ये राहूनच सरांनी कामे केली . यात काम करत असताना शिक्षक विकास पतसंस्थेचे चेअरमनही झाले.  आणि   आज   विद्यमान संचालक आहेेेत .

 तेहतीस वर्षाच्या अखंड सेवा काळात पाटील सरांचे अनेक विद्यार्थी उच्च पदावर पोहोचलेले आहेत. स्कॉलरशिप परीक्षा बद्दल मार्गदर्शन, विविध स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन आणि नियमित इंग्रजीचे  विषयाचे अध्यापन आणि भाषेचे अध्यापन यात त्यांचा हातखंडा होता. आजही त्यांनी खडू आणि पुस्तक खाली ठेवले नाही. त्यांनी अध्यापन केलेल्या शाळेतील अनेक विद्यार्थी आज मोठ्या पदावर विराजमान झालेले आहेत. मा. श्री.  शशिकांत नरळे ,(एसटीआय सोलापूर )  श्री. दादासाहेब गायकवाड (केमिकल इंजिनिअरिंग बेंगलोर)  मा. नसीमा नदाफ (नगरसेविका सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका सांगली )श्री .एस .एम .नदाफ, निपाणी. कर्नाटक राज्य पुरस्कार प्राप्त (विज्ञान शिक्षक)श्री. अमजद नाईक सर ( जि. प.शाळा ,घोलेश्वर)  श्री. सिद्राम जाधव ( जि. प.शाळा , वाषाण) श्री.शशिकांत जाधव (मेजर ) श्री. पप्पू गायकवाड (अध्यक्ष शा.व्य. स.काराजनगी ) श्री. कृष्णा गुरव ( तेज कॉम्प्युटर्स, जत ) , प्रा. संगाप्पा गुरव ( खारेपाटण ता. कणकवली  ) अशा विविध ठिकाणी त्यांचे विद्यार्थी विखुरलेले आहेत.त्यांच्या ज्ञानाचा पाझर, ज्ञानाचा प्रवाह तळातल्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेला आहे. त्यांनी केवळ डी. एड. वर समाधान न मानता ग्रॅज्युएशन , पोस्ट ग्रॅज्युएशन , आणि बी. एड. एम.एड. देखील केले आहे . आज सेवा निवृत्त होत असताना देखील सांगली जिल्ह्याचे एम.एड.कृती समितीचे अध्यक्ष आहेत. 

आजच्या युगात इंग्लिश बोलता आले पाहिजे , हा अट्टाहास ठेऊन शाळेत विद्यार्थ्यांसाठी  कॉन्व्हरशेशन आणि अँकरिंग  इंग्लिशमध्ये आजही घेत होते. 

पाटीलसरांना त्यांच्या  सेवकाळात 1998 साली जत तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला , 2008 साली सांगली जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार , 2018  साली सी.आर. सांगलीकर फौंडेशन पुरस्कार आणि 2019 साली सनमडी गौरव पुरस्कार मिळालेले आहेत . 

आज पाटील सर सेवानिवृत्त होत असताना त्यांच्या कुटुंबात  त्यांची प्रेमळ आई , सुविद्य पत्नी ,दोन मुले त्यापैकी एक मुलगा इंजिनीयर आहे  ;  तर दुसरा मुलगा बीडीएस करत आहे.  दोन मुली त्यापैकी एक बी.सी.एस. MBA आणि दुसरी मुलगी B.E. (कॉम्प्युटर) आहेत. दोन्ही  मुली विवाहित आहेत ,अर्थात  दोन जावई  आणि चार नातवंडे असा त्यांचा आनंदी  परिवार आहे.

      सेवाकार्य बजावत असताना शिक्षकांसाठी देखील  सुरुवातीपासून पदवीधर शिक्षक संघटनेत काम केले आहे . पदवीधर शिक्षक संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांचे अनेक प्रश्न सोडवले आहेत. विकास पत संस्थेच्या माध्यमातून शिक्षकांची सेवा केली आहे . ते पतसंस्थेचे चेअरमन देखील होते. आज सेवानिवृत्त होत असताना विद्यमान संचालक आहेत . 



पाणी फाउंडेशन च्या माध्यमातून त्यांनी गावाला जोडले. अध्यात्माच्या माध्यमातून लोकांना जोडले. 



इतकी वर्षे नोकरी केल्यानंतर प्रत्येकाच्या आयुष्यात न टाळता येणारा दिवस म्हणजे ‘सेवानिवृत्तीचा’. कामावर असताना सेवानिवृत्त झाल्यानंतर काय काय करु आणि काय काय नको, याची    स्वप्नं  अनेकांनी पाहिलेली असतात. पण न कळत हा दिवस आल्यानंतर अनेकांच्या डोळ्यात पाणी तरळते. आयुष्याची थर्ड इनिंग सुरु होते.  ज्या मित्रांच्या आणि सहकाऱ्यांच्या साथीने तुम्ही तुमचे दिवस घालवलेले असतात ते पुन्हा येण्याची संधी आयुष्यात परत मिळणार नसते. ज्यांना तुम्ही गुरूस्थानी मानून गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा ही दिलेल्या असतात.  मनावर दगड ठेवून या दिवशी आपण आनंद तर साजरा करतो. पण या दिवशी दु:खही तेवढेच होत असते. 

सेवानिवृत्तीचा दिवस आला.. अगदी मनासारखं काहीतरी करण्याचा काळ आला.. जे जे तुम्ही ठरवलं ते सगळं करावं… तुम्हाला जे जे हवे ते सारे मिळावे.. कुटुंबाची जबाबदारी घेण्यासाठी तुम्ही कष्ट केले अपार आता ही वेळ म्हणते थांबा आणि करा थोडा आराम.. 


पाटील सरांना सेवानिवृत्ती नंतर महत्वाचे म्हणजे  आरोग्य लाभो ते आरोग्य अनुभवायला उदंड आयुष्य लाभो . 

जसा  सेवपूर्व काल झगडत गेला, सेवाकाल  अनेक यश मिळवत आनंदात गेला  तसा सेवापाश्चात्य काल निश्चिन्त जावो. सेवानिवृत्ती नंतरचा काळ सुखात ,आनंदात समाधानात , जावो ही मनापासून कामना . 


सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!



जाणा-या ला निरोप देणे 

हा फक्त शिष्टाचार नाही 

तर तो संस्कृतीचा भाग आहे 

संस्कृतीचा अविष्कार आहे. 


निरोप दयावा, 

परि न क्लेश मनी ठेवाल 

आयुष्यात जेंव्हा जेंव्हा भेटाल 

स्मितहास्य जरुर कराल .............



बोलक्या प्रतिक्रिया - श्री. संगाप्पा गुरव.

आदरणीय गुरुवर्य श्री. पाटील सरांचा  सेवानिवृत्ती समारंभ आपल्या गावातीलच , मला सुरुवातीलाच ज्ञानाचे बाळकडू पाजणाऱ्या शाळेत संपन्न होत आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे. काराजनगीमध्ये सहावी पर्यंत शिक्षण घेवून मी शेजारील गावात म्हणजे घोलेश्रर येथे पुढील शिक्षण घेण्यासाठी गेलो. तेथे माझ्यासाठी सर्वच नवे. पण या ठिकाणी गरीब मुलांच्या मनात शिरून त्यांना आईच्या मायेने जवळ घेवून समजावून सांगणारे. बापाच्या भूमिकेतून सतत डोक्यावरून हात फिरवून इंग्रजी सारख्या विषयाची गोडी लावणारे  सच्चे हाडाचे  शिक्षक म्हणजेच श्री.  आण्णाराव पाटील सर. पाटील सरांच्या शिकवणीचा मला आजही उच्च शिक्षण घेताना पावलो पावली उपयोग होतो आहे. त्यांच्याच शुभेच्छा मुळे व शिकवणी मुळे मी ज्युनिअर कॉलेज मध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहे. तसेच शिक्षणातील सर्वोच्च अशी डॉक्टरेट ही पदवी प्राप्त केली. हे सर्व पाटील सरांनी लहानपणी पाजलेल्या ज्ञानरूपी बाळकडूचे फलित आहे. अशा ज्ञानाचा महासागर असलेल्या गुरुंना शुभेच्छा देण्यासाठी मी उपस्थित राहू शकत नाही हे माझे दुर्भाग्यच म्हणावे लागेल. असो प्रत्यक्षात नाही फोनवरून तरी शुभेच्छा देवू शकतोय यातच धन्यता मानतो. श्री. पाटील सरांचे भावी आयुष्य सुखा समाधानाचे, आनंदी, आरोग्यदायी व भरभराटीचे जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.💐💐💐💐💐

आपला विद्यार्थी  , 

प्रा.श्री. संगाप्पा गुरव.

कणकवली, सिंधुदुर्ग.


बोलक्या प्रतिक्रिया -

श्री .एस .एम .नदाफ, निपाणी

  ज्यांनी आम्हाला इंग्रजी भाषेची ओळख आणि महत्त्व पटवून देऊन आमच्यामध्ये या भाषेविषयी आवड निर्माण केली. या आमच्या पाटील गुरुजींना सेवानिवृत्तीनिमित्त हृदयपुर्वक मनस्वी शुभेच्छा.

             असं म्हणतात की, अगोदर शिक्षक आवडावा लागतो , तेव्हा कितीही कठीण विषय आपोआपच आवडीचा बनतो.

             आमच्या घरात आम्ही तिघे भाऊ शिक्षक झालो . यामध्ये पाटील गुरुजींचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. मला आजही बालपणीचा काळ स्पष्टपणे आठवतो.  इयत्ता सहावी पर्यंत इंग्रजी विषयाचा गंध नसलेली आम्ही मुले ; म्हणजे मेंढ्यांचा बाजार होतो. मी इयत्ता सातवी मध्ये असताना मला पाटील गुरुजींचे एक वर्ष इंग्रजी विषयाचे मार्गदर्शन लाभले. माझ्या भावाला मात्र तीन वर्ष त्यांचा सहवास लाभला. त्यामुळे त्याची इंग्रजी विषयातील प्रगती तेवढीच दमदार झाली .याचे श्रेय पाटील गुरुजींना निश्चितच जाते. आमच्यासारख्या गरीब परिस्थितीशी झगडत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यात स्वप्ने पेरणा-या आमच्या गुरुजींना दीर्घायुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

श्री .एस .एम .नदाफ, निपाणी.

कर्नाटक राज्यपुरस्कार प्राप्त (विज्ञान शिक्षक)









No comments:

Post a Comment