माझे इतर लेख वाचण्यासाठी ब्लॉगच्या होम पेज वर कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शनला जा आणि आपल्या आवडीचा ब्लॉग वाचा. आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना whatsapp, facebook द्वारे शेअर करा. किंवा पेजची लिंक तुमच्या whatsapp ग्रुपला share करा.धन्यवाद.....!

Saturday, May 16, 2020

दिवाळीची गाणी






















वाकडी तिकडी बाभळ 


वाकडी तिकडी बाभळ
तेच्यावर हुता व्हल्ला
हिकंड दिला टोला
गंगणाला गेला
गंगणाची माणसं
लिंबूऱ्याची कणसं
लिंबूर माझ्या किस्यात
शेंबूड तुझ्या मिस्यात



🙏🙏🙏🙏🙏
 इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
 bhausahebmahanor.blogspot.com
ला भेट द्या./ ब्लॉगला फॉलो करा ./subscribe करा ....
 🙏🙏🙏🙏🙏

🙏🙏share करण्या साठी निळ्या रंगामधील whatsapp किंवा facebook वर टच करा.🙏🙏
दिनदीन दिवाळी
Govatsa Dwadashi Images & Vasu Baras Rangoli, Photos of Gau Mata ...
दिनदीन दिवाळी
गाय म्हशी ववाळी
गयचा चारा
बैल नवरा
बैलांचं बाशिंग
किकऱ्यान  ताशीन
किकार झालं मॉण्ड
 गायला झालं खॉंड
गायच्या गळयात घाटी
दी गं म्हातारी खोबऱ्याची वाटी
न्हायतर घालीन कुबडात काटी


Vasu-baras, Feature Photo, A woman performing aarati to c...


माळावरचं मुंगास
Blood Art: Killing 50,000 Mongooses Every Year to Create Art
माळावरचं मुंगास
त्यानं दिली हाळी
ज्यानी गाय फळी
ज्यानीची खोंडं
रेशमाची गोंडं
रेशमाची सावली
तिफण मावली
तिफणीचं देण्याळ
हाणीन बुक्की
फोडीन   चाडं
 नव्वा गाडं
आली वरसाची दिवाळी
सोन्या रुपांन ओवाळी
Traditional holiday diwali festival vector free download          



खो खोकडाचं


खो खोकडाचं
घोडं लाकडाचं
मिशी उंदराची
दाडी बोकडाची
आडविन मेंढी
कोष्टयाची कोष्टयाची
कोष्टीन म्हणत्या
इनिन कापाड
मारिन माकाड
लव्हार लव्हार
लव्हार म्हणातूय
दिन लाथा
मारीन भाता
चांभार चांभार
चांभार म्हणतूय
घुसविन आरी
आडविन पोरी
मांगच्या मांगाच्या
मांग म्हणतूय
आटीन नाडा
आडविन घोडा
पाटलाचा पाटलाचा
पाटील म्हणतूय
जुपीन नांगुर
फूsडीन  डुंsगुर
मोत्याचा मोत्याचा
आडी पीडी जाऊ दे
बळीचं राज इऊ दे

🙏🙏🙏🙏🙏
 इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
 bhausahebmahanor.blogspot.com
ला भेट द्या./ ब्लॉगला फॉलो करा ./subscribe करा ....
 🙏🙏🙏🙏🙏


🙏🙏share करण्या साठी निळ्या रंगामधील whatsapp किंवा facebook वर टच करा.🙏🙏

माळावरचं मुंगास
Blood Art: Killing 50,000 Mongooses Every Year to Create Art
माळावरचं मुंगास
त्यानं दिली हाळी
ज्यानी गाय फळी
ज्यानीची खोंडं
रेशमाची गोंडं
रेशमाची सावली
तिफण मावली
तिफणीचं देण्याळ
हाणीन बुक्की
फोडीन   चाडं
 नव्वा गाडं
आली वरसाची दिवाळी
सोन्या रुपांन ओवाळी
Traditional holiday diwali festival vector free download




आगड्यात पगडं


आगड्यात पगडं
 महादेव रगडं
 चिकणी सुपारी
निळा घोडा
चाबूक तोडा
चाबूक दणानी
 मुंगणी हणानी
मुंगणीचं अंडं
भाला बिंडं
भाला पडला ऊसात
करड्याच्या भूशात
कराड गाव जळलं
बोरगाव फळलं
निमुनींच्या तळ्यावर
सुरफाटी खेळलं

🙏🙏🙏🙏🙏
 इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
 bhausahebmahanor.blogspot.com
ला भेट द्या./ ब्लॉगला फॉलो करा ./subscribe करा ....
 🙏🙏🙏🙏🙏


🙏🙏share करण्या साठी निळ्या रंगामधील whatsapp किंवा facebook वर टच करा.🙏🙏
आरडं मरडं

आरडं मरडं
बईल करडं
झेंडू माळ्या
मसी काळ्या
मसीच्या पोटी
हाणमा रेडा
गयच्या पोटी
चतुर पाडा
गय म्हसींनी
भरलाय वाडा
वाडा कुणाचा
क्रीसन देवाचा
क्रिसन देवाचं
गुणगुण  डोळं
त्येला  बघून
सावज लोळं
लोळत लोळत
गवळ्याच्या टेका
हाक मार लेका
हाक कुणाची
हणमंतांची
उडी कुणाची
वाघाची
फडी कुणाची
नागाची

🙏🙏🙏🙏🙏
 इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
 bhausahebmahanor.blogspot.com
ला भेट द्या./ ब्लॉगला फॉलो करा ./subscribe करा ....
 🙏🙏🙏🙏🙏


🙏🙏share करण्या साठी निळ्या रंगामधील whatsapp किंवा facebook वर टच करा.🙏🙏

खडकावरचं बेलं
खडकावरचं बेलं
प्वार पाणी पेलं
पोरा पोरा हुकी
चांद चांद चुकी
चांदावरली भिंगरी
आठ पाय नांगरी
नांगुर सरला
गोठा भरला
गय गोमटी
हारान शिंगटी
दे गं म्हातारी
खोबऱ्याची वाटी
न्हायतर घालीन
कुबडात काटी

का काकू का काकू

का काकू का काकू
कुंच्या बैलाला
घालू जू ,घालू जू
रतन्या  बैलाला
घालू जू,घालू जू
रतन्या बैल
 गुणाचा गुणाचा
पाठीवर सजलाय
फुलाचा फुलाचा
फूल फूल
 देव्रषी देव्रषी
देवरशाचा
घोडा घोडा
घोडा गेला
 करंजाडी करंजाडी
करंजाडीनं दिला
मार मार
गुराख्या पोराला
आला राग, राग
रागात मारला
वाघ वाघ
आडी पीडी जाऊ दे
बळीचं राज इऊ दे



सात गाड्या  जुपल्या  जुपल्या

सात गाड्या 
जुपल्या  जुपल्या
एका वाटंला 
लावल्या  लावल्या
वाटंत होता
तेली तेली 
गवळी गाय 
येली येली
गवळ्या गाईचं 
खाँड  खाँड
पालखी जशी
दांड दांड
पालखीत हूता 
दिवा दिवा
दिव्यात हुती 
वात वात 
गया गेल्या 
कुरणात कुरणात
कुरणात झाला 
चारा चारा 
गयांनी  दिला
फरा sss  रा  
आडी पीडी  जाऊदे
बळीच राज्य येऊ दे 


प्रॉय  प्रॉय मोरी
प्रॉय  प्रॉय मोरी
धार काढ पोरी 
पोरीची बोटं
माणिक मोठं 
अमरी तुमरीचा पाला 
डवरी(गवळी) गोसावी गेला 
गोसाव्याची फणी
चट्टा पडला वनी
वनी गेल्या गायी 
वनी सीता माई
सीता कोंडून जाई
ती माझी माय
आडी पीडी  जाऊदे
बळीच राज्य येऊ दे 


पडक्या पावसात 

पडक्या पावसात 
जुप रं गाडं , जुप रं गाडं 
गाडं  गेलं 
आड वाटंनी,आड वाटंनी
चित्तूर बसला 
बाबळ बनी, बाबळ बनी
बाबळ बनीनं
दिल्या फोका,  दिल्या फोका 
अख्ख लोक
बिन ठोका ,बिन ठोका
अख्ख लोक 
येसीला,येसीला.
येसीनं दिल्या ,
भौऱ्या म्हशी,भौऱ्या म्हशी 
भवऱ्या म्हशीचं 
भवरं रेडं ,भवरं रेडं.
त्यावर टाका 
शेला कापडं,शेला कापडं.
किसनदेव बसला,
नटून , नटून. 
कापड गेलं,
फाटून, फाटून 
त्याच्यावर नाची 
सावज्या मोर,  सावज्या मोर
सावज्या मोराची ,
लांब लांब पखं,लांब लांब पखं,
एक पख 
आखुडा ,आखुडा.
उड मुंगी ,
तोड नाडा, तोड नाडा, 
(आडीपीडी जाउदी,बळीचंराज्यो)

आडीपीडी जाओ ,बळीचं राज्य येवो





1 comment:

  1. लहानपनी पहाटे गाणी म्हणत आम्ही फिरायचो, आठवणी जाग्या झाल्या. खूप छान सर

    ReplyDelete