भाषेचा आग्रह का धारता ?
प्रत्येकाला आपल्या स्वतःच्या भाषेचा आग्रह जरूर असायला हवा; पण आग्रह स्वतःपुरता मर्यादित हवा .हा आग्रह दुसऱ्यांसाठी नको. आपल्याकडे दुसऱ्याच्या भाषेचा विचार करण्याचा सुंदर इतिहास आहे. भारत ही अनेक संस्कृतीची भूमी आहे .अनेक भाषांची भूमी आहे. हे अत्यंत ताकदीचं आहे.
प्रांतवार भाषारचना ही नंतर आली.ती सोयीसाठी केली पण त्याआधी भारताची भाषा नैसर्गिक रचने नुसार विविधतेची होती हे मान्य करायला हवे.प्रत्येक राज्याच्या सीमावर्ती भागात दोन किंवा तीन भाषा शिकाव्या लागतात . महाराष्ट्राचा विचार केला तर कर्नाटक बाऊंडरीवर मराठी कन्नड यायला हवे. जर सोलापूरला जा तिथं माणसं त्रिभाषिक होताना दिसतात . ती मराठी बोलतात , कानडी बोलतात अन तेलुगू देखील बोलतात. तसंच गुजरात, मध्यप्रदेश यांच्या सीमेवर देखील ही परिस्थिती आहे. तिथल्या स्थानिक लोकांचे व्यवहार हे व्हायला हवेत ना ! त्यामुळे भाषा हा भांडणाचा आणि वादाचा मुद्दा होऊ शकत नाही. अन् वादाची गरजच काय? आपण स्वतःला प्रत्येकाने विचारायला हवे की भाषा द्वेष करणे योग्य आहे का?
देशी पेय प्या. विदेशीचा धिक्कार करा . यासारख्या अनेक गोष्टी जागतिकीकरण विरोधी प्रचार करताना दिसतात . मराठी -मराठी म्हणून आग्रह करणारी माणसं मराठी वाचतात का? मराठी बोलतात का ? त्यांची मुलं मराठीतून शिकतात का ? का घालतात मुलं त्यांची इंग्लिश मेडियमध्ये ?
सर्वजण आज मराठीकडे गांभीर्याने पाहतात नाहीत . माझी मराठी भाषा असणे आणि मी मराठी असणे याचा अभिमान असावा पण गर्व असू नये. जर हा गर्व असाच राहिला तर तो पोकळ आणि अहंकार वाढवणारा होणार नाही ना याकडे नक्की पाहिलं पाहिजे .
माणसातील ज्ञान आणि व्यवहार यांच्या देवाणघेवणी मध्ये भाषा थोडासा अडथळा ठरते पण भाषा वाद व्यवहार बंद नाही करू शकत . त्यामुळे भाषेचा आग्रह किती धरावा हे ज्याने त्याने ठरवावे !
🙏🙏🙏🙏🙏
इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
bhausahebmahanor.blogspot.com
ला भेट द्या./ ब्लॉगला फॉलो करा ./subscribe करा ....
🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏share करण्या साठी निळ्या रंगामधील whatsapp किंवा facebook वर टच करा.🙏🙏

No comments:
Post a Comment