माझे इतर लेख वाचण्यासाठी ब्लॉगच्या होम पेज वर कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शनला जा आणि आपल्या आवडीचा ब्लॉग वाचा. आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना whatsapp, facebook द्वारे शेअर करा. किंवा पेजची लिंक तुमच्या whatsapp ग्रुपला share करा.धन्यवाद.....!

Sunday, April 26, 2020

माझ्या कविता

वाटतं मला


 वाटतं मला
 मी तुझ्यासाठी मोगरा व्हावं
 मखमली केसात तुझ्या गुंफूनी राहावं

वाटतं मला
कधीतरी तुझ्यासाठी अंजन व्हावं
डोळ्यापुढे सदैव तुझ्या जाणिवेत राहावं


वाटतं मला
गळ्यात तुझ्या विस्कटूनी पडावं
कैचीत सापडलो ,मी असं का झुरावं


वाटतं मला
 कधीतरी हृदयाला हृदय द्यावं
 आयुष्याच्या आलेखात बिंदू बनून जगावं


चुकून वाटतं मला एकदा
मागावी आयुष्याची साथ
नाहीतरी एकदातरी मागावा
तुझ्या मदतीचा हात ...…...



रूप तुझं


 गुलमोहराचं केशरी फूल
 कडक उन्हात बहरलेलं
 वैशाखाच्या खाईत
 पानाचा आडोसा धरलेलं

 इच्छा मनाशी बाळगतोय
 वास्तवात मी निराळा जगतोय
 ओठांची पाकळी पाहण्यासाठी
 उगीचच जीव गुदमरतोय

  उघड्या डोळ्यांनी मी
  स्वप्नात जगतोय
  दूर किती मी तरी
  तुझ्याजवळच असतोय

 हलक्या गोष्टीसाठी
 नजर तुझी चुकत न्हाय
 तेव्हाचं तुझं रूप
 माझ्या डोळ्यात मावत न्हाय.


साद
हास्यांच्या कारंज्यात
डोळे तुझे किलकिले
सावध होतात क्षणात
जणू वाटतात विस्फारलेले

गालावरचे हास्य तुझ्या
दिसते गं अतुरलेले
तेव्हा तुझे डोळे गं
भावनांनी एकवटलेले

माझा हा आरोप नाही
पक्व कळीचा गंध आहे
वाटतं अनुभवण्यापेक्षा
पाहण्यात मला आनंद आहे


तू दिलेले पुस्तक
त्याला एक सुगंध आहे


हे पुस्तक जरी फूल नसे
चित्रांच्या रुपात हा नाद आहे
ओळखून आहे मी
माझ्यासाठी तुझी ती साद आहे



अंतर

 रोजचा दिवस तसाच उगवला
 राहिल्या तशाच हालचाली
 उत्सुकलेल्या  मनाला  उशिरा   कळले
 ती पुन्हा नाही आली

घराच्या कानाकोपन्यात कक्त
 तुझाच फक्त चेहरा होता
  दिसत नव्हतीस  मात्र
असल्याचा तो भास होता

दिवसामागूनी महिने गं
 महिन्यानंतर असेच वर्ष
  वाटतं उंगीचच मनाला
  अढळणींना  होईल का हर्ष

  आठवण मनात  कधीतरी
   येईल का चूकन
   का राहिली उगीच प्रीती
   तुझ्यापासून अशी लपून



हार

निर्जीव  व्हावंलागतं वेळूला
अक्षय सूर  निघण्यासाठी
तसंच तूही राहशील का?
माझं आयुष्य जगण्यासाठी


बंद घरात माझ्या
तुझाच एक नाद गं
तू माझ्याभोवती भिरभिर
अन् मला घाल साद गं


परी होऊन तू मला
फुलालम टिचकी मार गं
तुझ्या गळयात पडण्यासाठी
घेईन मी हार गं




व्यथा

मोरीला बोळा अन दरवाजा मोकळा
ही रीत झालीय आमची
भारतमातेच्या सौभाग्याचं कुंकू
अजून किती जणांना कळायचंय?

अंह.... इथं मात्र
माळ्याची मका अन् कोल्ह्याचं भांडण,
आज बरखास्त उद्या उद्धवअस्त
त्यांना माल अनेकांना नरबळी
द्यावा लागेल , स्वातंत्र्याच्या हक्कासाठी

कोण कुणास ठाऊक कुणासाठी ?
पण मारताहेत  बेळगावकर आजही
मुसकी बांधून, आपल्याच जीवनासाठी


लोकशाही धाब्यावर बसली ,
अन् जनमत वेशीला
कमरेच काढून ह्यांनी
केव्हाच  बांधलय डोकीला
हैद्राबाद विलीन झालं
तिथं बेळगावची काय कथा
आमचा प्रश्न आम्ही सोडवत व्हाय ,
हीच आमुची व्यथा,


#########

गर्जा  महाराष्ट्र माझा
बेळगाव कधी म्हणणार
धुमसत  असलेलं हृदय
प्रेमगीत कधी गाणार


कुणासाठी जगताहेत ते
मरतात कुणासाठी ?
दुसाऱ्याच्या प्रतिष्ठेसाठी
अन् स्वतःच्या पोटासाठी


कोण कसली त्यांची जमीन ?
बळी झाला का कोणी ?
त्यांनाच तुम्ही केलात बळी
रिटायर होऊनही यातना
संपल्या नाहीत अजूनही
 

समतेच्या ध्वजाला असा
सवतीचा कलंक का?
आम्ही राबतो कष्टतो
तूमच्या घोषणांचा डांगोरा का ?


आम्ही ना कुणाची शान ना कुणाची मान
पण आहोत आम्ही मात्र दोघांकडे गहाण
स्वतंत्र देशात राहूनही
स्वातंत्र्याची    उपासमार
हेच गीत म्हणतंय, बेळगाव सांगे  कारवार




माणूसकीची हद्द  संपली
म्हणून आभाळ सुद्धा रुसलं
चार थेंब गावाकडचे
पाठ फिरवून बसलं


विस्मरणात जेव्हा गेला राम
एड्सने दिला त्यांना पूर्ण विराम
हनुमंताची  कत्तल केली
तेव्हा त्यांचीही होळी झाली


होतात महाभारत इथे
मग भारत का इथे असे
हिंदुस्तान  मरते .
आगि फक्त इंडिया उरते .



मी एक फूल ना वासाचं ना फळाचं
 मी एक निखारा ना फुलणारा  ना पेटणारा



  जन्म झालाय म्हणून जगतोय
  जीवनाची मी भीक  मागतोय

 हसता तुझी मजकडे पाहून
 जगतोय ते सर्व साहून


माणूस म्हणून वणव्याच्या खाईत
ढकललेत बरेच पावसाळे
असेच कुडकुडत अजून हिवाळे
सोसतो आयुष्यभर उन्हाळे


 दिवाळीचा सण आमच्या  नाही  वाटा
 शिमग्याचच सुख आम्हा
 त्याला लय वाटा

 राब राब राबलो ,
 हाती हातोली नाही
 काय करावं जन्माला
 पोटी संतान नाही


 वंश नाही जन्मात माझ्या
 जगावं मी कुणासाठी ?
 त्याचीच तर ही अनंत लेकरं
 मी का रडतो  माझ्यासाठी

No comments:

Post a Comment