माझे इतर लेख वाचण्यासाठी ब्लॉगच्या होम पेज वर कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शनला जा आणि आपल्या आवडीचा ब्लॉग वाचा. आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना whatsapp, facebook द्वारे शेअर करा. किंवा पेजची लिंक तुमच्या whatsapp ग्रुपला share करा.धन्यवाद.....!

Wednesday, May 18, 2022

आमचं गाव आमच्या परंपरा-बिळूर

आमचं गाव आमच्या परंपरा-बिळूर 



बिळूर हे गाव पश्चिम महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील आहे . तालुक्याच्या ठिकाणापासून दक्षिणेला  13 किमी वर आहे तर जिल्ह्याच्या ठिकाणापासून  100 किमी अंतरावर आहे . गावाला रेल्वे अगर विमानतळ नाही . प्रमुख नॅशनल मार्ग देखील नाही. राज्यमार्ग आहे . बिळूर गाव जत अथणी रोडवर वसले आहे . गावात आठवडी बाजार भरतो .  गावात एक मराठी आणि एक कन्नड  अशा दोन प्राथमिक शाळा आहेत . पाचवी ते बारावी हायस्कूल सह ज्युनिअर कॉलेज आहे. 


बिळूर गावात जपल्या जाणाऱ्या परंपरा काही खालीलप्रमाणे 



गुरु बसवेश्वर राजयोगी

 बिळूर येथे गुरु बसवेश्वर राजयोगी यात्रा वैशाख पौर्णिमे नंतर साजरी केली जाते . 
 यात्रेत प्रामुख्याने पहिल्या दिवशी  गुरु बसवेश्वर महाराज समाधीस रुद्राभिषेक, दुपारी महाप्रसाद, रात्री मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. दुसऱ्या  दिवशी  सकाळी भव्य रथोत्सव, दुपारी कुस्ती मैदानाचे आयोजन केले जाते. तिसऱ्या दिवशी सकाळी विविध शर्यती, स्थानिक  जनावरांची निवड करून  बक्षीस दिले जाते. दरम्यान, तीन दिवस  जनावराची यात्रा भरविण्यात येते . ग्राम पंचायतीच्यावतीने भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली जाते. तसेच मठामधे दररोज प्रवचन चालू असते.परिसरातील  सर्व भक्त याचा लाभ घेतात.    सध्या बिळूर मठाचे  मठाधिपती मूगेंद्र महास्वामी हे आहेत . त्यांच्या संमतीने इथले उत्सव चालतात तसेच वर्षभरात इतर कार्यक्रम ही मठाधिपती यांच्या अधिपत्याखाली होतात. 
बिळूर येथे प्रत्येक वर्षी रथोत्सवाचे आयोजन करण्यात येते. श्री गुरुबसवेश्वर वीरभक्तमठ यांचे रथोत्सवाचे आयोजन करण्यात येत असते. गावातील सर्व  भक्तगण रथोत्सवात सहभागी होतात.  मठाचे मठाधिपती श्री मृषेंद्र महास्वामी हे या रथोत्सवाचे मुख्य अधिपती असतात.  रथोत्सव निमित्ताने जनावरांचा बाजार प्रदर्शन व कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात  येते.या उत्सवाचे  मठाचे स्थानिक सल्लागार समितीचे पदाधिकारी संयोजन करत असतात.




बिळूरचे काशी काळभैरवनाथ

बिळूर (ता. जत) येथील काळभैरवनाथ मंदिर हेमाडपंथी शैलीतील मंदिर आहे. बिळूर गावाला वैभव असल्याची साक्ष हे मंदिर देते. मंदिरावर सुवर्णकलश बसविला आहे. प्रतिवर्षी माघ पौर्णिमस मोठी यात्रा भरते.

यावेळी 'हरबंडी ' नावाचा  हा अनोखा व थरारक  असा परंपरेचा प्रकार खेळला जातो. सांगली आणि पश्चिम महाराष्ट्रात इतरत्र हा प्रकार कुठेही पाहायला मिळत नाही .  ही अशी एकमेव प्रथा आहे. ती केवळ बिळूर गावात खेळली जाते.  हेच या यात्रेचे  वैशिष्ट्यही आहे आणि परंपरा देखील आहे . ही परंपरा इथल्या गावकऱ्यांनी संस्कृती म्हणून जपली आहे . 





काळभैरवनाथ मंदिराच्या मुख्य प्रवेश कमानीवर मैथून करणाऱ्या युगुलाचे एक चित्र कोरले आहे. भारतातील अनेक लेण्यांमध्ये आणि मंदिरात अथवा मंदिरावर अशी चित्रे कोरल्याचे आढळतात, मात्र या चित्रबद्दल  देगळीच कथा सांगितात, बांधकाम करताना कमान अनेकदा  ढासळली त्या कमानीस दृष्ट लागू नये म्हणून है चित्र कोरल्याचे लोक सांगतात.  मूळ मंदिर है प्राचीन होते. सुंदर नक्षीकाम, कोरीव दगडावरील अनैक नक्षीकाम होते. अखंड पाषाणात कोरलेले खांब, तितक्याच नक्षीदार  बनवलेली ती चौकट होती.काळया पाषाणातील नंदी होते. नवीन मंदिरात आता स्थापना करण्यात आली आहे. पूर्वी मुख्य मंदिरात उजव्या बाजूला तर दिशा काशी काळभैरवाच्या मंदिराचा गाभारा होता.  काळभैरवनाथाची मुर्ती, पितळेच्या झुपकेदार मिशा आहेत. त्यांच्या शेजारीच  काळभैरवनाथांची बहीण बाळाबाई यांच्या मूर्ती आहेत.  समोरच्या गाभाऱ्यात बहीण जोगुबाई हिची मूर्ती आहे,

  याच परिसरात असलेले शेतकरी  यात्रेच्या दिवशी भव्य लाकडी रथाला बैल जंपून तो रथ ओढला जातो. या कार्यक्रमाला 'हरबंडी' नावाची ही चित्तथराक असते आणि केवळ  बिळूर गावातच नाही तर परिसरात  खुपच लोकप्रिय  आहे. 

बिळूर येथील काळभैरवनाथ मंदिर या ठिकाणी भक्त निवास बांधण्यासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत पर्यटन मंत्री मंगल प्रभात यांच्या निधीतून सत्तर लाख २६ हजाराचा निधी मंजूर करण्यात आला आहे.   या ठिकाणी भव्य असे भक्तांना राहण्यासाठी भक्त निवास बांधण्यात येणार आहे.बिळूर येथील काळभैरवनाथ मंदिर हे जागृत देवस्थान असल्यामुळे या ठिकाणी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश या ठिकाणाहून भाविक दर्शनासाठी येत असतात. भाविकांच्या राहण्याची सोय व्हावी या हेतून बिळूर येथील ग्रामस्थ आणि भक्तगण  यांनी प्रयत्न केला आहे. त्याला यश आले असून या ठिकाणी भक्तांना राहण्यासाठी सत्तर लाख २६ हजाराचा निधी भक्त निवास बांधण्यासाठी मंजुर झाला आहे. असे समितीद्वारे सांगितले जाते.

No comments:

Post a Comment