'या देशातून इंग्रजांना हाकलून द्या. स्वराज्य निर्माण
करा." असा संदेश देऊन जतच्या दुष्काळी भागात क्रांतीची पताका फडकविणारा पहिला क्रांतीकारक होण्याचा बहुमान सिंदूर लक्ष्मण याचा आहे. महाराष्ट्रात जन्म घेऊनही त्याची या राज्याने व इथल्या शासनाने उपेक्षाच केली असली तरी कन्नड साहित्य व चित्रपट सृष्टीने सिंदूर लक्ष्मण या क्रांतीकारकाचा सन्मान केला आहे. जतच्या या क्रांतीसूर्याचा इतिहास तालुक्याची छाती अभिमानाने फुलविणारा आहे. जत तालुक्यातील सिंदूर गांवचा . शेतकरी कुटुंबातील एक तडफदार व्यक्तीमत्व असलेला मुलगा म्हणजे लक्ष्मण! सिंदूर लक्ष्मण आणि त्याचा भाचा नरसा यांनी प्रथम क्रांतीचा
झेंडा लावला! त्या काळात लक्ष्या आणि नरस्या या नांवाने हे दोघे दरोडेखोर म्हणून प्रसिद्ध झाले. सिंदूरच्या चावडीत बेसाकरचि (वालीकार) म्हणून लक्ष्मण काम करायचा. परंतु अत्यंत स्वाभिमानी, शूर, धाडशी, राष्ट्रप्रेमाने पेटलेला तो क्रांतीकारक होता.
एका भयानक दुष्काळाच्या काळात रात्रीच्यावेळी
घराबाहेर लक्ष्या बिछान्यावर आडवा झाला होता. इतक्यात चार-पाच दरोडेखोर हातात कुन्हाडी घेऊन त्याच्यासमोर आले. एका रात्रीसाठी त्याच्याकडे आश्रय मागितला.लक्ष्मणने सर्वांना निरखून पाहिले. अंथरुणावर उठून बसला व सर्वांची चांगलीच खरडपट्टी काढली. गोरगरीबांना का छळता असा सवाल केला. परंतु पोरांची पोटं चोरांना दारोदार हिंडवतात. हे सत्य पटल्यावर त्याने त्या सर्वांना आश्रय दिला. रात्री तो विचारमग्न झाला. समाजातील विषमता, अठराविश्व दारिद्र्य , दुष्काळ, श्रीमंतांचा छळ, जमिनी लिहून घेण्याचे, त्यांच्या
बायका पोरीवर वाईट नजर टाकत असल्याचे प्रकार त्याला दिसू लागले. या सर्व विचारांनी त्याच्या मनात समाजवादी विचारांची क्रांतीज्योत पेटली आणि तोही श्रीमंतांना दरोडेखोर आणि गरीबांचा वाली झाला. त्याने दरोडेखोरांचा एक संच केला व बिळूर गावच्या मनोहर कुलकर्णी (मन्याबा सावकार) यांच्या कडेकोट बंदोबस्त असलेल्या वाड्यावर पहिला दरोडा घातला. धान्याची पोती लुटून नेली आणि गोरगरीबांना वाटून टाकली. क्रांतीचे पहिले पाऊल पडले. गरीबाघरी अन्न आले.
आणि सिंदूरच्या लक्ष्मणाचा लक्ष्या दरोडेखोर बनून त्याचा हाच मार्ग पुढे पक्का झाला. पीळदार शरीराचा व भयानक ताकदीचा लक्ष्मण पायामध्ये खिळे असलेल्या कातडी चपला घालून वाडेच्यावाडे सहज चढत असे. सावकाराकडे गहाण पडलेल्या जमिनी, घरेदारे, दागदागिने, गोरगरीबांची कर्जे त्याने आपल्या जरबेने फेडून टाकली व सर्वांना मुक्त केले. कुणाला
गायी, म्हशी घेऊन दिल्या तर कुणाला घरे घेऊन दिली.
दरोड्यातून मिळालेल्या संपत्तीचा त्याने स्वतःसाठी किंवा
कुटुंबियांच्या स्वार्थासाठी कधीच केला नाही. गोरगरीबांना व नडलेल्यांना दान करुन टाकले. असा हा धीरगंभीर, दानशूर, समाजवादी विचारांचा देशभक्त आणि निधड्या छातीचा क्रांतीवीर. त्याला
पकडण्यासाठी संस्थानी पोलिस व ब्रिटीश हद्दीतील (त्या
वेळचा विजापूरचा जिल्हाधिकारी जत संस्थानचा राजकीय एजंट होता.) गोऱ्या सोल्जरांनी आपली सूत्रे हाती घेतली.
लक्ष्मणला पकडून देणाऱ्यास दहा हजार रुपयांचे बक्षीस जाहीर झाले. लक्ष्मण डोंगरात-दऱ्याखोऱ्यात राहत असे.
पोलिसांकडून पळविलेल्या बंदुका, कुन्हाडी, भाले तसेच
लक्ष्मणचा पाठीराखा असलेला धनिक वतनदार व्यंकाप्पा
नाईक याने दिलेली पिस्तुल इतकी शस्त्रे त्याच्याजवळ होती. म्हमूलाल फौजदाराने लक्ष्मणला पकडून आणण्याचा विडा ही उचलला होता. ही बातमी लक्ष्मणला लागली आणि लक्ष्मणनेच म्हमुलालचे मुंडके धडावेगळे करुन वेशिला टांगले. त्यामुळे त्याची जबरदस्त जरब निर्माण झाली. त्याचे घरदार
जप्त केले गेले. त्याची वृद्ध व जिद्दी आई आणि तितकीच कणखर त्याची चंद्रा नावाची पत्नी अज्ञात राहून कुठेतरी हिंडत असत. पुढे दोन तीन वेळा लक्ष्मण नरश्याला सोल्जरांनी जत विजापूरच्या तुरुंगात डांबले. पण या बहाद्दरांनी तुरुंग फोडला व बाहेर पडले. पुढे व्यंकप्पा नाईक या वतनदाराने दिलेल्या
पिस्तुलाच्या गोळीने गार्नर नावाच्या गोऱ्या पोलिस
अधिकाऱ्याची हॅट हवेत वरच्यावर उडवली व जबरदस्त दबदबा निर्माण केला. लक्ष्मणच्या नुसत्या नांवाने पोलिस व गोरे सोल्जर्स थरथर कापत होते. या देशातून इंग्रजांना हुसकावून द्या व स्वराज्य निर्माण करा. असा संदेश लक्ष्मण देत असे. अत्यंत जिद्दीने व साहसी
आहे.सततच्या पराक्रमाने लढा देत हा वीर दऱ्याखोऱ्यातून वणवण हिंडत होता. पण दगलबाजी व फितुरीने या क्रांतीसिंहाचा बळी घेतला. धूर्त ब्रिटीशांनी व्यंकाप्पा नाईकालाच फितुर केले.त्याचे वतन खालसा करण्याची भिती घातली. जादा जमीन व वतनाचे आमिष दाखवले. एका अमावस्येच्या रात्री व्यंकाप्पाने
लक्ष्मण व नरश्याला गावाबाहेरील देवळाच्या बनात जेवणाचे आमंत्रण दिले. यात काही दगाबाजी असेल असा संशय नरसाला आला पण लक्ष्मणने विश्वास टाकला. लक्ष्मणला ओळखण्यासाठी त्या भयानक रात्री तो जेवायला बसल्यावर त्याच्यासमोर गड्याकरवी कंदील ठेवण्यात आला आणि ठरल्यानुसार टेकडीआड उभे राहून सोल्जरांनी जेवत असताना लक्ष्मणला गोळी घालून ठार केले आणि क्रांतीसिंह हुतात्मा झाला.
लक्ष्मणला ज्या स्थळी मारले त्या जमखंडी
संस्थानातील कल्लोळी गावानजीक रस्त्यावर त्याची समाधी आहे. त्या समाधीवर सिंदूर लक्ष्मण असे नाव कोरले आहे.
उमराणी जवळच्या सिंदूर गावाला जाताना जी खोल दरी
लागते तिथेच राहत असे. या रोमांचकारी साहसी
क्रांतीकारकाच्या जीवनावर प्रा. कंठी यांनी कन्नड भाषेत सुरेख नाटक लिहले आहे. हे नाटक बहुतेक नाट्यसंस्था आजही रंगमंचावर सादर करीत असतात. सिंदूर लक्ष्मण हा कन्नड बोलपटही आहे. अत्यंत देशप्रेमी, निर्व्यसनी व समाजवादी
आणि स्वातंत्र्य लढातील क्रांतीसूर्य वीर सिंदूर लक्ष्मण यांचे जन्मगाव असलेले शोटेसे गाव म्हणजे सिंदूर होय! भारतीय इतिहासाला नवा वारसा देणाऱ्या या लाचा मोठा नावलौकीक आहे. सिंदूर गावचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सिंदूरची कली यात्रा' आहे. महाराष्ट्र व कर्नाटकाच्या सीमेवर जत तालुक्याच्या दक्षीणेला असलेल्या या गावात उकळीच्या खेळासाठी कर्नाटकातील व जवळपासच्या गावातील शेकडो खेळाडू येत असतात. ही यात्रा पाच दिवस चालते. उकळी हा प्रकार महाराष्ट्रात फारसा प्रचलीत नाही. उकळीचे अनेक पारंपारिक व ऐतिहासीक खेळही मराठी माणसाला माहीत नाहीत. उकळी यात्रा ही सिंदूरचे ग्रामदैवत श्री हनुमान देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केली जाते. शक्तीचे प्रतिक असलेल्या हनुमानाची उपासना करणारे उकळीचे खेळही शक्तीप्रदर्शन करणारे असेच आहेत, उकळीमध्ये पाण्याची उकळी व दूधाची उकळी असे दोन प्रकार आहेत. हनुमान मंदीरासमोर सुमारे ५१ फूट उंचीचा खांब उभा केला जातो. या खांबावर चढण्याची ही स्पर्धा आहे. गावातील प्रत्येक वर्डड्चा एक संघ केला जातो, एक संघ चढाई करित असताना दुसऱ्या संघाने त्यांच्या अंगावर पाण्याचा मारा करायचा, या पाण्याच्या माऱ्यातून जो संघ खांबावर चढण्यात यशस्वी होईल, तो विजेता म्हणून जाहीर केला जातो. सर्वात मोठी उकळी ही दुधाची उकळी वशीत असते .हजारो भाविक उकळी पाहण्यासाठी जमा होत असतात.

१८५२ पासून उकळी यात्रा भरत असल्याचे पुरावे आहेत, जतचे डफळे सरकार हेही या यात्रेसाठी येत होते. या ऐतिहासिक उकळीत अनेकदा खेळाडू उंच खांबावरून पडतात. परंतु आजपर्यंत एकही माणूस जखमी झाला नाही, हे या यात्रेचे वैशिष्ट्य आहे.' असे येथील तरूण कार्यकर्ते सुरेश मुडशी यांनी सांगितले.
उकळी यात्रेत नाटक, गेगेपद, पारिजातक कथा, असे कार्यक्रम असतात. शिवाय दगडाचे मोठे गुंड व दगडी वजने उचलण्याचीही अनोखी स्पर्धा भरविण्यात येते. पाच दिवस चालणारी ही यात्रा कर्नाटकात खूप प्रसिध्द आहे. मराठी मुलूखात मात्र याची फारसी माहिती नाही. सिंदूरने ही एक आगळी-वेगळी परंपरा जोपासली आहे.
जतचा पहिला क्रांतीकारक - वीर सिंदूर लक्ष्मण
'जुलमी इंग्रजांच्या ताब्यातून देश स्वतंत्र व्हावा यासाठी हजारो ज्ञात-अज्ञात देशभक्तांनी प्राणाची आहुती दिली. जतसारख्या दुष्काळी व मागासलेल्या भागातही स्वातंत्र्याचे वारे जोरात वाहू लागले होते. या काळात सिंदूर येथील लक्ष्मण नामक युवकाने क्रांतीचा झेंडा हाती घेतला व सारे रान पेटविले. भीम ताकदीच्या या युवकाने इंग्रजांना सळो की पळो करून सोडले.
भारत स्वतंत्र व्हावा यासाठी देशभरातील लाखो देशभक्तांनी आपल्या जिवाचे रान केले. अनेकांनी निधडया छातीने इंग्रजाच्या गोळया छातीवर झेलल्या. जन्मठेपेची शिक्षा भोगली. जुलमी इंग्रजांच्या ताब्यातून देश स्वतंत्र व्हावा यासाठी हजारो ज्ञात अज्ञात देशभक्तांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. जतसारख्या दुष्काळी व मागासलेल्या भागातही स्वातंत्र्याच्या क्रांतीचे वारे जोरात वाहू लागले होते. याच काळात जत तालुक्यातील सिंदूर येथील लक्ष्मण नामक युवकाने क्रांतीचा झेंडा हाती घेतला व सारे रान पेटविले. भीम ताकतीच्या या युवकाने इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. देशासाठी या क्रांतीकाराने आपल्या प्राणाची आहुती देत जतचा पहिला क्रांतीकारक होण्याचा मानाचा तुरा आपल्या शिरपेचात रोवला.
जत तालुक्यातील सिंदूर येथील लक्ष्मण नाईक हा गरीब शेतकरी कुटुंबातला. उमराणीहून सिंदूरला जाताना जी खो दरी लागते तेथे राहत होते. एक तडफदार व भीम ताकतीचा युवक म्हणूनच त्याला परिसरात ओळखले जात होते. इंग्रजाचा राजरोस सुरू असलेला अन्याय, श्रीमंत वर्गाचा मनमानी कारभार यामुळे सिंदूरचा लक्ष्मण अस्वस्थ असायचा. गोरगरिबांवर अन्याय झाल्यास त्याच्या तळपायाची आग मस्तकाला जायाची. पण एकीची ताकत नसल्याने सिंदूरच्या या लक्ष्मणाचे काहीच चालत नसल्याने चावडीत बेसाकरची (वालीकर) म्हणूनच काम करणे लक्ष्मणने पसंत केले होते. पण, काळाला ते मान्य नव्हते. एका दुष्काळी रात्री लक्ष्मण घराबाहेर झोपला असता दरोडेखोरांनी त्यांच्या घरात प्रवेश करून आसरा मागितला. दरोडेखोराचे रूप पाहून लक्ष्मण चवताळला व त्यांनी गोरगरिबांची लूट करत असल्याबद्दल त्या दरोडेखोरांची खरडपट्टी काढली. दरोडेखोरांशी सुरू असलेल्या संभाषणातून लक्ष्मणाच्या एक गोष्ट लक्षात आली की केवळ इंग्रजच देशाला लुटत नाहीत तर गोरगरिबांच्या जमिनी, सोने-नाणे, घरदार लुटणारी उच्चप्रभू श्रीमंतांची टोळीच कार्यरत आहे. केवळ गोरगरिबांना श्रीमंत मंडळी लुटत नव्हती तर त्यांच्या बायका पोरावरही वाईट नजर ठेवायची, अन्यायाची चीड येणारा लक्ष्मण या वृत्ताने पेटून उठला व त्यांने स्वतःची टोळी तयार करण्याचा संकल्प केला. केवळ संकल्प केला नाही तर भाचा नरसा याला सोबत घेऊन दरोडेखोरांची टोळीच तयार केली.
• जत तालुक्यातील बिळूर येथील मन्या सावकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनोहर कुलकर्णी यांच्या वाड्यावर सिंदूरच्या लक्ष्मण टोळीने पहिला दरोडा टाकला व धान्याची पोती लुटून नेली, लुटून नेलेली धान्याची पोती त्यांनी उपाशीपोटी मरणयातना भोगत असलेल्या गरिबांना मुक्त हस्ते वाटप केली. त्यानंतर त्यांनी गोरगरिबांना लुटलेल्या सावकारांचा फडशा पाडत अनेक गोरगरिबांची कर्जे, सावकाराकडे गहाण पडलेल्या जमिनी, घरेदारे, दागदागिने आपल्या जबरीने सोडवून आणले. वालीकर म्हणून सिंदूरच्या चावडीत काम करणारा सिंदूरच्या लक्ष्मणाची टोळी त्याकाळात चांगलीच फार्मात आली.
"गरिबांचा वाली तर श्रीमंतांचा कर्दनकाळ म्हणून सिंदूरच्या लक्ष्मणाचा महाराष्ट्रासह कर्नाटकात दबदबा निर्माण झाला. त्यांचे नाव जरी काढले तरी श्रीमंत मंडळी थरथरा कापायची. दरोडेखोरांच्या रूपाने लक्ष्मण गरिबांचा देव झाला. क्रांतीचे पहिले पाऊल त्यांनी व त्यांच्या सवंगड्यांनी टाकत परिसरातील गोरगरिबांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचे व अन्याय करणाऱ्यांना फोडून काढण्याचे काम हाती घेतले. पीळदार शरीराचा व भयानक ताकदीचा लक्ष्मण पायामध्ये खिळ्याची चप्पल घालायचा.वाडेच्या वाडे तो सहज पार करायचा. सिंदूर लक्ष्मणाच्या या पराक्रमामुळे संस्थान व इंग्रज सरकार चांगलेच हबकले.
त्याला पकडण्यासाठी नामी युक्त्या त्यांनी वापरल्या. विजापूर जिल्हाधिकारी, जत संस्थानचे पोलीस व ब्रिटिशांनी लक्ष्मणला पकडण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेतली. पण, डोंगर दऱ्यात राहणारा लक्ष्मण गोऱ्या सोल्जर व संस्थान पोलिसांच्या हाती लागला नाही. पोलिसांकडून पळविलेल्या बंदुका, कुऱ्हाडी, भाले तसेच लक्ष्मणाचा पाठीराखा धनिक वतनदार व्यंकाप्पा नाईक यांनी दिलेली बंदूक व गोरगरिबांच्या पाठिंब्यामुळे त्यांच्या टोळीची ताकत दुप्पट झाली होती.
म्हमूललाल फौजदाराचे शीर वेशीला टांगले
वीर सिंदूर लक्ष्मणाच्या अनेक दंतकथा आजही महाराष्ट्र व कर्नाटक सिमेवर सांगितल्या जातात. त्यांच्या वीरश्रीचे पोवाडे गायले जातात. इंग्रजांच्या नाकीनऊ आल्यानंतर इंग्रजांनी सिंदूरच्या या वीराला पकडण्यासाठी रोख दहा हजाराचे बक्षीस जाहीर केले होते. त्याचवेळी म्हमूललाल फौजदाराने सिंदूरच्या लक्ष्या टोळीला जेरबंद करण्याचा विडा उचलला होता. ही माहिती लक्ष्मणला कळत लक्ष्मणाने फौजदार म्हमूलालला गाठले व त्यांचे मुंडके धडावेगळे करून वेशीला टांगले होते. म्हमूललालचे मुंडके सिंदूरच्या लक्ष्मणने धडावेगळे टांगल्याची वार्ता कळताच इंग्रजासह संस्थान पोलीस, विजापूर जिल्हाधिकारी यांचे चांगलेच धाबे दणाणले. व्यंकाप्पा नाईक यांनी दिलेल्या बंदुकीच्या गोळीने गार्नर नावाच्या गोऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची हॅट हवेततल्या हवेतच लक्ष्मणाने उडविल्याने वीर सिंदूर लक्ष्मणाची प्रचंड दहशत परिसरात निर्माण झाली. दोन ते तीन वेळा सिंदूर लक्ष्मण व त्याचा भाचा नरसा याला पोलिसांनी गजाआड केले होते. पण, या दोन्ही बहाद्दरांनी तुरूंग फोडून पलायन केले होते... जतच्या डफळे संस्थानचे कै. रामराव डफळे यांनी क्रांतीकारक वीर सिंदूर लक्ष्मणला खरा देशभक्त असे संबोधले होते.
पत्नीची साथ मोलाची
हतबल झालेल्या इंग्रजांनी सिंदूर येथील लक्ष्मणाचे घरदार जप्त केले. घरदार जप्त केल्याने त्यांची पत्नी चंद्रा व वयोवृद्ध आईलाही रानोमाळ फिरावे लागले. या संपूर्ण लढ्यात पत्नी चंद्रा हिनेही मोलाची साथ दिली. पतीच्या खांद्याला खांदा लावून तीही क्रांतीच्या या लढ्यात उत्तरली. सिंदूर लक्ष्मण व त्याचा भाचा नरसा हे दोघेही तुरुंगात होते. गुढीपाडव्याच्या दिवशी पत्नी चंद्रा हिने खास जेवण बनविले व धन्यासाठी जेवण आणल्याचे सांगितले. जेवणाची तपासणी करून जेवण लक्ष्मणला देण्यात आले. जेवणाच्या या दुरडीत कडबू (कर्नाटकातील खास पक्वान्न) देण्यात आले होते. त्या कडबुमध्ये पत्नी चंद्रा हिने सळ्या कापायचे कानस घातले होते. याच कानसाचा उपयोग करून लक्ष्मण व नरसा यांनी जेल फोडून पलायन केले होते. लक्ष्मणची पत्नी चंद्रा देखील धाडशी शूर व साहसी होती. दऱ्याखोऱ्यात फिरत असलेल्या आपल्या पतीला, त्यांच्या टोळीला ती अन्न, पाणी व रसद पुरवायची.
व्यंकाप्पा नाईकाने केला घात
ज्या व्यंकाप्पा नाईकाने वीर सिंदूर लक्ष्मण व त्यांच्या टोळीला सर्वतोपरी सहकार्य केले त्याच व्यंकाप्पाला हाताशी धरून इंग्रजांनी क्रांतीकारक वीर सिंदूर लक्ष्मणाचा घात केला. इंग्रजांनी धूर्तनीतीचा अवलंब करीत व्यंकाप्पा नाईकालाच फितूर केले. त्यांचे वतन खालसा करण्याची धमकी देण्याबरोबरच जादा जमीन व वतन देण्याचे आमिष व्यंकाप्पाला दाखविले. एका अमावस्येच्या रात्री व्यंकाप्पाने वीर सिंदूर लक्ष्मण व भाचा नरसा याला गावाबाहेर असलेल्या देवळाच्या आवारात जेवणासाठी बोलावले. यात काही दगाबाजी असेल अशी शंका न आल्याने वीर लक्ष्मण बिनधास्त व्यंकाप्पा यांच्या आमंत्रणाला मान देऊन जेवणास गेला. व्यंकाप्पाने जेवणाची तयारी केली होती तर
इंग्रज शिपायांनी सर्व परिसर घेरला होता. लक्ष्मण ओळखता यावा म्हणून व्यंकप्पाने लक्ष्मणच्या बाजूला कंदील ठेवला. लक्ष्मणने जेवणास सुरूवात करताच लपलेल्या इंग्रज शिपायांनी वीर सिंदूर लक्ष्मणावर फैरी झाडल्या. या दगाबाजीने सिंदूरच्या या लक्ष्मणाचा बळी घेतला व जतचा पहिला क्रांतीकारक होण्याचा मानही त्याला मिळाला.
सिंदूर कट्टा
क्रांतीकारक वीर सिंदूर लक्ष्मणाला ज्या ठिकाणी गोळ्या घालून इंग्रजांनी ठार मारले तो भाग जमखंडी संस्थानातील कल्लोळी गावानजीक आहे. गोळ्या घातल्यानंत लक्ष्मण धारातीर्थी पडला. त्या कट्ट्यासआजही 'सिंदूरचा कट्टा' म्हणून ओळख जाते. तेथे त्यांची समाधी बांधण्यात आली असून त्या समाधीवर सिंदूर लक्ष्मण नाव देण्यात आले आहे. क्रांतीकारक सिंदूर लक्ष्मणाच्या कथा आजही परिसरात आवर्जुन जुन्या लोकांकडून सांगितल्या जातात. वीर सिंदूर यांच्य जीवनावर कर्नाटकात लावणीवजा पद्य नाटक काढण्यात आले होते. त्यासही महाराष्ट्र व कर्नाटक सिमेवरील लोकांतून भरघोस असा प्रतिसाद मिळाला होता. या नाटकावर बंदी घालण्याची नामुष्की इंग्रज व संस्थानावर आली होती.
सौजन्य-
' वैभवशाली जत '
संपादक लेखक . - श्री दिनराज वाघमारे
==================================
'वीर सिंदूर लक्ष्मण ' महाराष्ट्रातील एक दुर्लक्षित क्रांतिकाच्या इतिहासावर टाकलेला प्रकाश.
सांगली जिल्ह्याचा पुत्र….. क्रांतीकारक…महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या वीर सिंदूर लक्ष्मण यांच्या क्रांतिकार्याची गोष्ट.....
सांगली जिल्ह्याचे पुत्र, क्रांतिकारी रामोशी समाजातील वीर सिंदूर लक्ष्मण जत तालुक्यात व कर्नाटकात ब्रिटीश सत्तेविरूद्ध बंड केले होते...
वीर सिंदूर यांचा जन्म सिंदूर ता. जत, जि. सांगली या गावात झाला. १८७८ दरम्यान त्यांचा जन्म झाल्याची माहिती त्यांचे पणतू लक्ष्मण नाईक (रा. सिंदूर, ता. जत.) यांनी दिली. त्यांच्या वडिलांचे नांव साबू व आईचे नांव नरसव्वा असे होते. लक्ष्मण यांचे लग्न भाची चंद्रव्वा (नंदेश्वर, ता. अथणी, जि. बेळगाव) यांच्याशी झाले होते. त्यांच्या घराण्याकडे परंपरांगत गावच्या कोतवालीचे काम होते. वडिलांच्या निधनानंतर लक्ष्मण यांच्याकडे कोतवालीचे काम आले. कोतवालीचे काम करीत असताला इंग्रज सरकार, सावकार, गावकामगार कुलकर्णी गरीबांवर कसा जुलूम, अन्याय, अत्याचार करत याचे दर्शन त्यांना झाले. सावकारीत व सरकारी कराव्या ओझ्यात बुडालेल्या सामान्य गरीबांची व्यथा पाहून त्यांनी बंडाची भूमिका घेतली.’
एका दुष्काळी रात्री लक्ष्मण घराबाहेर झोपले असताना दरोडेखोरांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. हे दरोडेखोर म्हणजे नरसू, साब, गोपाळ (रा. रडरट्टी, ता. अथणी, जि. बेळगाव) हे होते. हे तिघेही नात्याने त्याचे भाचे होते. यावेळी लक्ष्मणने दरोडेखोरांची खरडपट्टी केली. दरोडा टाकून लुटमार कर नका, गरिबांना छळू नका असा सल्ला त्यांना दिला. मात्र, दरोडेखोरांनी त्याला केवळ इंग्रजच देशाला लुटत नाहीत, तर गोरगरिबांच्या जमिनी, सोने,-नाणे, घरदार लुटणारी उच्चभ्रू श्रीमंताची टोळीच कार्यरत आहे हे पटवून सांगितले. अन्यायाची चीड येणारा लक्ष्मण या कहाणीने पेटून उठला व त्याने स्वतःचा गट तयार करण्याचा संकल्प केला. केवळ संकल्प केला नाही तर भाचा नरसू याला सोबत घेऊन गट तयार केला.
*जतचा जेल फोडला*
येथून पुढे त्यांनी जत तालुक्यातील विळूर येथील मन्या सावकार म्हणजेच मनोहर कुलकर्णी याच्या वाड्यावर दरोडा टाकला व धान्याची पोती लुटून नेली. लुटून नेलेली धान्याची पोती त्यांनी दुष्काळामुळे उपाशीपोटी मरणायतना भोगत असलेल्या गरिबांना मुक्त हस्ते वाटप केली. यानंतर त्यांनी दोन तीन ठिकाणी दरोडे टाकून सावकारांच्यावर व ब्रिटिश पोलिसांना मदत करणाऱ्यांवर जरब बसवली. सिंदूर गावातील हिरेमठ सावकाराला त्यांनी सावकारी बद्दल जाब विचारला. वरील सर्व घटना वरून जत पोलिसांनी त्याला अटक केली. मात्र, त्यांच्या भाच्यांनी जत जेल फोडून त्याची सुटका केली व सर्व जण कर्नाटकात फरार झाले. फरारी काळात डोंगर दऱ्यात मिळेल ते खाऊन त्यांनी दिवस काढले.
जत, अथणी, विजापूर, जमखंडी, बागलकोट परिसरात ब्रिटीशांना मदत करणाऱ्या सावकार व सरकारी अंमलदारावर दहशत बसावी म्हणून त्यांनी दरोड्याचे सत्र सुरुच ठेवले.
*कन्नड लोकगीतात आणि चित्रपटात सिंदूर लक्ष्मण यांचे चित्रण*
आजही कन्नड जानपद गीतात(लोकगीत), जात्यावरच्या ओव्यात, नाटक व चित्रपटात या विषयावर भाष्य करण्यात आले आहे. अनेक कन्नड ज्ञानपद गीतांनी कन्नड भाषिकांनी गारुड केले आहे. 1977 सालच्या बसवराज-वज्रमुनी यांचा वीर सिंदूर लक्ष्मण हा कन्नड चित्रपट आजही लोकप्रिय आहे.’सिंदूरद हुली'(सिंदूरचा वाघ), कर्नाटक वीर, क्रांतीवीर, बडवर कैवारी(गरिबांचा कैवारी) अशा उपाध्या लोकगीत, साहित्य, नाटक व चित्रपटातून त्यांना देण्यात आलेल्या आहेत. एका कन्नड लोकगीतात ‘होट्टी थुंब रोट्टी कोटर-बुट्टी थुंबी भंगार कोट्टू’ पोटभर भाकरी दिली तर त्या बदल्यात बुट्टी सोनं दिला) असे वर्णन आले आहे.
*सिंदूर लक्ष्मणला पकडण्यासाठी 10 हजारांचे बक्षीस*
निडोणी(ता.जि.विजापूर) येथील यात्रेत दुंडाप्पा नावाच्या पैलवानाने एका पैलवानाचा पराभव केला. यामुळे गावकऱ्यांनी दुंडाप्पाला मारहाण केली. यावेळी सिंदूर लक्ष्मण यांनी मध्यस्थी केली. दुंडाप्पा नंतर लक्ष्मणच्या गटात सहभागी झाला. आता लक्ष्मण, नरसू, साबू, गोपाळ आणि दुंडाप्पा असे पाच जण गटात होते. दरम्यानच्या काळात लक्ष्मण आणि त्याचे सहकारी जमखंडी मुधोळ, बिळगी, बागलकोट परिसरात राहत होते. जत पोलीस ठाण्याचे इन्स्पेक्टर म्हमूलाल कलाल यांनी लक्ष्मण याच्या गटाला पकडण्याचा विडा उचलात सिंदूर लक्ष्मणला पकडण्यासाठी इंग्रजांनी दहा हजारांचे बक्षीस जाहीर केले.
*इन्स्पेक्टर कलालचे शिर तोडले*
लक्ष्मण आणि त्याच्या सहकाऱ्यांचा तळ जमखंडी व कल्लोळी (जि.बागलकोट) येथे होता. यावेळी लक्ष्मण आणि त्याचा भाचा नरसू याने इन्स्पेक्टर कलाल याचे शिर धडावेगळे केले. ते शिर जतच्या मुख्य वेशीला बांधले. या घटनेमुळे इंग्रज संस्थान पोलीस आणि विजापूर जिल्हाधिकाऱ्यांचे धाबे दणाणले. लक्ष्मण याने इंग्रज अधिकारी गार्नर याची हॅट बंदुकीच्या गोळीने उडवली. यानंतर त्यांना अटक झाली. त्यांना जमखंडीच्या तुरुगांत ठेवले होते. लक्ष्मण आणि त्याचे सहकारी तोही तुरुंग फोडून पसार झाले. यादरम्यान बिळगी जिल्हा बागलकोट येथील व्यंकप्पा नाईक यांच्याशी सिंदूर लक्ष्मण यांची मैत्री झाली. नाईक यांनी लक्ष्मणला बंदूक भेट दिली होती.
*हिंडलंगा तुरुंग फोडून फरार*
दोनदा तुरुंग फोडून फरार झालेल्या वीर सिंदूर लक्ष्मण आणि सहकाऱ्यांना इंग्रजांनी अटक करुन बेळगाव येथील हिंडलगा तुरुंगात ठेवले होते. दोन तुरुंग फोडल्यामुळे सिंदूर लक्ष्मण आणि त्यांच्या सहकाऱ्यांना हिंडलगा तुरुंगात ठेवले होते. मात्र,हाही तुरुंग वीर सिंदूर लक्ष्मण आणि त्याच्या साथीदारांनी फोडला. हिंडलगा *तुरुंगात बेळगावच्या तरुण भारतचे संस्थापक बाबुराव ठाकूर लक्ष्मण सोबत होते. त्यांनी सिंदूर लक्ष्मण सोबतच्या आठवणी लिहून ठेवल्या आहेत* ठाकूर यांनी सांगितलेल्या आठवणीत सिंदूर लक्ष्मण यांच्या पर्यंत गांधींजीचे नाव पोहोचले होते, असे दिसून येते. महात्मा गांधीजीनी एक आदेश दिल्यास एकाही सायबाचा बंगला शिल्लक ठेवणार नाही, रात्रीत जाळून टाकतो, असे सिंदूर लक्ष्मण आणि त्यांच्या साथीदारांनी सांगितल्याची आठवण त्यांनी कथन आहे.
वीर सिंदूर लक्ष्मण यांचे बलिदान
हिंडलगा तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर वीर सिंदूर लक्ष्मण यांनी पून्हा एकदा जमखंडी-बिळगी-बागलकोट परिसरात ब्रिटीश सत्तेविरुद्ध काम सुरु केले. तीन तुरुंगातून पलायन केल्याने इंग्रज पोलिसांची झोप उडाली होती. तत्कालीन बेळगाव आणि विजापूर जिल्ह्यात पोलिसांचा फौजफाटा सिंदूर लक्ष्मण यांना पकडण्यासाठी सज्ज झाला होता. त्यांची नजर बागलकोट-बिळगी- जमखंडी परिसरावर होती. दरम्यान इंग्रज पोलिसांनी सिंदूर लक्ष्मण यांना दिसता क्षणी गोळी घालण्याचे आदेश मिळाले होते.
वीर सिंदूर लक्ष्मणला व्यंकाप्पा नायकाने बंदूक दिल्याची माहिती इंग्रजांना मिळाली. यानंतर इंग्रजांनी व्यंकाप्पा नायकाला वतन जप्त करण्याची धमकी दिली. या आणीबाणीच्या काळात व्यंकाप्पा नायक यांनी 13 जुलै 1922 रोजी जेवणासाठी सिंदूर लक्ष्मण व सहकाऱ्यांना बोलविले. जेवणाचे ठिकाण हे नागराळ जवळी कप्पुर पडियवचे (लक्ष्मी मंदिर) डोंगर होते.
या ठिकाणी अमावस्येच्या रात्री जेवणाचा बेत ठरला. हा दिवस सिंदूर लक्ष्मण यांच्या आयुष्यातील शेवटचा दिवस ठरला. रात्रीच्या वेळी जेवण करताना व्यंकाप्पा नाईक यांच्याकडे काम करणाऱ्या सोमा या गड्याने सिंदूर लक्ष्मण यांच्या पूढे कंदिल ठेवला. दबा धरुन बसलेल्या इंग्रज पोलिसांनी सिंदूर लक्ष्मण यांना ओळखून गोळ्या झाडल्या. या चकमकीच्या वेळी नरसू, साबू, गोपाळ व दुंडाप्पा निसटले. अशा रितीने ब्रिटिशांच्या विरोधात लढणारा एक झुंजार वीर, महान क्रांतिकारक. गरिबांचा वाली असणाऱ्या वीर सिंदूर लक्ष्मण यांना वीरमरण आले.
*महाराष्ट्राच्या भूमीत जन्म झालेला हा क्रांतीवीर महाराष्ट्रातच उपेक्षित राहिला आहे. वीर सिंदूर लक्ष्मण यांचा इतिहास मराठीत आणणे गरजेचे आहे. सिंदूर लक्ष्मण यांच्या जन्मगावी त्यांचे स्मारक झाले पाहिजे. सिंदूर लक्ष्मण यांचे वारसदार उपेक्षित अवस्थेत आहेत. महाराष्ट्र शासनाने त्यांचा स्वातंत्र्यवीरांचे वारसदार म्हणून सन्मान करण गरजेचे आहे. वीर सिंदूर लक्ष्मण यांच्या इतिहासाचे संशोधन करण्यासाठी संशोधन समिती स्थापन केली पाहिजे* शासनासोबत इतिहास अभ्यासकांनी वीर सिंदूर लक्ष्मण यांच्या कार्याचा अभ्यास करून हे क्रांतिकार्य जनतेसमोर माडण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे.
सौजन्य
प्रा.गौतम काटकर
(कला व वाणिज्य महाविद्यालय, सातारा. इतिहासाचे संशोधक)
आणि
प्रा. मानसिंगराव कुमठेकर.
मिरज येथील इतिहास संशोधक मंडळाचे संशोधक.
No comments:
Post a Comment