माझे इतर लेख वाचण्यासाठी ब्लॉगच्या होम पेज वर कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शनला जा आणि आपल्या आवडीचा ब्लॉग वाचा. आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना whatsapp, facebook द्वारे शेअर करा. किंवा पेजची लिंक तुमच्या whatsapp ग्रुपला share करा.धन्यवाद.....!

Saturday, December 28, 2019

गणित शिकण्यातील एक अडसर - मराठीतील अंकज्ञान

                                गणित शिकण्यातील अडसर - मराठीतील अंकज्ञान
अजूनही महाराष्ट्रातील दहावी बारावी बोर्डाच्या  परीक्षा देणाऱ्या  मुलांच्या मनात एक अनामिक भीती असते ,ती म्हणजे गणित पेपरची ...............
     याची अनेक कारणं असू शकतील ,पण बहुतांशी प्राथमिक शिक्षणात गणिताचा पाया कच्चा राहणे हे एक कारण नक्की असू शकतं. गणितात अंकज्ञान कच्चे राहण्याचे कारण काय ? यावर बऱ्याच तज्ञांनी आपापली मतं व्यक्त केली आहेत. पण अंकज्ञान कच्चे राहण्याची स्थलकाल परत्वे कारणं वेगवेगळी असू शकतील .पण भारतातील इतर राज्यांचा तुलनात्मक अभ्यास केला, तर असं लक्षात येते की दक्षिण भारतातील विद्यार्थी इंग्लिश आणि गणितामध्ये अग्रेसर असल्याचे चित्र आहे . मग महाराष्ट्रातील मुले का पाठीमागे आहेत ?
                 आज देखील प्रौढ व्यक्तीला एकोणवीस , एकोणतीस ,एकोणचाळीस, ................ नव्याण्णाव या संख्यालेखन करताना गोंधळात टाकतात. वास्तविक संख्या वाचन व लेखन हे डावीकडून उजवीकडे व्हायला हवे. मात्र मराठीतील संख्यालेखनात हा अपवाद दिसून येतो. मराठीतील अकरा ते नव्याण्णव (पूर्ण दशक संख्या सोडून )  या संख्या डावीकडून उजवीकडे वाचल्या जात नाहीत.
     मराठी भाषेतील दोन अंकी संख्यावाचन करताना  दशकाच्या आधी एकक काय आहे हे पाहावे लागते , तेव्हाच संख्या वाचता येते. केवळ दशक पाहून संख्यावाचन करता येत नाही. इंग्लिश भाषेतील अंक रचना लक्षात घेऊ या. ट्वेन्टी वन (21)पासून नाईनटी नाईन (99)पर्यंत डावीकडून उजवीकडे सहज वाचता येते आणि लिहिता देखील येते. भारतातील दक्षिणेकडील राज्यांत म्हणजे कर्नाटक (कन्नड भाषा), आंध्र प्रदेश , छत्तीसगढ (तेलगू भाषा), केरळ (तामिळी भाषा ) यांचे संख्याज्ञान इंग्लिश भाषेच्या धर्तीवर  आहे..…. किंबहुना इंग्लिशपेक्षा  देखील सोपं. कारण अकरा (11) पासून दशक आणि एकक उच्चारले जातात. त्यामुळे दशक , एकक  या संकल्पना लवकर स्पष्ट होतात .
              इयत्ता दुसरी अखेर जर  एक ते शंभर पर्यंत संख्या दृढ झाल्या नाहीत ,कच्या राहिल्या की गणित विषय मुलांना खरोखर अवघड वाटायला लागतो .
       मराठीत देखील ११ -साठी दहा एक , १२ - दहा दोन,१३- दहा तीन ,.......….  ९९- नव्वद नऊ अशी संख्यावाचन पद्धती स्वीकारायला हवी. या पद्धतीमुळे अंकज्ञान ,अंकलेखन आणि अंकवाचन गतीने होइल.
        आजची मराठी ही
Marathi + English = Marlish होत आहे.. मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी आजपर्यंत अनेकांनी प्रयत्न केले. त्यामध्ये जे पारिभाषिक शब्द तयार केले ते सर्वच शब्द आता आपण वापरत नाही. नाहीतरी मराठी भाषेने अनेक वळणे घेतली आहेत. त्यापैकी हे एक महत्वाचे वळण नव्हे काय ?
                चालू वर्षी शिक्षण क्षेत्रातील एका उच्च पदाच्या व्यक्तीने  ( अधिकाऱ्याने )हा समाजाचा भविष्यकाळ ओळखून बदल सुचवला होता . त्यामध्ये देखील अनिवार्य करा असं सुचवलं नव्हतं . विद्यार्थ्यांच्या पुढे दोन्ही पर्याय ठेवा असं सुचवलं असताना , शिकणाऱ्या पेक्षा शिकवणारांना जास्त अवघड वाटायला लागलंय. शिकवणाऱ्यांनी जास्त अवघड करून घेतलं. पंधरा वर्षापूर्वी पाढे देखील बदल करून म्हणताना अशीच अडचण वाटत होती .आता पाढ्याचा बदल आपण सर्वांनी स्वीकारला ना ? मग संख्यालेखनाचा हा बदल आपण आज का स्वीकारू शकत नाही ? सन 2017 पासून मराठी पाठ्यपुस्तकात मॅन फॉल कॅश अशा शब्दांना स्थान दिले आणि नवीन दोन स्वरांची मराठीत भर घातली .
हा लेख वाचताना कदाचित लेखकाचा वेडेपणा वाटेल .पण आज आपण जी विरामचिन्हे वापरतो ती सर्व इंग्लिश भाषेतून स्वीकारलेली आहेत . हे किती जणांना माहीत आहे ? मग सोपी अंकज्ञान मांडणी आपण का स्वीकारू नये ?
      पूर्वी खेड्यातील लोक हे ३५ साठी तीसनपाच असं म्हणत होते. आपण हे कन्टीन्यू करायला हवे होते. पण हे मात्र नक्की की जो ओर्यंत मराठी भाषा नवीन अंकज्ञान मांडणी पद्धती स्वीकारणार नाही तो पर्यंत मराठीतून गणित शिकायला अवघड वाटत राहणार ....

🙏 🙏🙏🙏🙏
इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
 bhausahebmahanor.blogspot.com
ला भेट द्या. / ब्लॉगला फॉलो करा ./ subscribe करा .
🙏🙏🙏🙏🙏

🙏🙏share करण्या साठी  निळ्या रंगामधील whatsapp किंवा facebook वर टच करा.🙏🙏

3 comments:

  1. होय हे बरोबरच आहे.

    ReplyDelete
  2. हे झालं पाहिजे, आपण हा बदल स्विकारला आहे, इतर ही स्विकारतील.
    आपले विचार खूपच दिशादर्शक आहेत.

    ReplyDelete