माझे इतर लेख वाचण्यासाठी ब्लॉगच्या होम पेज वर कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शनला जा आणि आपल्या आवडीचा ब्लॉग वाचा. आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना whatsapp, facebook द्वारे शेअर करा. किंवा पेजची लिंक तुमच्या whatsapp ग्रुपला share करा.धन्यवाद.....!

आभार

आभार प्रदर्शन 


आभार व्यक्त करावयास शब्द  अपुरे पडायचे 

याच आमच्या भावना आणि शब्द  आमच्या मनाचे 

साठविलेल्या आठवणींचे आणि पाठविलेल्या क्षणांचे 



काही नाती नावापुरती असतात ;

आणि काही नात्यांना नाव नसतं .

आपल्या माणसांचे आभार मानायचे नसतात;

कारण त्यांच्या हृदयात एक गाव असतं


मंदिराचा कळस दिसावा म्हणून,
स्वतःला ते गाढून घेतात.
आणि आयुष्यभर पायात राहून 
प्रत्येकाचं ओझं झेलत राहतात.

मातीच्या गोळ्याला येतसे आकार 

सहजपणाने जन्मावा असे आजचे विचार 

आपण आलात आपले मनापासून आभार 


संपली मैफिल जरीही 

शब्द नाहीत संपलेले 

राहु, दया रसिका ध्यानी 

इथे  सारे पाहिलेले /ऐकलेले.....


मंदिराचा कळस,
पायाचे दगड झेलतात.
आयुष्यभर पायदळी राहून,
कायम वजन सोसत राहतात.


आभाराचे भार कशाला ? 

पाना फुलांचे हार कशाला ? 

हृदयामध्ये असेल घर 

तर त्या घराला दार कशाला? 

अशा कार्यक्रमाचे व्यक्तींचे  बोल साठवून ठेवणाऱ्या  सोहळ्याचे आभार मानण्यासाठी 

मी आमंत्रित करत आहे ....

श्री/श्रीमती ......................यांना ....

No comments:

Post a Comment