माझे इतर लेख वाचण्यासाठी ब्लॉगच्या होम पेज वर कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शनला जा आणि आपल्या आवडीचा ब्लॉग वाचा. आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना whatsapp, facebook द्वारे शेअर करा. किंवा पेजची लिंक तुमच्या whatsapp ग्रुपला share करा.धन्यवाद.....!

जिद्द

 

जिद्द

विझलो आज जरी मी,

हा माझा अंत नाही. 

पेटेन उद्या नव्याने,

हे सामर्थ्य नाशवंत नाही !


छाटले जरी पंख माझे,

पुन्हा उडेन मी.

अडवू शकेल मला,

अजुन अशी भिंत नाही .....!


माझी झोपडी जाळण्याचे,

केलेत कैक कावे.

जळेल झोपडी अशी,

आग ती ज्वलंत नाही.......!


रोखण्यास वाट माझी,

वादळे होती आतूर.

डोळ्यांत जरी गेली धूळ,

थांबण्यास उसंत नाही.....!


येतील वादळे, खेटेल तुफान,

तरी वाट चालतो.

अडथळ्यांना भिवून अडखळणे,

पावलांना पसंत नाही.......!



प्रेरणा


सजून सारे लोक आले  

क्षण आले अमृताचे 

त्या मनालाही कळाले 

भाग्य आपल्या मनाचे 


प्रेम मिळतं तेव्हा विश्वास वाढतो,

अन् आपलेपणाची साथ मिळते 

रसिकहो  ! तुमच्या टाळ्यांमधूनच 

आम्हाला जगण्याची प्रेरणा मिळते..........

 

 

कोणी पडत असेल तर हात द्यायला विसरू नका 

झुंजणाऱ्या शत्रूला देखील दाद द्यायला विसरू नका 

विसरलात सारे काही काल, आज,उद्या 

पण आजच्या कार्यक्रमात मात्र दाद द्यायला विसरू नका....! 


हृदयातले भाव हे डोळ्यांनी बघून कळत नसतात ,

भावनांचे बंध  सहज जुळत नसतात ;

मिळतील तिथे माणसे लाखोंनी हजारोनी 

पण तुमच्यासारखे रसिक हे रोज रोज मिळत नसतात....!



सर्वात मधुर स्वर या  मैफिलीत  गाण्याचा

पहाडातून  पाझरणाऱ्या पाण्याचा 

ना सतारीचा ना  तू बासरीचा ; 

ना गोंडस बाळाच्या पायातील पैंजनाचा 

सर्वात मधुर स्वर असतो त्यांचा 



सुरा मधल्या हाकेला ; सुरांमधून साथ द्यावी 

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मनापासून दाद द्यावी 


जिथे जिथे विकृती असते तिथे विवाद होतात आणि जिथे संस्कृती असते तिथे संवाद होतात तेव्हा आपल्याशी संवाद साधण्यासाठी येत आहेत......................



No comments:

Post a Comment