माझे इतर लेख वाचण्यासाठी ब्लॉगच्या होम पेज वर कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शनला जा आणि आपल्या आवडीचा ब्लॉग वाचा. आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना whatsapp, facebook द्वारे शेअर करा. किंवा पेजची लिंक तुमच्या whatsapp ग्रुपला share करा.धन्यवाद.....!

सेवानिवृत्ती समारंभ सूत्रसंचालन

 

शाब्दिक स्वागत 

ज्ञानदानाचे  पवित्र कार्य  करून सेवेला पूर्णविराम देणाऱ्या गुरूला निरोप तितक्याच आदराने दिला गेला पाहिजे 

गेली (................... कित्येक ) वर्ष   सांगली जिल्ह्याच्या / महाराष्ट्राच्या विविध भागात ज्ञानदानाचे कार्य करून कित्येक पिढ्यांना सुजान सुसंस्कृत बनवणारे उच्च विद्याविभूषित , उच्च विचारांचे , निस्वार्थी स्वभाव , सर्वत्यागी वृत्तीचे ,  तसेच  मालकीहक्क जपणारे आणि मालकी हक्क सांगणारे ,  ज्यांच्या संस्कार पिठात अनेक  (...................राष्ट्रीय)  चारित्र्य निर्माण झाली ते/ त्या तेजांकित  सन्माननीय श्री / सौ .........................यांचा सेवानिवृत्ती समारंभ आज 

................................याठिकाणी संपन्न होत आहे.


या सेवानिवृत्त समारंभाच्या निमित्ताने कला , क्रीडा , साहित्य , विज्ञान तसेच सामाजिक ,राजकीय ,धार्मिक आणि विशेषतः शैक्षणिक क्षेत्रा सोबत विविध क्षेत्रातून आज या ठिकाणी उपस्थित झालेल्या  सर्वच आदर्शवत व्यक्तींचे  या ठिकाणी  मी श्री भाऊसाहेब महानोर  (अर्थात नातं जोडणारा आवाज / नातं आपुलकीचं ) मनःपूर्वक स्वागत  करतो . 

  देवताओ आणि सज्जनहो  आपल्या येण्याने आज फक्त या कार्यक्रमाची शोभा नाही वाढली ; तर आपण यावर एक उच्च कोटीचा संस्कार केला आहे. आपण फक्त सरांच्या सेवानिवृत्ती समारंभ साठी हजर नसून आपण हजर आहात 

 कर्तृत्वाच्या  या विचार मंचावर,  जिथे विराजमान झालेल्या सत्कार मूर्ती ने आपले उभे आयुष्य ज्ञान कुंडात हवन केले .  

आपण हजर आहात दातृत्वाचा या मंगल मंचावर जिथे विराजमान झालेल्या सत्कार मूर्तीने आपल्या उभ्या आयुष्यात त्यागाच्या वाटेवर आपलं आयुष्य झिजवले आणि सज्जन हो आपण हजर आहात नेतृत्वाच्या या मंचावर विराजमान झालेल्या सत्कार मूर्तीने आपले उभे आयुष्य जाणते पणाची नेतृत्वक्षम पिढी घडवण्यास  खर्ची घातली. 


 साथीयो आपण फक्त सरांच्या सेवानिवृत्ती समारंभ साठी हजर नसून आपण हजर आहात कर्तृत्वाच्या विचार मंचावर जिथे विराजमान झालेल्या सत्कार मूर्ती ने आपले उभे आयुष्य ज्ञान कुणाला तरी विना परतावा दिले .........

 

आपण हजर आहात दातृत्वाच्या  या मंचावर  जिथे विराजमान झालेल्या सत्कार मूर्ती ने  आपले आयुष्य  उभे त्यागाच्या वाटेवर पूर्णपणे ओम स्वाहा केले अर्थात  संपवले ....


कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी

संघर्षमय जीवन असावं लागतं 

आणि मोठा माणूस होण्यासाठी 

मन मोठं असावं लागतं 

कर्तृत्वाने आणि मनाने मोठे असलेले आदरणीय 

श्री ./ सौ. ........................ 

........................................

........................................


 या  सर्व अतिथींचे टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया 



आपण आलात आनंद वाटला 

शब्द असतात मोठे सुंदर आणि त्यांची जादू त्याहुनही सुंदर आज पुन्हा आपल्या चरणी समर्पित 

खरे तर आपणच या देशातील क्रांतीचे जनक आणि शिल्पकार सुद्धा 

सत्य असते सुंदर आणि स्वीकारणीय 

हे आपणच दाखवले  साऱ्या  विश्वाला

सार्‍या पवित्र ज्ञानाचे आपण तर जातिवंत उपासक


एकत्र येणं ही सुरुवात आहे 

एकत्र येणं ही सुरुवात आहे ,

एकत्र राहणे ही प्रगती आहे,

एकत्र काम करणं ही उन्नती आहे 

आणि सर्वांचे स्वागत करणं ही आपली संस्कृती आहे.


आजच्या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचे आणि उपस्थित सर्व श्रोत्यांचे  मी श्री. भाऊसाहेब महानोर अर्थात आवाज आपुलकीचा / नातं जोडणारा आवाज 

 मी शब्द सुमानांनी  स्वागत करतो 

आणि 

आपल्या मान्यवरांना व्यासपीठावर विराजमान होण्याची विनंती करतो ......




मानूनी आमचे अतीत 

झालात आपण उपस्थित 

ऋणात राहून  आपले करितो आम्ही स्वागत 



भावना हृदयात तयार होतात 

शब्दाच्या रुपाने त्या ओठांवर येतात,

त्यातून जे साकारते ते खरे स्वागत ........







भावना हृदयात तयार होतात,

शब्दांच्या रूपानं त्या ओठावर येतात ....

त्यातून साकारले  ते खरं स्वागत .......!






प्रतिमा पूजन / दीप प्रज्वलन 

नव कार्यसिद्धीसाठी स्मरण केले आपण 

बुद्धीची देवता  असणाऱ्या गणरायाचे

नांदण्यास नवचैतन्याची झळाळी अंगणी ,

दीपप्रज्वलन करावे  आपण कार्यक्रमाचे 


एक दीप लावून असा  ................... आदर्शाचा घेऊ वसा एक दीप लावू असा  ................ थोरामोठ्यांचा घेऊ वसा 

एक दीप लावू असा  ...................दातृत्वाचा जपू वसा 



अज्ञान अंधकाराचा होवो नाश ,

जीवनात येवो सदा प्रकाश,

समोर आहे दिव्यांची रास ,

आज आपल्या हस्ते येथे उजळावा प्रकाश....



अंधाराचा वेध घेणारा 

प्रकाशाचा शोध घेणारा 

जीवनी आनंद देणारा असा हा दिवा 

या दिव्याचे प्रज्वलन करूया अतिथींच्या या  शुभहस्ते 



पणती जपून ठेवा अंधार फार झाला 

थोडा उजेड ठेवा अंधार फार झाला 

असच अंधाराचं सावट इथल्या प्रत्येकाच्या मनातून दूर व्हावे या दिव्यत्वाच्या  ज्योतीने प्रत्येकाच्या जीवनात प्रकाशमय वाट यावी 

असा दिपप्रज्वलन सोहळा संपन्न होत आहे .............




कष्टेविना नाही फळ 

कष्टची नाही निष्फळ

निरोगी आरोग्य विना नाही बळ 

चंद्रा शिवाय चांदण्याचे नाही तळ 

दिपप्रज्वलन शिवाय कार्यक्रमाला नाही बळ 




अतिथींच्या आगमनाने 

गहिवरले हे सेवासदन 

अतिथींना विनंती ,

करून  दिपप्रज्वलन 

प्रसन्न करावे वातावरण 


आहे आपली संस्कृती प्रकाशाची 

शीतलता आहे त्यात चंद्राची

दीपप्रज्वलनाने करुया सुरुवात कार्यक्रमाची,

ही प्रथा आहे भारतीय संस्कृतीची ........




दूर सारू या अंधाराला 

प्रकाशाचे नवे दान देऊन  

सुरुवात करु  कार्यक्रमाची 

मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन 

दीपप्रज्वलन करून ............आजच्या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे ....


एकदा सूर्य मावळताना सर्व सृष्टीने आक्रोश केला 

तू गेल्यावर सर्व जग अंधारात बुडेल ....!

सर्व चिंतातुर .....?

एवढ्यात एक  पणती पुढे आली आणि म्हणाली 

मी संपूर्ण का काळोख दूर करू शकणार नाही पण माझ्या ज्योतीने या अंधाराला भगदाड निश्चित पाडीन.

अज्ञानाचा अंध:कार दूर करण्यासाठी करण्याची जी असलेली ज्योत प्रज्वलित करण्यासाठी मी निमंत्रित करतो  श्रीयुत..............................  यांना 




स्वतःसाठी जरी काही नाही करता आलं 

तरी इतरांसाठी जगून बघावं 

दुसऱ्यांच्या डोळ्यातील आसवं पुसताना,

त्यात आपलं प्रतिबिंब बघावं 

असं आदर्शवत जीवन जगणाऱ्या मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन होत आहे 





जगात जागृत देवता एकच आहे 

ती म्हणजे मानवता 

या मानवतेचा दीप अखंड प्रज्वलित रहावा 

व त्यातून आजच्या जगाला स्नेहाचा प्रकाश मिळावा , आशेचा किरण दिसावा 

म्हणून तमसो मा ज्योतिर्गमय ...........

या भावनेने  मान्यवरांनी दिपप्रज्वलन करावी ही विनंती 


एक ज्योत ज्ञानाची 

एक ज्योत स्नेहाची 

एक ज्योत प्रेमाची 

एक ज्योत मानवतेची 

एक ज्योत बुद्धीची 

एक ज्योत भावनेची 

एक ज्योत एकात्मतेची 

या सर्वांनी अज्ञानाचा अंध:कार दूर सारू या ........


अतिथींच्या आगमनाने उजळले भुवन 

दीपाच्या तेजातून येतील मांगल्याचे क्षण 

बुद्धीच्या स्वरूपास ही व्हावे भावपूर्ण नमन,

संस्कृतीचा सन्मान करण्या करू  दीपप्रज्वलन ..........


संस्कृती आहे आपली प्रकाशाची 

शीतलता आहे त्यात चंद्राची 

दीपप्रज्वलनाने करू सुरुवात कार्यक्रमाची 

हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची 

त्यासाठी  या मंगल प्रसंगी 

मान्यवरांना दीप प्रज्वलनासाठी विनंती करतो..........

श्रीयुत.............................. यांना 




स्वागतगीत 

गीत स्वागताचे आम्ही आज मनोभावे गातो आहे 

तुमच्याच कौतुकासाठी सज्जन हो 

फुले शब्दांची वाहतो आहे 


दीपा मधुनी उजळली ज्योती 

सुगंध फुलाचा आला 

स्वागत करण्या आथितींचे 

शब्द सुमने वाहू चला ..................!

शब्द सुमने चला ..................!



नेतृत्वाच्या विशाल अंगणी आपण 

समाज कार्याचा पाया घातला

कर्तृत्वाला दातृत्वाची जोड देत 

कळस  त्यागाचा उभारला 




कार्यक्रमाचे प्रास्ताविक


जीवनात यशासाठी नियोजन असावं लागतं 

तसंच कार्यक्रमाच्या यशासाठी देखील ,

योग्य ते प्रयोजन असावं लागतं  !

जाणून घेऊयात 

आजच्या कार्यक्रमाची पार्श्वभूमी 

अर्थात कार्यक्रमाचे प्रास्ताविक ................


उपस्थित मान्यवरांचे सत्कार 

वाढवली शोभा या मंचाची 

पायधूळ झाडून उत्तुंग कर्तृत्वाची ,

स्वीकारून छोटासा सन्मान आमचा 

उंची वाढवावी आपण सत्काराची 




प्रकाशले हे सदन आता ,

अशा माणसांच्या तेजाने 

स्वागत करू या मान्यवरांचे  आपुलकीच्या  भावाने 


काही माणसं मोठी असतात कर्तृत्वाने,

काही माणसं मोठी असतात नेतृत्वाने,



दाखवला तुम्हीच सामान्यांना जीवनाचा मार्ग 

तुमच्यामुळे  व्हावा   या गावगावांचा  स्वर्ग 

तुम्हीच दिला सामान्याला आधार 

तुमच्या कर्तृत्वाला  यावीत  अधिक धार 

राखतो मान आम्ही आपला 




पाकळ्यांचं गळणं म्हणजे फुलांचं मरणं असतं 

मरतानाही सुगंध देणं यातच आयुष्याचं सार असतं 

असं आयुष्य  जगणं म्हणजे खरच सोनं असतं ,

पण या आयुष्यात,

तुमच्या सारखे स्नेही मिळतात तेव्हा ,

हे जगणं सोन्याहून पिवळं असतं........!

असे हे आपले स्नेही /मार्गदर्शक / मुख्याध्यापक/  दिपस्तंभ श्रीमान ......................




तुमची संकल्पना असे नेहमी छान 

त्याची अंमलबजावणी ही असे छान छान 

भविष्यात वटवृक्षाचे आपण होणार आहात सुवर्णपान 

असे श्रीमान ...............


जे स्वतःच  एक भूषण आहेत ,

त्यांना कोणत्या भूषणाने  भूषविणार ........? 

आपल्या  कर्तृत्वाने समाजभूषण असे ठरलेले ,

आपले लाडके पाहुणे 

आदरणीय  मा . श्रीयुत.............................. यांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतो श्रीयुत.............................. यांना 



शब्दांना प्रत्यक्ष कृतीची जोड देऊन 

रंजल्या-गांजल्यांच्या भावना जपणारे 

लोकाभिमुख नेतृत्व म्हणजे  आपले सर्वांचे लाडके  सन्माननीय 

राजकारण , समाजकारण , शैक्षणिक, सांस्कृतिक औद्योगिक , कृषी , कला ,क्रीडा .......अशा विविध क्षेत्रात आपल्या दैदिप्यमान कर्तृत्वाची मोहोर उमटवणारे कृतिप्रवण व्यक्तीमत्व

 माननीय श्री ..............................



कोणत्याही अपेक्षे शिवाय 

कोणाचेही चांगले करण्याचा प्रयत्न करावा 

कारण एक जुनी म्हण आहे .........

 "जे लोक नेहमी फुले वाटतात त्यांच्या हातांना नेहमी सुगंध दरवळत राहतो ......!"

 


सत्यम शिवम सुंदरतेचा मंत्र असा असावा खास महान ध्येयवादी हवा दृष्टिकोन जगणे करू या छान छान 


संघर्षातून विकास घडतो जीवन घडते नवे नवे 

संघर्षातून घडतो माणूस यश मिळेल ते हवे हवे 




माउली नंतर समाधी नाही 

तुकोबा नंतर वैकुंठ गमन नाही 

शिवराया नंतर छत्रपती नाही 

गंधर्वा नंतर गाणं नाही 

माशा नंतर पोहणं नाही 

रामा नंतर आचरण नाही 

रावना नंतर श्रीमंती नाही 

गरुडा नंतर भरारी नाही

 तुमच्यासारखे महान कार्य पुन्हा पुन्हा होणे नाही 

असे  सत्कारमूर्ती श्री...............................




एकमेकांना गुंफत धागा पुढे पुढे जातो ,

अन्  वस्त्रातुनी  नवा आविष्कार जन्म घेतो,

अतूट अशा स्नेहाच्या धाग्याने गुंफलेली आपली नाती आणखी दृढ करण्याचा सुवर्णयोग जुळून आला आहे.....





रामाच्या सहवासात हनुमान धन्य झाले 

श्रीकृष्णाच्या सहवासाने अर्जुन सर्वश्रेष्ठ योद्धा झाले त्याप्रमाणे आज आपल्या सहवासाने आम्ही धन्य झालो 

असे आपले श्रीमान ................................




आपली माणसं आपलीच असतात 

आपल्यासाठीच ते कष्टत असतात 

म्हणून आपुलकीने आपल्या माना  त्यांच्या पुढे नतमस्तक होतात 




गावोगावी ज्यांची कीर्ती 

अशा आजची  सत्कारमूर्ती

गावोगावी ज्यांची कीर्ती 

अशी आजची सत्कारमूर्ती 

त्यांच्या शुभ कार्यातून चला आपण घेऊ या स्फूर्ती .........  !




नाही पाहिलं सोनं नाणं,

पाहिली माणसं घडलेली 

नाही पाहिलं सोनं-नाणं पाहिली माणसं घडलेली 

मातीतून उगवून सुद्धा 

आभाळाला भिडलेली .....................!




आम्ही जन्मतो मातीत 

किती होणार का माती ? ........

खापराच्या  दिव्यामध्ये 

कधी भेटणार वाती ? 




काळ  जात राहतो 

काळ   जात राहतो  .......,

पण काळजात राहतो तोच खरा शब्द 

मान्यवरांचे हे शब्द सदैव आमच्या काळजात राहतील

असा विश्वास मी श्रोत्यांच्या वतीने व्यक्त करतो ............






शब्दही पडतील कमी 

आपल्या महानतेचा ठेवा वर्णन करताना 

आपल्या स्मृती आमच्या सोबत राहतील 

कायम वाटचाल करताना 





कविता नंतर फुलते ........!

आधी आपण फुलून यावं लागते

गाणे नंतर जुळते ........!

आधी आपण गाणे व्हावे लागते .




येतात पराभव जातात पराभव 

कायमचे का राहतात पराभव ?

ज्यांनी इतिहास घडवला 

त्यांनाही घडवत जातात पराभव .............!




परक्यांनाही  आपलसं करतील 

असे काही शब्द असतात 

शब्दांनाही कोडे पडावे 

अशी काही माणसं असतात,

आपलं भाग्य त्याहुनी  मोठं असतं 

जेव्हा अशी  माणसं  आपल्याला भेटतात .........! 




आयुष्य छान आहे पण  थोडे लहान आहे 

आयुष्य छान आहे पण थोडंसं लहान आहे 

अरे रडतोस काय वेड्या लढण्यात एक शान आहे काट्यातही फुलांची झुलती कमान आहे 

उचलून घे हवे ते ,  दुनिया एक दुकान आहे 

जगणे निरर्थक म्हणतो तो बेइमान आहे 


सुखासाठी कधी हसावं लागतं,

तर कधी रडावं लागतं.

कारण सुंदर धबधबा बनायला,

पाण्यालाही उंचावरुन पडावं लागतं ..........



वाऱ्याच्या झुळकेने मन सुखावते 

वाऱ्याच्या झुळकेने मन सुखावते 

झाडाच्या सावलीत मन विसावतं 

सूर्याच्या कोवळ्या किरणांनी प्रसन्न वाटतं ,

तसेच मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढते यांच्या कृत्याची जाणीव व आभार प्रदर्शन हे करतील 



ज्ञान हा ज्यांचा मान आणि प्रतिभा त्यांची सोबती

उत्तुंग कर्तृत्वापुढे त्यांच्या सारे झुकुन सलाम करती 


स्वप्न ती नव्हेत जी झोपल्यावर पडतात

स्वप्न ती नव्हेत जी झोपल्यावर पडतात 

स्वप्न ती जी की तुम्हाला झोपू देत नाहीत 

पण ते प्रत्यक्षात उतरवणारी माणसं 

फक्त हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच असतात 

असेच आपण आहात 



नेहमीच्या वाटेने जाणारे बरेच जण असतात 

परंतु स्वतःची वाट निर्माण करणारा एखादाच असतो नशिबवान तर सर्वच असतात 

नशीबाला बदलणारा एखादाच असतो 

जिंकणारे  बरेच जण असतात .

परंतु स्वकर्तृत्वाने जिंकणारा एखादाच असतो 



कर्तृत्वाची केली कसोटी 

यातच दिसते तुमच्या कार्याची सचोटी 

अथक श्रमाचा  पराक्रम  तुमचा 

आहे मानबिंदू आमचा 

कर्तृत्वाची घेऊ भरारी 

विश्वाच्या आकाशी 

कुशल कार्य अंगी  नेतृत्व खंबीर 

एकनिष्ठ आपल्या कार्याशी 



धरती मध्ये एक दाणा पेरला,

 की धरती आपणास 

असंख्य दाण्यांनी  टिच्चून  भरलेलं कणीस  देते .  

शब्दांचेही तसंच आहे 

आपण एखाद्याला एक शब्द दिला ,

की तो आपल्यावर प्रेमाच्या शब्दगंगेची उधळण करतो .  आमच्यावर नेहमीच प्रेमाची सावली असणारे 

श्री / सौ ............................. ... यांनी आपल्या शब्दगंगेत आपल्याला न्हाऊ  घालावं ....!



मन समुद्रासारखा विशाल ठेवा,

नद्या स्वतःहून तुम्हाला भेटायला येतील. 

मन समुद्रासारखे विशाल ठेवा ,

नद्या स्वत:हून तुम्हाला भेटायला येतील !

द्वेष नको  , माणसात विचार रुजवा ,

माणसं मशाल बनवून तुमच्यासाठी भेटायला येतील .

तेव्हा आपल्यात  विचारांचे  संस्कार रुजवण्यासाठी 

येत आहेत आदरणीय मा. 

 श्री / सौ ..............................................




आयुष्य म्हणजे  एक पत्त्यांचा खेळ आहे,

आयुष्य म्हणजे  एक पत्त्यांचा खेळ आहे,

चांगली पाने  मिळणे आपल्या हातात नसतं ,

पण मिळालेल्या पानावर चांगला डाव खेळणं ,

यावर आपलं यश अवलंबून असतं ...................



जी माणसं ध्येयाकडे नजर ठेवून 

वाटचाल करत असतात 

ती सतत 

धडपडत असतात 

लोकांच्या दृष्टीने ती  ' धड ' नसतात 

कारण ती नेहमीच  'पडत 'असतात .

खरं म्हणजे ती  'पडत ' नसतात .................

 तर ती पडता पडता घडत असतात. 




कोणी सन्मान करो वा  ना करो 

कोणी सन्मान करो वा  ना करो ......

चांगले काम करत रहा  ..!

सूर्योदय होत असताना करोडो लोक झोपेत असतात.

तरीही सूर्योदय होतच असतो ..





चांगल्या लोकांची इज्जत कधी कमी होत नाही 

जसे सोन्याचे शंभर तुकडे केले तरीही त्याची किंमत कधी कमी होत नाही.

चुकणं ही प्रवृत्ती 

मान्य करणे ही संस्कृती 

आणि सुधारणा करणे ही प्रगती 




कधी ऐकला आहे का ? 

रात्रीच्या काळोखाने सकाळ होऊ दिली नाही !


शब्दांच्या  तेजाने काय त्यांना प्रकाशित करावं 

भावनांच्या चौकटीत कशाला त्यांना साठवावं ?

चतुरस्त्र चौरंगी कार्यकर्तृत्व त्यांचं 

आम्ही फक्त आमच्या जीवनात उतरवावं


पाहुण्यांचे / मान्यवरांचे मनोगत 


स्वप्न ती नव्हेत जी झोपल्यावर पडतात

स्वप्न ती नव्हेत जी झोपल्यावर पडतात 

स्वप्न ती जी की तुम्हाला झोपू देत नाहीत 

पण ते प्रत्यक्षात उतरवणारी माणसं 

फक्त हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच असतात 

असेच आपण आहात 



नेहमीच्या वाटेने जाणारे बरेच जण असतात 

परंतु स्वतःची वाट निर्माण करणारा एखादाच असतो नशिबवान तर सर्वच असतात 

नशीबाला बदलणारा एखादाच असतो 

जिंकणारे  बरेच जण असतात .

परंतु स्वकर्तृत्वाने जिंकणारा एखादाच असतो 



कर्तृत्वाची केली कसोटी 

यातच दिसते तुमच्या कार्याची सचोटी 

अथक श्रमाचा  पराक्रम  तुमचा 

आहे मानबिंदू आमचा 

कर्तृत्वाची घेऊ भरारी 

विश्वाच्या आकाशी 

कुशल कार्य अंगी  नेतृत्व खंबीर 

एकनिष्ठ आपल्या कार्याशी 



धरती मध्ये एक दाणा पेरला,

 की धरती आपणास 

असंख्य दाण्यांनी  टिच्चून  भरलेलं कणीस  देते .  

शब्दांचेही तसंच आहे 

आपण एखाद्याला एक शब्द दिला ,

की तो आपल्यावर प्रेमाच्या शब्दगंगेची उधळण करतो .  आमच्यावर नेहमीच प्रेमाची सावली असणारे 

श्री / सौ ............................. ... यांनी आपल्या शब्दगंगेत आपल्याला न्हाऊ  घालावं ....!



मन समुद्रासारखा विशाल ठेवा,

नद्या स्वतःहून तुम्हाला भेटायला येतील. 

मन समुद्रासारखे विशाल ठेवा ,

नद्या स्वत:हून तुम्हाला भेटायला येतील !

द्वेष नको  , माणसात विचार रुजवा ,

माणसं मशाल बनवून तुमच्यासाठी भेटायला येतील .

तेव्हा आपल्यात  विचारांचे  संस्कार रुजवण्यासाठी 

येत आहेत आदरणीय मा. 

 श्री / सौ ..............................................




आयुष्य म्हणजे  एक पत्त्यांचा खेळ आहे,

आयुष्य म्हणजे  एक पत्त्यांचा खेळ आहे,

चांगली पाने  मिळणे आपल्या हातात नसतं ,

पण मिळालेल्या पानावर चांगला डाव खेळणं ,

यावर आपलं यश अवलंबून असतं ...................



जी माणसं ध्येयाकडे नजर ठेवून 

वाटचाल करत असतात 

ती सतत 

धडपडत असतात 

लोकांच्या दृष्टीने ती  ' धड ' नसतात 

कारण ती नेहमीच  'पडत 'असतात .

खरं म्हणजे ती  'पडत ' नसतात .................

 तर ती पडता पडता घडत असतात. 




कोणी सन्मान करो वा  ना करो 

कोणी सन्मान करो वा  ना करो ......

चांगले काम करत रहा  ..!

सूर्योदय होत असताना करोडो लोक झोपेत असतात.

तरीही सूर्योदय होतच असतो ..





चांगल्या लोकांची इज्जत कधी कमी होत नाही 

जसे सोन्याचे शंभर तुकडे केले तरीही त्याची किंमत कधी कमी होत नाही.

चुकणं ही प्रवृत्ती 

मान्य करणे ही संस्कृती 

आणि सुधारणा करणे ही प्रगती 




कधी ऐकला आहे का ? 

रात्रीच्या काळोखाने सकाळ होऊ दिली नाही !



कितीही सुखद असली तरी

कुठेतरी संपणारी  वाट असते ,

पण संपणाऱ्या वाटे सोबत

जन्मणारी नवी पहाट असते. 


तेव्हा आजचा हा निरोपाचा सोहळा 

आपल्यासाठी  संपणारी  वाट न ठरता ,

उज्वल भवितव्याची पहाट ठरावी .........या शुभेच्छा 


सहवास सुटला म्हणजे सोबत काही सुटत नसते

निरोप दिला म्हणजे नाते काही तुटत नसते, 

धागे असतात जुळलेले हृदयाचे हृदयाशी 

आपला माणूस दूर गेला तरी प्रेम काही आटत नसते.


काही नाती तुटत नाहीत 

ती आपल्यात नकळत मिटून जातात .....

जशी बोटावर ठेवून रंग फुलपाखरू 

हातातून अलगद सुटुन जातात 



तुम्ही अपक्ष होतात 

तरीही सदैव आमच्या पक्षात रहाल 

कारण एक सच्चा माणूस म्हणून 

नेहमीच आमच्या लक्षात राहील 


केवळ आठवणीच  देऊन जाऊ नका

आम्हाला  आठवायचा चान्स ही  देऊन जा .............

जुने कर्ज फिटेल कधीही ,

पण नवीन  एक ऍडव्हान्स देऊन जा......


निरोपाच्या वेळी घ्यायचे नसतात हातात हात 

केवळ स्पर्श असतो सांभाळायचा मखमली हृदयात निरोपाच्या वेळी नसतात मोजायचे भूतकाळाचे क्षण 

हसून असतात स्वच्छ करायचे हृदयावरचे सारे व्रण  निरोपाच्या वेळी जराही व्हायचं नसतं निराश 

मनापासून स्वीकारायचा  असतो पुढील प्रवास 

निरोपाच्या वेळी फक्त एवढंच करायचं 

समोरच्याच्या डोळ्यातलं पाणी आपल्या डोळ्यात घ्यायचं ........


या रोजच्या आयुष्यात खूप माणसे येतात 

आणि खूप जातात 

त्यातली मोजकीच कायमची मनात राहतात 

जी खूप काही शिकवून जातात,

अमूल्य क्षण देऊन जातात............

खरंच काही माणसं कायमचं स्मरणात राहतात 


मिलना  था इत्तेफाक बिछड ना नसीब है 

दर्द होता है बिछडने का ऊनसे ...............

जो दिल के बहोत करीब है 


आपको रुखसत किया था 

हमे मालूम न था 

सारा घर ले जायेगा घर छोड के जाने वाला 


इथून दूर जाताना अलगद  डोळे भरून आले 

इथून दूर जाताना  आज का दुःख  झाले ? 

वेळेनेही  थांबून जावं  असं का घडत नाही ?

कारण इथून  पुढे  जाताना पाऊल पुढे पडत नाही ....


निरोप ऐकून घेतो आहे आला दुसरा बोलावा 

हृदयामध्ये जपून ठेवीन मी आपुलकीचा ओलावा 


असेच हे कसेबसे कसेतरी जगायचे 

कुठेतरी कधीतरी असायचे नसायचे 

असाच हा गिळायचा गळ्यामधील हुंदका 

कसेबसे तगायचे धरून  धीर पोरका 


सूर्यासारखे तळपुनी जावे क्षितिजावरुनी जाताना दगडालाही पाझर यावा निरोप शेवटी घेताना 


तुमच्या सोबतीतल्या 

प्रत्येक क्षणाची आठवण सदैव स्मरणात राहील

शक्यता तुम्हाला विसरण्याची 

फक्त आणि फक्त माझ्या मरणात राहील 


जरा दुरावा हवाच असतो प्रेम समजण्यासाठी 

निरोप आपला घेतो आहे पुन्हा भेटण्यासाठी 


मिलना था इतेफाक बिछडना नसीब है 

दर्द होता है बिछडने का ऊनसे 

जो दिल के बहोत करीब है

निर

उगवतीहून मावळतीला आता मी पोहोचलो आहे 

मार्गक्रमण  करताना स्मरणात अधिक साचले आहे 

एक दिवस मिटण्यासाठी काळजामध्ये विश्वास असतो

तक्रार नाही  अन् खंतही नाही ; संपण्यासाठी प्रवास असतो

आभार प्रदर्शन

उपस्थितीने आपल्या हर्षुन  गेले हे वातावरण 

मनोगताने आपल्या प्रेरित झाले हे सदन 

आदरातिथ्य करण्या आपले मनोभावे 

चरणी वाहतो आपल्या आभाराचे  शब्द सुमन 



आभार तुमचे मानावे तितके तुम्ही परके नाहीत 

आभार तुमचे मानावे तितके तुम्ही परके नाही 

आठवणीतून  तर भेटत राहू ,

जरी प्रत्यक्ष भेटलो नाही ..

आनंदाच्या या सोहळ्यासाठी नेहमीच ऋणात राहू 

नाते  हृदयात जपण्यासाठी एक दुसऱ्याच्या मनात राहू




कार्यक्रम झाला बहारदार ,

भाषण  झाले जोरदार , 

श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार,

तेव्हा आम्ही मानलेच पाहिजे सर्वांचे आभार 


काही नाती नावापुरती असतात 

आणि काही नात्यांना नाव नसतं 

आपल्या माणसाचे आभार मानायचे नसतात 

कारण त्यांचं हृदयातच एक गाव असतं.........!



 


आभार व्यक्त करावया 

कधी शब्द आम्हाला सुचले 

व्यक्त करावया स्नेह  

आम्ही शब्द शब्द  वेचले 

याच आमच्या भावना 

आणि शब्द आमचे मनाचे 

साठवलेल्या आठवणींचे आणि आठवलेल्या क्षणाचे ....




मुले इथली गोड गोजिरी 

जशा फुलांच्या माळा 

मानवतेचे पवित्र मंदिर 

अशी माझी सुंदर शाळा अशी माझी सुंदर शाळा 



सूरज हूं जिंदगी की रमक छोड जाऊंगा  ।

मैं डूब भी गया तो शपक छोड जाऊंगा 



सूर्य आहे मी तेजाचा, रणांगण  हे सोडून जाईन 

जरी मी बुडालो तरी ,  इथं माझा अंश सोडून जाईन



संतवाणी 




No comments:

Post a Comment