माझे इतर लेख वाचण्यासाठी ब्लॉगच्या होम पेज वर कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शनला जा आणि आपल्या आवडीचा ब्लॉग वाचा. आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना whatsapp, facebook द्वारे शेअर करा. किंवा पेजची लिंक तुमच्या whatsapp ग्रुपला share करा.धन्यवाद.....!

सत्कार

 कुणाचं तरी येणं  म्हणजे ,नुसतं येणं नसतं 

 आपल्याच  काळजावर कोरलेलं सुंदर लेणं असतं

 असेच या सुंदरतेचा साज चढवलेले

  .............यांचा सत्कार


आपली माणसं  आपलीच  असतात 

आपल्यासाठीच झिजतात ... 

म्हणून  आपुलकीनं आपल्या माना

त्यांच्या पुढं झुकतात .......


पाकळ्यांचं गळणं म्हणजे  फुलाचं मरण असते 

 मरतानाही सुगंध देणं  यात आयुष्याचं सार असतं......

 असं  जगणं म्हणजे सोनं असतं. 

 तुमच्यासारखे स्नेही मिळतील तेव्हा 

 जगणं सोन्याहून पिवळं असतं...


आपल्या सावली पासून  आपण काहीतरी  शिकायाला हवं !कधी  लहान तर कधी मोठं  होऊन जगावं.


हरण्याची पर्वा कधी केली नाही,

जिंकण्याचा मोह कधी  धरला नाही 

नशिबात असेल ते मिळेलच.....

परंतु प्रयत्न करणे सोडणार नाही ......

 या विचाराने प्रेरित ..............  


नाही पाहिलं सोनं नाणं,  पाहिली माणसं घडलेली 

मातीतून उगवुन सुद्धा आकाशाला भिडलेली 

........................यांचासत्कार ...............यांच्या हस्ते 


रुळलेल्या वाटेने जाणारे बरेच असतात 

परंतु  नवीन वाट शोधणारा  एखादाच असतो;

नशीबवान सर्वजणच  असतात 

पण नशिबाला  बदलवणारा एखादाच असतो.


ओठांना जे जमत जाही ते फूलं बोलतात 

मनातल्या भावना रंगामधून तोलतात. 

या  मनातील शब्दफुलांना मांगल्याचा गंध असतो 

तर मनापासून सत्कार करण्यात किती आनंद असतो ..!


कुणाचं तरी येणं  म्हणजे  ते नुसतं येणं नसतं

ते  तर तुमच्या  आमच्या हृदयावर कोरलेल सुंदर लेणं  असतं 


मान्यवरांचा सत्कार 

 

ज्यांची बाग फुलून आली त्यांनी दोन फुले द्यावीत 

ज्यांची बाग फुलून आली त्यांनी दोन फुले द्यावीत 

ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी दोन गाणी गावीत  आभाळाएवढी उंची ज्यांची त्यांनी थोडे खाली यावे 

मातीत मळले पंख ज्यांचे त्यांना थोडे उचलून घ्यावे 

प्रेमाचे हे शब्द आणि सत्कार आमचे स्वीकारावे 



काही माणसं मोठी असतात नेतृत्वाने 

प्रकाशले हे सदन अशा माणसांच्या तेजाने 

सत्कार करूयात मान्यवरांचा  



No comments:

Post a Comment