माझे इतर लेख वाचण्यासाठी ब्लॉगच्या होम पेज वर कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शनला जा आणि आपल्या आवडीचा ब्लॉग वाचा. आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना whatsapp, facebook द्वारे शेअर करा. किंवा पेजची लिंक तुमच्या whatsapp ग्रुपला share करा.धन्यवाद.....!

मैत्री

मित्र वणव्या मध्ये गारव्यासारखा

दुःख आडवायला उंबऱ्यासारखा ll
मित्र वणव्या मध्ये गारव्यासारखा ll धृ ll
वाट चुकणार नाही जीवनभर तुझी ll
एक तू मित्र कर ll  आरशासारखा ll १ ll
मित्र वणव्यामध्ये......दुःख आडवायला.......मित्र....

आत्महत्याच करणार नाही कुणी ll
मित्र असला जवळ जर  ll मनासारखा ll २ ll
मित्र वणव्यामध्ये......दुःख आडवायला.......मित्र....

फेक तू मुखवटे भेट झाल्यावरी ll
भेट रे दोसता  ll    दोसतासारखा ll ३ ll
मित्र वणव्यामध्ये......दुःख आडवायला.......मित्र....

चालताना मध्ये रात्र आली कधी ll
मित्र येतो पुढे  ll काजव्यासारखा ll ४ ll
मित्र वणव्यामध्ये......दुःख आडवायला.......मित्र....

मैतरी  चाटते गाय होऊन मना ll
जा बिलग तू तिला   ll वासरासारखा  ll ५ll
मित्र वणव्यामध्ये......दुःख आडवायला.......मित्र....

का उगा हिंडतो देव शोधायला ll
मित्र आहे जवळ  ll  मंदिरासारखा  ll ६ ll
मित्र वणव्यामध्ये......दुःख आडवायला.......मित्र....

दृष्ट लागू नये वेदनेची कुणा
दृष्ट लागू नये वेदनेची मना
मित्र डोळ्यामध्ये   ll काजळासारखा ll ७ ll
मित्र वणव्यामध्ये......दुःख आडवायला.......मित्र....

जळताना मला देह ठेवा असा ll
हात खांद्यावरी  ll   टाकल्यासारखा ll ८ ll
मित्र वणव्यामध्ये......दुःख आडवायला.......मित्र
....

No comments:

Post a Comment