पूर्वी होती सुंदर बनाई
तिथे प्रकटली शाकंभरी आई !
महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे
श्रष्दास्थान म्हणजे बनाळीची श्री बनशंकरीदेवी. या देवीचे
मूळपीठ हे विजापूर जिल्ह्यातील बदामीजवळ चोलचगुडु येथे
असून त्याचे उपपीठ हे सांगली जिल्ह्यातील प्रसिद्ध देवस्थान
श्रष्दास्थान म्हणजे बनाळीची श्री बनशंकरीदेवी. या देवीचे
मूळपीठ हे विजापूर जिल्ह्यातील बदामीजवळ चोलचगुडु येथे
असून त्याचे उपपीठ हे सांगली जिल्ह्यातील प्रसिद्ध देवस्थान
बनाळी ,ता -जत , जि-सांगली येथे आहे. बनाळीतील हे मंदिर रामदेवराय यादव यांच्या कालखंडातील असावे असा अंदाज बांधता येईल. मंदिर हेमाडपंथी असून अत्यंत रमणीय स्वरूपात वसले आहे.
बनशंकरी देवीबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते.
जत तालुक्यातील शेगांव वाळेखिंडी येथील एक भटजी व
दोन ब्राम्हण हे तिघे या देवीचे निस्सीम भक्त होते. त्यांच्या
परमभक्तीने देवी त्यांना प्रसन्न झाली. भक्तांच्या इच्छेखातर
देवीने बदामी भक्तासोबत शेगाव गावी येण्याची कबुली
दिली. परंतु देवीने भक्तांना मागे वळून न पाहण्याची अट
घातली .त्याप्रमाणे हे तीन भक्त मजल-दरमजल करीत शेगाव गावी परतत असताना बनाळी येथे आल्यानंतर या भक्तांनी देवी खरोखरच आपल्या मागे येत आहे का म्हणून मागे वळून पाहिले. त्याचवेळी एक मोठी वीज कडाडली आणि देवी तिथेच अंतर्धान पावली. पुढे हेच देवीचे वास्तव्य बनून राहिले.
जागृत देवस्थान
पश्चिम महाराष्ट्रातील एक जागृत देवस्थान म्हणून हे देवस्थान
ओळखले जाते. बनशंकरी देवी कोणत्याही प्रकारचा
मांसाहार चालत नसल्याने येथील संपूर्ण गाव शाकाहारी आहे.
मांसाहार करून देवीच्या आवारात सुध्दा कोणी प्रवेश करू
शकत नाही. तसा कोणी प्रयत्न केलाच तर येथील वनराईत
असणाऱ्या मधमाशा आजही मांसाहारी व्यक्ती वर मरणाची
झडप घालतात. यावरून देवीची जागृतता लक्षात येते.
आगळे-वेगळे नवरात्र
नवरात्र हा या देवीचा सर्वात मोठा उत्सव. हा उत्सव मोठ्या
भक्तीभावाने या देवीचे भक्त साजरा करतात. अत्यंत
कडक पध्दतीने नवरात्र येथे केले जाते. घटस्थापना केल्यापासून ते तिसऱ्या दिवशीच्या रात्री देवी येथील पुजाऱ्याच्या स्वप्नात येऊन देवी काही भाकित वर्तविते, त्याला रजा असे म्हटले जाते. देवीने सांगितलेली रजा येथील पुजारी चौथ्या दिवशी सकाळी देवीने स्वप्नात सांगितलेले भाकित सांगून नवरात्र उपवासाची रजा संपवतो. म्हणजे इतक्या काळांपर्यंत या देवीचे नवरात्र कडक केले जाते. पुढे राहिलेल्या नवरात्र काळात केवळ,
खारिक, खोबरे, लिंबू पाणी , नारळाचे पाणी, यावरच त्यांचा फराळ चालतो.
निसर्गातील नंदनवन बनाळी
चारीही बाजूंनी डोंगराच्या उंच-उंच कडा आणि मधोमध
वनराईच्या कुशीतील श्री बनशंकरी देवीचे नयनरम्य मंदिर.
मंदिर पूर्वाभिमुख आहे. मंदिरातील मूर्ती देखील पूर्वाभिमुख आहे. येथे येणाऱ्या व्यक्तीचा थकवा कुठे पळतो तेच कळत नाही. आंबा, चिंच, जांभूळ,नारळ, पिंपळ, वड, निलगिरी, रामफळ, सिताफळ अशा अनेक झाडांनी नुसता फुलून गेलेल्या परिसर. मोर, लांडोर,ससे, सर्प, लांडगे, कोल्हे अशा विविध प्राण्याचेही येथे वास्तव येथे असते. येथील २५ एकराचा परिसर अत्यंत हिरवागार असून येथील सर्व जमिन पाणस्थळ आहे.
अतिप्राचीन व अद्भूत : बनाळी
बनाळी म्हणजे दुष्काळातील नंदनवन. राजकारण, समाजकारण व शिक्षण प्रसिध्द असलेले बनाळी हे जत तालुक्यातील गाव. श्री बनशंकरी देवीच्या सानिध्याने सर्वपरिचित आहे. जत शहराच्या उत्तरेस सुमारे बारा किलोमीटरवर असलेले संपूर्ण महाराष्ट्रातील एकमेव शाकाहारी गाव आहे , महाराष्ट्र, कर्नाटक आंध्रप्रदेशातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री बनशंकरी देवीचे बनाळी हे उपपीठ आहे. राजा रामदेवराय यांचा प्राचीन इतिहास लाभलेल्या या गावात अनेक प्राचीन वास्तू व वस्तुचा खजिनाआहे. एका टेकडीवर भक्कम तटबंदीच्या आत बनाळी हे गाव वसले होते, आज विस्तार झाला असला तरी जून्या तटबंदीचे अवशेष आपली साक्ष देत भक्कमपणे आहेत. गावाच्या दक्षिणेस बनामध्ये श्री बनशंकरी देवीचे प्राचीन आहे. देवीचे मूळपीठ हे विजापूर जिल्ह्यातील बदामीजवळ चोलचगन येथे अतिप्राचीन असून मूळ मंदिराच्या ठिकाणी पुर्वी हेमाडपंथी शैलीतील मंदिर हेमाडपंथी, बहामनी वास्तुकला मंदिर बांधल्याचे अनेक अवशेष आजही या ठिकाणी पहावयास मिळतात. देवीची मूळ मुर्ती ही अतिशय सुंदर व कालीका माता अवतारामधील आहे. काळ्या संगमरवरामध्ये अतिशय बारकाईने कलाकुसर करण्यात आहे. मंदिरासमोरील नंदादीप, नागदेवतेच्या मुर्ती, विरगळ असे अनेक अवशेष आजही पहावयास मिळतात. काही प्राचीन नक्षीकाम केलेले दगडही याठिकाणी आहेत. त्यावरून हे मंदिर प्राचीन कालीन असल्याचे पुरावे मिळत आहेत,
"पूर्वी होती सुंदर वनराई तिथे प्रकटली शांकभरी आई!"
अशा काव्यामधून देवीचा असा महिमा गौरविला जातो, बनशंकरी देवीस शाकू , शेकू, शाकी अथवा शेकाबाई असेही म्हंटले जाते. बनाळी येथे देवीच्या स्थापनेचा कालावधीउपलब्ध नसला तरी त्याबाबतची एक आख्यायिका सांगितली जाते, ती अशी. जत तालुक्यातील शेगाव व वाळेखिंडी येथे देवीचे तिघे निस्सीम भक्त होते. पूर्वी ते कर्नाटकातील बदामी येथे देवीच्या मूळस्थानी पायी चालत जात असत. त्यांच्या परमभक्तीने देवी त्यांना प्रसन्न झाली. भक्तांच्या इच्छेखातर देवीने बदामीहून भक्तांसोबत शेगाव गावी येण्याची कबुली दिली. प्रवासात भक्तांनी कुठेही मागे वळून पाहायचे नाही, अशी अट देवीने घातली होती. त्याप्रमाणे ते तिघे भक्त मजल-दरमजल करीत बनाळी गावाजवळ आले. देवी खरोखरच आपल्या मागे येत आहे का? अशी त्यांना शंका आली, म्हणून त्यांनी मागे वळून पाहिले. त्याचवेळी एक मोठी वीज कडाडली आणि देवी त्याठिकाणी अंतर्धान पावली. पुढे हेच ठिकाण देवीचे वास्तव्य म्हणून राहिले.
शाकाहारी गाव
शाकाहार हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. त्याला धार्मिकतेची जोड देण्यात आली आहे. तरीही संपूर्ण गावच शाकाहारी झाल्याची फारसी उदाहरणे नाहीत. महाराष्ट्रातील एक जागृत देवस्थान म्हणून बनाळीची ओळख तर आहेच. परंतु या बनाळीची एक आगळीवेगळी ओळख आहे. ती म्हणजे हे संपूर्ण गाव शाकाहारी आहे. महाराष्ट्रातील कदाचित हे एकमेव शाकाहारी गाव असावे. संपूर्ण गावच शाकाहारी बनण्यामागचा इतिहास असा आहे की, बनशंकरी देवीला कोणत्याही प्रकारचा मांसाहार चालत नाही. मांसाहार करून देवीच्या मंदिर परिसरातही कोणी प्रवेश करू शकत नाही. बनाळीचे लोक श्रध्देपोटी मांसाहार करित नाहीत. मांसाहार करून मंदिर परिसरात कोणी प्रवेश केला तर त्यांच्यावर मधमाशा हल्ला करतात.
मधमाशांनी हल्ला केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे कोणीही मांसाहार करित नाहीत, काहीजण याला अंधश्रध्दा मानतात, परंतु केवळ मांसाहार केलेल्याच व्यक्तींवर मधमाशांचा हल्ला होतो. इतर कोणासही या माशा इजा करित नसल्याचे आढळून आले आहे.
आगळे-वेगळे नवरात्र बनाळीचा नवरात्र उत्सव खूप प्रसिध्द आहे. संपूर्ण नऊ दिवस हा उत्सव सुरू असतो. नवरात्रीचा अतिशय कडक उपवास या कालावधीत केला जातो. ज्या भक्तांना पुजारी उपवासात फराळ करण्याची रजा देतात. ते फराळावर उपवास करतात.
नवरात्र काळात केवळ, खारिक, खोपरे, लिंबू, नारळाचे पाणी यावरच त्यांचा फराळ चालतो. नवरात्रीची सांगता यात्रेने होते. संपूर्ण नऊ दिवस बनाळीस यात्रेचे स्वरूप येते.
यात्रेनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते.
दुष्काळातील नंदनवन बनाळी वनराईच्या हिरवाईने नटलेले बनाळीचे सुंदर बन म्हणजे दुष्काळातील नंदनवन आहे. श्री बनशंकरी देवीचा परिसरास चारीही बाजूंनी डोंगराच्या उंच-उंच कडा आहेत.
मधोमध वनराईच्या कुशीतील श्री बनशंकरी देवीचे नयनरम्य मंदिर आहे. गर्द हिरव्या वनराईमुळे येथे येणाऱ्या भक्तांना आळा ददायक गारवा मिळतो. आंबा, चिंच, जांभूळ नारळ, पिंपळ, बड, निलगिरी, रामफळ, सिताफळ व विविध औषधी वनस्पतींनी । परिसर फुलून गेलेला आहे. मोर, लांडोर, ससे, सर्प, लांडगे, कोल्हे अशा विविध ह. धार्मिक महात्म व निसर्ग सौदर्य लाभलेले बनाळी
तालुक्यातील एक पर्यटनस्थळ आहे...
पराधीन राम मंदिर

बनाळी गावाच्या वेशीवर आणखी एक प्राचीन परंतु उपेक्षित मंदिर आहे. पडझड झाली आहे. हे मंदिर म्हणजे अतिप्राचीन वास्तूंचा व वारस्याचा खजिना आहे. मंदिरातील संपूर्ण देव्हारा हा विशेष धातूपासून बनविलेला आहे. त्यात राम, लक्ष्मण व सीता यांच्या मूर्ती आहेत.
कावडेबुवा हे पुर्वीची मंदिराचे पूजारी होते. त्यांची याठिकाणी समाधी आहे. कावडेबुवा यांचे वारसदार मंदिराची पूजा अर्चा करतात, मंदिरात जून्याकाळातील कावड आहे. ही कावड पितळी आहे. कावडीच्या लाकडी दांड्यावर चांदीचे मुखवटे आहेत. अत्यंत दुर्मिळ अशी ही कावड आहे. देवाची पालखीही पितळी आहे. मंदिरात अतियश प्राचीन कालीमातेची मुर्ती आहे. दगडावर कोरलेली ही सुरेख मुर्ती आहे.
मंदिराच्या पश्चिम बाजूस रथाची दगडी चाके व लोखंडी सांगाडा आहे. हा प्राचीन काळातील रथ आहे. या रथावर मुर्ती ठेवून शेजारच्या पाच गावात हा रथ जात होता. त्याच्यासोबत कावडेबुवा कावड घेऊन जात होते, असे अनेक प्राचीन अवशेष याठिकाणी पहावयास मिळतात.

No comments:
Post a Comment