माझे इतर लेख वाचण्यासाठी ब्लॉगच्या होम पेज वर कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शनला जा आणि आपल्या आवडीचा ब्लॉग वाचा. आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना whatsapp, facebook द्वारे शेअर करा. किंवा पेजची लिंक तुमच्या whatsapp ग्रुपला share करा.धन्यवाद.....!

सूत्रसंचालन कोटेशन्स / सुवचन /सुविचार

 जगता आलं पाहिजे...


मरता केव्हाही येतं पण जगता आलं पाहिजे, 

सुख भोगता केव्हाही येतं, पण दुःख पचवता आलं पाहिजे, 

यशाने माणूस उंच होतो, पाय जमिनीवर ठेवता आले पाहिजेत, 

मिळालेल्या यशात समाधान मानून आनंदाने जीवन जगता आलं पाहिजे, 

पाप काय कसेही करता येतं, पण पुण्य करता आलं पाहिजे,

ठेच जीवनात लागतेच ती,

 सहन करता आली पाहिजे.

 जगण्याच्या लढाईत उणीव कायम भासेल,

 ती उणीव भरता आली पाहिजे, 

हास्य आणि अश्रूंचा मिलाफ करून,

फक्त समाधानी जगता आलं पाहिजे..





पाण्यात आणि मनात साम्य ते काय दोन्ही जर गढूळ असतील तर दोन्ही आयुष्य संपवू शकतात.

 दोन्ही जर उथळ असतील तर धोक्याच्या पातळी कडेच ओढतात....

दोन्ही स्वच्छ असतील तर जातील तिथे आनंदवनच फुलवतात.

 पण पाण्यात आणि मनात मुख्य फरक तो काय* ?

 पाण्याला बांध घातला तर पाणी "संथ" अन् मनाला बांध घातला तर माणुस "संत" होतो*



भरले डोळे पुसण्यासाठी आपलं माणूस लागतं.

आनंदाचा उत्सव करण्यासाठी *आपलं माणूस* लागतं. 

कौतुकाने पाठ थोपटायला *आपलं माणूस* लागतं.

पाठीवर रट्टा द्यायलाही *आपलं माणूस* च लागतं.

अशी *आपली माणसं* सहजासहजी मिळत नाही. जमिनीची मशागत केल्याशिवाय पिवळं सोनं दिसत नाही. खत, पाणी मुबलक मिळालं की पीक कसं तरारून येतं. 

काळजात प्रेम, आदर, माया असली की *आपलं माणूस* भेटतं.




ऑनलाईनच्या जमान्यात सगळं काही घरपोच मिळतं.

भाजीपाला, किराणा, जेवण काही क्लिकवर घरी येतं.

एक गोष्ट मात्र मित्रांनो कधीही ऑनलाईन  मिळत नाही.

मन मोकळे करायला *आपलं माणूस*  कधी घरपोच येत नाही.. 

म्हणुनच सांगतो मित्रा,  पैशांबरोबर *आपली माणसं* पण जोडायला शिका. 

इगो, राग नि मत्सर सोडून नात्यांचे अतूट बंध  विणायला शिका.

नातं टिकवायला कधी तरी कमीपणा हा घ्यावाच लागतो.

नात्यांच्या श्रीमंतीनेच माणूस खरा श्रीमंत होतो. 


 *आपली माणसं* जोडणं खरंच इतकं काही अवघड नाही.

थोडासा दुसऱ्याचा विचार केला तर नातं कधीही तुटत नाही. 

सहजच केलेला फोन खरंच खूप आनंद देऊन जातो. 

धावती जरी भेट दिली तरी *आपला माणूस* सुखावतो. 


एकटं एकटं जगण्यात खरं सांग बरं काय मजा आहे ?

आपलं माणूस सोबत नसेल तर जीवन जगणं सजा आहे.

 

आपलं माणूस* सोबत असलं की नैराश्य दूर पळतं.

 आपल्या माणसांमुळेच* गड्या आयुष्य सुंदर बनतं.


 चांगली माणसं नेहमी आपल्या जवळ असावीत!* 

 माणुस काय आहे  हे महत्वाचं नाही*

 पण माणसात काय  आहे ,  हे खुप महत्वाच आहे

 

 *मेहनत तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जाते, जिथे नशीब पण तुम्हाला शोधत येते..

 *

वेळ दिसत नाही , पण खूप काही दाखविते, आपलेपणाही खूप जण दाखवितात...पण आपलं कोण आहे ते वेळच दाखविते..................

 

आयुष्यात पुन्हा सुरुवात करावी लागली तर घाबरु नका...कारण* *यावेळेस सुरुवात शून्यातून नाही तर अनुभवातून होते..................



प्रेम म्हणजे., समजली तर भावना., केली तर मस्करी., मांडला तर खेळ., ठेवला तर विश्वास., घेतला तर श्वास., रचला तर संसार.. , आणि निभावलं तर जीवन..


आजही पुन्हा तेच झाले... डोळ्यात माझ्या तुझे अश्रु आले...



आता मला सवय लागली आहे तुझ्याशिवाय जगण्याची,मग तू का आस लावली आहेस माझी परत येण्याची...




जगासाठी तुम्ही फक्त कोणी एक असाल, पण तुमच्यावर प्रेम करणार्‍याच जग तुमच्यात असते...


जडतो तो जीव, लागते ती आस



जपण्यासारखं बरचं काही उद्यासाठी राखून ठेवलंयं ह्र्दयाच्या पंखावरती तुझंच नाव कोरुन ठेवलय...



जर आयुष्य असेल तर तुझ्या सोबत असू दे...आणि जर मृत्यु असेल तर तुझ्या अगोदर असू दे...



जर मुलाला वाटते कि त्याच्या प्रेयसीने त्याच्या आयुष्यात परी सारखे येऊन नांदावे ...  तर त्यासाठी त्याने आधी तिच्यासाठी स्वतःच्या हृदयात स्वर्ग निर्माण केला पाहीजे !!!


जी भक्तीचं रूप घेऊ शकते तीच खरी प्रीती.


जीव दंगला, गुंगला, रंगला असा, पिरमाची आस तू 

जीव लागला, लाभला ध्यास ह्यो तुझा, गहिवरला श्वास तू...




जे जोडले जाते ते नाते, जी जडते ती सवय, जी थांबते ती ओढ, जे वाढते ते प्रेम ...



तीचं माझं नातं अस असावं 

कोवळया उन्हात जसं सोनेरी फुल फुलावं



तुझ माझ अस न राहता 'आपल' म्हणून जगायला प्रेम म्हणायचं असत...


तुझ्या असण्यात तर माझा 

आनंद जुडला आहे , 

तुझ्या डोळ्यात तर माझा 

गाव वसला आहे...




तुझ्या चेहर्‍यावरचा राग तुझ्यासारखाच गोड आहे... म्हणूनच माझ्या मनाची तुझ्याकढे ओढ आहे...



तुझ्यावर रुसणं, तुझ्यावर रागावणं,  मला कधी जमलंच नाही, कारण तुझ्याशिवाय माझ मनं,दुसऱ्‍या कुणात रमलेच नाही...


तिची तक्रार आहे कि, मी प्रत्येक मुलीकडे बघून हसतो कस सांगू तिला कि, प्रत्येक मुलीमध्ये मला तिचाच चेहरा दिसतो



प्रेम म्हणजे., समजली तर भावना., केली तर मस्करी., मांडला तर खेळ., ठेवला तर विश्वास., घेतला तर श्वास., रचला तर संसार.. , आणि निभावलं तर जीवन..


आयुष्यात तुझ्यावर इतके प्रेम करायचे आहे कि प्रेमाला वाटावे माझ्यात काही तरी कमी आहे...


*स्वतःला असं घडवा कि तुमच्याबद्दल*

*दुसऱ्यांना कोणी वाईट सांगितल*

*तरी त्यावर कोणीच*

*विश्वास नाही ठेवला पाहिजे..*

*यशाला हजारो नातेवाईक असतात,पण अपयश मात्र अनाथ असतं...*

  संधी येत नसते,*

*आपण ती आपल्या कार्यातुन निर्माण करायची असते.*

*नाव नाही झालं तरी चालेल पण काम असं करा की लोकांनी आपलं नाव काढल पाहिजे.#*   

 

     स्वतः ला सिध्द करण्यात वेळ घालवा* *लोक तुम्हाला प्रसिद्ध करण्यात वेळ घालवतील*.. 

: *खरंतर परकं कुणीच नसतं, विश्वास थांबला की माणसं परकी होतात आणि श्वास थांबला की शरीर...

     


कुणीतरी पुढे गेला म्हणून द्वेष करत बसण्यापेक्षा, 

आपण मागे का राहिलो हा विचार करा आणि चालत राहा... 


 स्पर्धा स्वत:शी करा जगाशी नाही..

 संयम ठेवला आणि प्रयत्न करणे सुरू ठेवले तर.....*

*कितीही वाईट परिस्थिती असो मार्ग निघतो च......!*


*कोणाच्या आयुष्यात जायचं असेल, 

      *तर आनंद घेऊन जा, कारण..... 

*दुःख तर आधीच त्यांच्याकडे असतं.


आपले डोळे तेचं लोकं उघडतात*

ज्यांच्यावर आपण*

डोळे बंद करून विश्वास ठेवतो..


वेळ दिसत नाही , पण खूप काही दाखविते, आपलेपणाही खूप जण दाखवितात...पण आपलं कोण आहे ते वेळच दाखविते..

आयुष्यात पुन्हा सुरुवात करावी लागली तर घाबरु नका...कारण* *यावेळेस सुरुवात शून्यातून नाही तर अनुभवातून होते..

  

मोडतोड करायला ज्ञान लागत नाही 

परंतु तडजोड करायला मात्र खुप शहाणपण लागते

           

जीवन म्हणजे एक विचित्र शर्यत आहे...

जिंकलो तर आपली माणसं मागे राहतात...

आणि हरलो तर आपली माणसं सोडून जातात..


 तुमचा शत्रू तुम्हाला जेवढी इजा करत नाहीत;

तेवढी इजा तुमचे नकारात्मक विचार करतात.


 शंभर लोकांच्या शर्यतीत पहिलं येण्यासाठी 99 लोकांपेक्षा वेगळं काहीतरी करावं लागत.


No comments:

Post a Comment