मंगलाष्टके
स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं, मोरेश्वरं सिद्धिदं ।
बल्लाळो मुरुडं विनायकमहं, चिन्तामणि थेवरंम ॥
लेण्याद्रिं गिरिजात्मकं सुरवरदं, विघ्नेश्वरम् ओज़रम् ।
ग्रामे रांजण संस्थितम् गणपतिः, कुर्यात सदा मंगलम ॥ 1 ॥
गंगा सिंधु सरस्वती च यमुना, गोदावरी नर्मदा ।
कावेरी शरयू महेंद्रतनया शर्मण्वती वेदिका ॥
क्षिप्रा वेत्रवती महासुर नदी, ख्याता गया गंडकी ।
पूर्णा पूर्ण जलैः समुद्र सरिता, कुर्यात सदा मंगलम ॥ 2 ॥
राजा भीमक रुख्मिणीस नयनी, देखोनी चिंता करी ।
ही कन्या सगुणा वरा नृपवरा, कवणासि म्यां देईजे ॥
आतां एक विचार कृष्ण नवरा, त्यासी समर्पू म्हणे ।
रुख्मी पुत्र वडील तयासी पुसणे, कुर्यात सदा मंगलम ॥ 3 ॥
लाभो संतति संपदा बहु तुम्हां, लाभोतही सद्गुण ।
साधोनि स्थिर कर्मयोग अपुल्या, व्हा बांधवां भूषण ॥
सारे राष्ट्र्धुरीण हेचि कथिती कीर्ती करा उज्ज्वल ।
गा गृहस्थाश्रम हा तुम्हां वधुवऱां देवो सदा मंगलम ॥ 4 ॥
विष्णूला कमला शिवासि गिरिजा, कृष्णा जशी रुख्मिणी ।
सिंधूला सरिता तरुसि लतिका, चंद्रा जशी रोहिणी ॥
रामासी जनकात्मजा प्रिय जशी, सावित्री सत्यव्रता ।
तैशी ही वधू साजिरी वरितसे, हर्षे वरासी आतां ॥ 5 ॥
हेरंबा गणनायका गजमुखा, विघ्नेश्वरा मोरया ।
संगे घेऊनी शारदेस अजि या कार्यास धावून या ।
येऊ दे कुलस्वामी आणि अमुची माता कुलस्वामिनी ।
देण्या आशिष मंडपी वधुवरां कुर्यात सदा मंगलम ॥ 6 ॥
पातिव्रत्य धरून थोर मिळवी कीर्तीस तूं भवरी ।
सच्छीले कृतिनेही भूषित सदा दोहींकुलात करी ।
धर्मन्यायपथा धरूनि जगती पावा पहा गौरव ।
लाभोनि पतिचे सुख हरि कृपे तूं अष्टपुत्रा भव ॥ 7 ॥
गोत्रे भिन्न परस्पराहूनि तशी की भिन्न जयांची कुळे ।
जीवे एकचि होती ती वरवधू आजन्म ज्याच्यामुळे ।
तो ये ईशकृपे घडून सदनी मांगल्या वैवाहिक ।
दाम्पत्या चिरनित्य शंकरकृपे कुर्यात सदा मंगलम ॥ 8 ॥
आली लग्न घटी समीप नवरा घेऊनी यावा घरा ।
गृहयोक्ते मधुपर्क पूजन करा अंतःपटाते धरा।
दृष्टादृष्ट वधूवरा न करतां दोघे करावी उभी ।
वाजंत्रे बहु गलबला न करणे, कुर्यात सदा मंगलम ॥ 9 ॥
No comments:
Post a Comment