माझे इतर लेख वाचण्यासाठी ब्लॉगच्या होम पेज वर कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शनला जा आणि आपल्या आवडीचा ब्लॉग वाचा. आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना whatsapp, facebook द्वारे शेअर करा. किंवा पेजची लिंक तुमच्या whatsapp ग्रुपला share करा.धन्यवाद.....!

विवाह - स्वागत

 विवाह सोहळ्यातील सूत्रसंचालन 


🌹भाग-1🌹

वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभः !

निर्विघ्नम्  करूमे देवंम्  , सर्व  कार्येषु सर्वदा !!

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

आगतम् ! स्वागतम् !! सुस्वागतम् !!!

सुस्वागतम् ! सुस्वागतम् !!सुस्वागतम् !!!

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

सुंदर  जिसके नामसे ,  पूर्ण हो सभी काम !

उपस्थित  सभी अतिथीयोंको 

........................... परिवार के कोटी कोटी प्रणाम !!

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

नाव ज्याचे शुभ घेता , व्हावे पूर्ण काम 

उपस्थित पाहुण्यांचे 

.......................... परिवाराकडून कोटी कोटी प्रणाम!!!

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

जिच्या कुशीतून हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न 

निर्माण झालं त्या

 राजमाता जिजाऊ !

ज्या महापुरुषानं  हे देखणं स्वप्न

सत्यामध्ये

उतरवलं ते  राजा शिव छत्रपती !

ज्या वारसदारानं हे देखणं स्वप्न 

खांद्यावर घेतलं-पेललं, ते राजा  शंभूछत्रपती ! !!

आमचं आराध्य दैवत ............

लोकमान्य राजमाता पुण्यश्लोक  अहिल्यादेवी होळकर 


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 या सर्व  महापुरुषांना प्रथमतः अवभिादन करुन  

 (इथे आपल्या

घराण्याच्या देवाचे नाव ) ........................ 

च्या वरदहस्ताने, अक्षतांच्या सुखद वर्षांवाने, सनईच्या मंजूळ सुराने, सप्तपदीच्या प्रदक्षिणेने, 

मंगळसूत्राच्या पवित्र बंधनाने, पार पडणाऱ्या शुभविवाह सोहळ्यास

आपण उपस्थित झाला आहात. 

त्याबद्दल आम्ही आपले मनापासून स्वागत करतो आहोत..

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

श्री छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने  पावन झालेल्या

महाराष्ट्राच्या पुण्यनगरीत   .....................  संतांच्या या पावन भूमीत  

....................... च्या आशीर्वादाने ,  

मराठमोळ्या वातावरणात चौघड्यासोबत  सनईच्या सुरेल स्वरात.

 हा विवाहसोहळा मोठ्या आनंदाने संपन्न होत आहे ....

 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

पडता पाऊले तूमची, शोभा वाढे मंडपाची !

माथ्यावरती पडोत अक्षता, अपेक्षा तूमच्या आशीर्वादाची !!

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

काय चमत्कार आहे हा ?

कोण कोणाजवळ येतं.

तिथेच त्यांचा विवाह होतो ,

जिथे ज्यांचं भाग्य असतं ! 


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

मंडळी,

भारतीय संस्कृतीत संस्काराला खूप महत्त्व आहे. आपल्या संस्कृतीत 

 जे सोळा संस्कार सांगितले आहेत, त्यापैकी पंधरावा संस्कार म्हणजे विवाह ! विवाह सोहळा हा संस्कार समाजामध्ये  अत्यंत 

महत्वाचा  मनाला जातो.. 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

आजि सोनियाचा दिनू ,वर्षे अमृताचा घनू 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

..…................. परिवार म्हणजे 

......................येथील  नामांकित परिवार होय.

सर्वांच्या सुख दुःखामध्ये सहभागी  होणारा परिवार 

सर्वांना वेळोवेळी मदत करणारा परिवार 

आणि ह्या परिवारातील हा शुभ विवाह सोहळा

 संपन्न होत असताना  तेवढ्याच आपुलकीने या ठिकाणी उपस्थित राहिला आहात  ही .......................... परिवारासाठी आनंदाची गोष्ट आहे .

 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

तसं पाहायला गेलं तर 

हा विवाह सोहळा केवळ दोन क्षणांचा आहे. 

आणि आपली उपस्थितीही दोन क्षणांची आहे. 

परंतु 

आपले प्रेम, आशीर्वाद आणि  शुभेच्छा

…..................... आणि ......................

परिवाराला जन्मोजन्मी  पुरेल एवढ्या आनंदरुपी प्रेम देणाऱ्या आहेत.

हा  आनंद , हा स्नेह ,हे प्रेम, आणि हा  सन्मान लाभावा म्हणूनच  या दोन्हीही 

 परिवाराच्या वतीने  आपणास  आग्रहाचं , आपुलकीचं  निमंत्रण देण्यात 

आलं ... 

 तेवढ्याच आपुलकीने  आणि  आग्रहाने सर्वजण  सहकुटुंब,

सहपरिवार आणि इष्ट मित्रासाहित  विवाह सोहळ्यासाठी उपस्थित राहिला 

आहात. म्हणून आपले मनःपूर्वक  स्वागत...

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

तसं पहायला गेलं .....!

तर हा विवाहसोहळा  केवळ दोन क्षणांचा

आपली उपस्थिती देखील  दोन क्षणांची . 

परंतु आपले आशीर्वाद आणि शुभेच्छा 

.......................आणि ....................... या परिवाराला 

 जन्मभर पुरतील इतव्या नक्कीच आनंद देणाऱ्या आहेत.


हा आनंद प्रेभ. स्नेह  आम्हास लाभावा म्हणून 

.......................आणि ....................... या परिवाराच्या  वतीने आपण विनंतीपूर्वक आग्रहाचे निमंत्रण स्विकारुन  मनापासून इथं उपस्थित झाला आहात. त्याबद्दल इथं  उपस्थित सर्व पाहुणे, आप्त इष्ट , मित्र, गावकरी, मित्रमंडळी  

या सर्वांचं इथं सन्मानपूर्वक स्वागत ....


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


आनंदाचे डोही आनंद तरंग। 

आजचा दिवस म्हणजे शब्दांना देखील हिरवी पाने फुटण्याचा दिवस....

आणि ओठांना सुरेल गाणं सुचण्याचा दिवस 

दोन कुटुंबाच्या नात्यातील वीण घट्ट होण्याचा दिवस

दोन पाखरांना आधार मिळण्याचा दिवस. 



आशा या शुभ विवाहप्रसंगी आपण वधू वरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहिलात म्हणून आपले सहर्ष आणि मनःपूर्वक स्वागत ..

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


......…............... मंगलकार्यालयात /

..................(गाव) ........तालुका ........जिल्हा.........

येथील  चि.......................व

           चि.सौ. का. यांच्या  विवाह सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आपन सर्वजण उपस्थित झाला आहात. या ठिकाणी  मी सर्वाचे मी पुनःश्च एकदा स्वागत करतो ...

           

सुस्वागतम

सुस्वागतम

सुस्वागतम

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

जन्माला येतानाच प्रेम आणि  माया घेऊन आलेली

 चि. सौ. का................


तिच्या येण्याला घराला घरपण आले. 

उंबरठ्यावर लक्ष्मीची पावलं उमटली तशी 

अंगणात समृद्धीची पावलं आली 


(चि. सौ.का.)........ ..म्हाणजे लळा...............म्हणजे जिव्हाळा


आजपर्यंतचे दिवस पाखरांसारखे भुर्रर्रदिशी उडून गेले .

आज ती तितक्याच आनंदाने आणि  जड अंतःकरणाने सासरी जातेय.

डोळ्यात आठवणींचे प्रतिबिंब घेऊन.......


आता बदलतील जुने अर्थ.......येतील नवे संदर्भ ,  येईल नवी भाषा, ............नवा स्पर्श........नवी आशा ...


आता लहानपण हटणार, 

गाव सुटणार, 

आठवणी दाटणार ..........

एकबंध तुटणार............  

दुसरा  बंद जुळणार.....


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


 डोळ्यात आईच्या मायेचे  काजळ,

 गालावर अश्रूंचा ओघळ 

 छोट्या भावंडांची तळमळ

सोबतीला  काय .....? तर फक्त आठवणी


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

बोहल्यावरती वधु-वराचं आगमन होताना...


सनईचा मंजूळ  स्वर, 

चौघड्याचा गजर ,

कुंकुमतिलक, 

त्यावर उमटणारी सोनपावलं.

सुगंधाने भरलेले  वातावरण, 

आप्तेष्टांची लगबग,

पापण्यात आठवणी, 

नजरेत  भविष्याचा वेध,

नव्या जीवनाची सुखस्वप्ने घेऊन 

प्रितीची दोन पाखरे...... ............

भविष्याच्या दिशेने चालत आहेत. 

अनेक स्वप्ने उराशी  बाळगून  नव्या घरट्यात प्रवेश करत आहेत ...


 जे सजलं आहे ते रुणानुबंधाच्या धाग्यांनी

 ......…..........आणि ...............  

 ते घरटं उभं करण्यासाठी .

 आता  त्यांना हव आहे  पंखात बळ...................

 आपल्या आशीर्वादाचं ..........   



रूपी जडले लोचन । पायी स्थिरावले मन । 

देहभाव हरपला । तुज पाहता विठ्ठला ।।


दोन अनोळखी जीव,  कधीही  न भेटलेले. 

आज विवाहबंधनात अडकून ............

आयुष्यभर एकरूप होणार आहेत...


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


हा क्षण जन्मोजन्मीचं  नातं भासवणारा........

उपस्थतीने  वाढली, शोभा मंडपाची ! 

वधुवारांच्या वर  पडुद्या अक्षता आशीर्वादाची 


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖




आलात आपण मान्यवर 

आठवण प्रेमाची साठवून

उपकृत करावे;  

दोन घास जेऊन....!


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖




वधूवरांना  झालंय आता आभाळ ठेंगणं,

नांदा सौख्यभरे हेच आमचं सांगणं ...!


सप्तपदी चालावी  हातात हात धरून ।

लाभो  सुख शांती तुम्हा भरभरून ।




आप्तेष्ट  जमले सारे , 

साज श्रृंगार करून...........!

स्वा गताला उभे स्नेही,

नमस्कार करुन .....!





मंगलयमयी मंगलगाणे, मांगल्याचे सूरतराने ।

आनंदाव्या या समयाला लाखमोलाचे तुम्ही पाहुणे.





सासरी  जाणाऱ्या लेकीने आईला विचारले , 

"आई मी तिकडे नक्की  कशी वागू  गं ?" 

आईने दिलेलं थोडक्यात  पण अतिशय सुंदर उत्तर ......

" तुझ्या वहिनीने  तुझ्या आईबाबांशी कसं वागावं ?"  असं तुला वाटतं , तसं तू तुझ्या सासू सासऱ्याशी वाग"

एव्हढंच सांगेन ,बाकी तुझं तू ठरव ........"





विवाह म्हणजे दोन जीवांचे मिलन

आपल्या  सर्वांच्या साक्षीने , 

सनई चौघड्याच्या सुराने  नवजीवनात केलेले पदार्पण ...






आयुष्यातील एक मोहक वळण म्हणजे  विवाह......!




नवजीवनाची नवी पहाट 

आज सोनेरी  किरणांत नाहली ,

मौन स्वरांची मौन  भाषा 

आनंदित जाहली ......!





लग्नाच्या  हार्दिक शुभेच्छा ........!



ही लग्नाची बेडी

सहजीवनाची जोडी 

सुखाची परिभाषा 

प्रितीची गोडी....



सुखदुःखाच्या रेशीम द्याग्यांनी जोडल्या जाणाऱ्या  आयुष्यरूपी जीवननौकेतून सुखाच्या उद्यानात 

पदार्पण करणान्या वधुरास  आशीर्वादरूपी सुमनांचा  वर्षाव करण्यासाठी आपण आलात................. 

आम्ही आपले ऋणी आहोत.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖




प्रथम पूजावा श्री गणपती । शेषाच्या हाती धरतीची गती ।

ज्ञानदेवांनी चालवल्या  भिंती । अर्जुनाच्या रथावर श्रीकृष्ण सारथी ।

 होऊन गेले रती, महारती । 

 धन्य ती भारतीय संस्कृती। 

 



शिंपल्यातून निघते मोती। दैव ईश्वराच्या  हाती। 

तो जुळवितो नाती गोती । 

या शुभमंगल प्रसंगी आपली  उपस्थिती । 

आशीर्वाद द्यावे  ही विनंती........  

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

हळदीचे रंग खुलावेत 

तेजाची पहाट यावी

मेहंदीच्या पानावर 

एक कहाणी कोरली जावी 

कुंकवाच्या करंडयातून सौभाग्य उजळावं 

आमच्या  आनंद सोहळ्यात आपण सहभागी व्हावं आणि वधूवरास शुभाशीर्वाद दयावं. 

ही नम्र विनंती....


अबोलीची वेणी,

जाई जुईचा गजरा । 

...........आणि............ वरती 

सगळ्यांच्या नजरा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

केळीची कमान दारावर झुलणार। 

सनईच्या सनईच्या साक्षीने चौघडा  बोलणार ।

हळद अलगद ओली होणार ।

डौलाने बाशिंग भाळी इुलाणार । 

सावधान म्हणता अक्षता पडणार ।

कपाळाच्या कुंकवावर आता नवं नाव उमटणार ।

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖






आज मिती .........

दि.....................

या शुभमुहुर्तावर कार्य सिद्धीस नेणेसाठी  श्री समर्थ आहेत. विवाह होऊन .............…..........  घराण्याची लक्ष्मी ।जाईल ............ ........ घराण्याच्या उंबरठी।

होईल  सुवर्णमयी धरती । 

लाजवेल सूर्यचंद्रालाही । 

अशीच  शोभेल सून सासरी ।

मंगळसूत्राच्या दोन नात्यात

नवीन जबाबदाऱ्या स्वीकारेल ती ....


यासाठी हवंय शेकडो हातांनी , शेकडो हृदयांनी ,

भरभरून दिलेले आशीर्वादाचं बळ,

आपल्या सर्वांच्या साक्षीनं .....

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖




No comments:

Post a Comment