भाग १
पाठ १ भारत देश महान
भारत देश महान गीत ऐकण्यासाठी क्लिक करा .
इतर गीते ऐकण्यासाठी क्लिक करा .
गीतातील शब्दांचा अर्थ पहा , वाचा .
गीताचा आशय ,पहा , वाचा .
गीताचा अर्थ ,पहा , वाचा .
कवितेची मध्यवर्ती कल्पना:
सुजलाम-सुफलाम असलेल्या आपल्या भारत देशाची थोरवी या गीतामध्ये सांगितली आहे. भारतभूमीची शौर्य गाथा आणि समता व विश्वशांती ही मूल्ये ओजस्वी शब्दांत मांडली आहेत. भारताची मानवतावादी अभिमानास्पद परंपरा जपावी, हा संदेश या कवितेतून दिला आहे.शब्दार्थ:
महान – थोर. एकमुखाने - एकजुटीने. गान – गाणे, गीत. हिमशिखरे - बर्फाच्छादित डोंगरमाथा, भू - भूमी, जमीन. शिरी मस्तकावर, डोक्यावर. डोलती - डोलतात.
पवित्र- गंगा, स्नान - अंधोळ. बलिदान-आत्मसमर्पण, आत्माहुती. शौर्याचा – पराक्रमाचा, शूरतेचा. समता - समानता, एकता. विश्व करतो. राष्ट्राभिमान - देशाचा अभिमान, सार्थ गर्व.
- जग. जागवा-जागवा, जागृत
वीर – शूर लढवय्ये. रणांगण – रणभूमी. निशाण - ध्वज, झेंडा.
महाराष्ट्र गीत ऐकण्यासाठी क्लिक करा .
इतर गीते ऐकण्यासाठी क्लिक करा .
गीतातील शब्दांचा अर्थ क्लिक करा ,पहा , वाचा .
गीताचा आशय क्लिक करा ,पहा , वाचा .
कवितेचा भावार्थ:
देशवासीयांच्या मनात देशाभिमान जागृत करताना कवी म्हणतात भारतवासी जनहो, चला आपण आता 'भारत देश महान आहे, हे गीत एकमुखाने गाऊया. आपल्या भारताची थोरवी एकजुटीने गाऊ या.।। धृ.॥। माझ्या भारतभूमीच्या मस्तकावर हिमालयाची बर्फाच्छादित शिखरे डोलत आहेत. (जणू हिमशिखरांचा मुकुट भारतभूमीने मस्तकावर धारण केला आहे.) गंगा, यमुना व गोमती या नद्या आपल्या पवित्र पाण्याने जणू भारतभूला अंघोळ घालत
आहेत. ।।१।।
भारतभूमीचा हा नवीन इतिहास अपूर्व बलिदानाचा, शौर्याचा व पराक्रमाचा आहे. राष्ट्राभिमान जागृत करणारा समता व विश्वशांतीचा हा नवा इतिहास आहे. ।।२।।
या भारतभूमीच्या स्वातंत्र्यासाठी जे वीर शौर्याने लढले; स्वातंत्र्यसंग्रामाच्या रणभूमीवर प्राणार्पण करून जे पवित्रमय झाले; त्यांच्या बलिदानाने भारतभूमीचे स्वप्न रंगले आहे.
त्याची ग्वाही उंच फडकत असलेला आमचा राष्ट्रीय ध्वज देत आहे. आपले निशाण असेच अभिमानाने उंच उंच फडकत राहो. ।।३।।H
दोन्ही विषयांचा अभ्यास करण्यासाठी खालील आपल्या इयत्तेच्या लिंकवर क्लिक करा.
इयत्ता. 8️⃣वी
https://forms.gle/kmCGqTVed9yLAsdbA
No comments:
Post a Comment