आकाशाला गवसणी घालणाऱ्या शिक्षकांचा हा सन्मान नवनिर्मितीचा ध्यास घेतलेल्या गुरुजनांचा हा सन्मान जिद्दीने अखंड समाज घडविणाऱ्या शिक्षकांचा सोहळा
कला, उपक्रम, नाविन्यता कल्पकता यांनी कर्तव्याचा ठसा उमटविणाऱ्या माझ्या गुरुवार्यांचा सन्मान सोहळा या मंगल कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवरांचे सहर्ष स्वागत
आगतम स्वागतम सुस्वागतम
सोनेरी पायवाटेला स्पर्श करणाऱ्या
याच सोनेरी पावलावर पाऊल ठेवणाऱ्या,
ध्येयवेडे आणि स्वप्नपूर्तीसाठी झपाटलेले ,
बेहोषपणे शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या
माझ्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव येणार आहे..................
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. श्री/सौ.................... यांनी स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो.....
भितो प्रत्येक क्षेत्रातील अंधार
तुलाच फक्त या जगती
तुझ्या तेजातून दिसतात
झाकलेले माणिक मोती .
ज्योत स्नेहाची अन् त्यागाची
आज प्रज्वलित करून
तिचाच उजेडात उभे राहून
अंधकार अज्ञानाचा दूर करूया
मनाच्या गाभार्यात
मूर्ती आपली सजली
स्वागतास खास आपल्या
वाहतो ही सुमनांजली
मंझीले उन्हे मिलती है ,
जिनके सपनो मे जान होती है..........
सिर्फ पंख होने से कुछ नही होता!
हौसलोंसे उडान होती है !
आपल्या आदर्श शिक्षकांना सत्कार देऊन ,
प्रोत्साहित करून त्यांच्या पंखात बळ देण्यासाठी पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम सुरू होईल
सर तुम्ही घेतलात विद्या विकासाचा ध्यास
नवनवीन उपक्रमातून साधला गुणवत्ता हमखास
सर तुम्ही चालवली
साहित्याची चळवळ,
कार्यातून तुमच्या दिसते
गुणवत्तेची तळमळ
हास्य तुमच्या ओठावरचे
सदैव फुलत जावे
सौख्य, प्रेम , आनंद डुलत डुलत यावे
यशाच्या शिखरावरती विराजमान तुम्ही व्हावे
आनंदाच्या क्षणी अभिनंदन तुमचे करावे
मॅडम.....!
तुम्ही झालात गोर गरिबांच्या माता
सामाजिक शैक्षणिक कार्यातून दिसते तुमची गुणवत्ता
भावी यशासाठी खूप खूप शुभेच्छा
नवाकाळ नव्या दिशा ,
नवी उमेद नवी आशा
घ्या भरारी पतंगासवे
बहरू दे आमचे जीवन
यश मिळोत सारे सारे ,
फुलू दे , तुमचे प्रत्येक क्षण
कार्य तुमचं भिल्लासारखं ,
बाणावरती खोचलेलं
माती मध्ये उगवून सुद्धा
आभाळापर्यंत पोचलेलं
बालसेवेचा घेतला आहे;
ज्यांनी सदैव वसा
रात्रंदिवस मेहनत घेतात
उमटतो त्यांच्या कार्याचा ठसा
करुनी सेवा बालमनाची
अखंड तेवते वात सेवेची
माणुसकीचा झरा वाहतोय ;
वागणूक आहे विनम्रतेची
तुमच्या यशाचा वेल गगनाला भिडू दे
आयुष्यात सर्वकाही मनासारखे घडू दे
कार्याचे क्षितिज दूर दूर जाऊ दे,
कर्तव्यचा सुगंध दरवळत राहू दे !
यश सुख संपत्ती मिळत राहो ...!
या आमच्या शुभेच्छा तुम्हास लाभो ...!
ध्येयाला तुमच्या लाखो पंख यशाचे
प्रवासी जीवनाच्या स्वप्न गुणवत्तेचे
होण्या यशस्वी पाखरा; घ्यावी भरारी
आमचे शब्द तुम्हाला, लाख लाख शुभेच्छांचे
तुमच्या ध्येयाला लाभो
साथ सोनेरी पंखाच्या यशाची
ध्येयपूर्ती तुमच्या साथ
आमच्या लाख शुभेच्छा
जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे ,
भाग्यवान या शब्दाचा अर्थ
तुमच्या कडे पाहून कळू दे
गुणवत्तेसाठी देह झिजविला ;
कष्ट सोशिले चंदनापरी ......!
कष्टातून वसंत फुलविला
आज सन्मान त्याचा झाला......
शिखरे यशाची
सर तुम्ही करावी,
पाहता वळूनी मागे
शुभेच्छा आमची स्मरावी
पुरस्काराचे काय वाटत नाही ,
पण जबाबदारीची भीती वाटते ,
मात्र आपल्या शाबासकी ने किंमत अलगत मिळून जाते....!
नाही पंढरीशी जाणे , नाही केली कधी वारी ।
माझी कर्मभूमी , हीच माझी पंढरी ।।
माझा खडू-फळा, टाळ वीणा मृदुंग ।
फुले ज्ञानाची घेऊन , रोज रंगतो अभंग ।।
मन मोकळं कराया, जेव्हा येतात लेकरं ।
त्यांच्या डोळ्यातलं पाणी, माझं चंद्रभागा तीर ।।
त्यांचे दुःख निवारून, देतो दान आनंदाचे ।।
काही वेगळे आहे का , पुण्य देवदर्शनाचे ।।
ज्ञानदानाचे हे व्रत , हीच माझी एकादशी ।।
माझ्या लेकरांचे यश ,माझी प्रयाग काशी ।।
जेव्हा येतात लेकरं ,सुख-दुःख वाटायला ।
त्यांच्या रूपाने विठ्ठल , रोज येतो भेटायला ।।
दिवस हा आनंदाचा
दिवस हा सुखाचा
आजच्या दिवशी होतोय
सन्मान कर्तृत्वाचा
आनंदाच्या याक्षणी वर्षाव आमच्या शुभेच्छांचा
No comments:
Post a Comment