प्रेरणा
सजून सारे लोक आले
क्षण आले अमृताचे
त्या मनालाही कळाले
भाग्य आपल्या मनाचे
प्रेम मिळतं तेव्हा विश्वास वाढतो,
अन् आपलेपणाची साथ मिळते
रसिकहो ! तुमच्या टाळ्यांमधूनच
आम्हाला जगण्याची प्रेरणा मिळते..........
कोणी पडत असेल तर हात द्यायला विसरू नका
झुंजणाऱ्या शत्रूला देखील दाद द्यायला विसरू नका
विसरलात सारे काही काल, आज,उद्या
पण आजच्या कार्यक्रमात मात्र दाद द्यायला विसरू नका....!
हृदयातले भाव हे डोळ्यांनी बघून कळत नसतात ,
भावनांचे बंध सहज जुळत नसतात ;
मिळतील तिथे माणसे लाखोंनी हजारोनी
पण तुमच्यासारखे रसिक हे रोज रोज मिळत नसतात....!
सर्वात मधुर स्वर या मैफिलीत गाण्याचा
पहाडातून पाझरणाऱ्या पाण्याचा
ना सतारीचा ना तू बासरीचा ;
ना गोंडस बाळाच्या पायातील पैंजनाचा
सर्वात मधुर स्वर असतो त्यांचा
सुरा मधल्या हाकेला ; सुरांमधून साथ द्यावी
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मनापासून दाद द्यावी
जिथे जिथे विकृती असते तिथे विवाद होतात आणि जिथे संस्कृती असते तिथे संवाद होतात तेव्हा आपल्याशी संवाद साधण्यासाठी येत आहेत......................
न्याय नीती आणि सन्मार्ग हेच आमचे अधिष्ठान....!
राजे तुमच्यामुळे अनुभवतो हे स्वातंत्र्य,
स्वीकारणार नाही कदापि विचारांचे पारतंत्र्य
दुसऱ्याचं कार्य पुसून माझं कार्य मोठं कदापि करणार नाही
आमचं काम आमच्या गतीने करणे कधी सोडणार नाही
मला नाही मोठं व्हायचं ,
मला इतरांना मोठा करायचं आहे ...!
ही भावना आमच्या सर्वांच्या मनात आहे.
होत्या किती उमेदी ,
रचले मनी मनोरे.
खचले चिरे तयाचे,
परी हेच व्हावयाचे..!
मंदिराचा कळस दिसावा म्हणून,
स्वतःला ते गाढून घेतात.
आणि आयुष्यभर पायात राहून
प्रत्येकाचं ओझं झेलत राहतात.
मंदिराचा कळस,
पायाचे दगड झेलतात.
आयुष्यभर पायदळी राहून,
कायम वजन सोसत राहतात.
जिद्द
विझलो आज जरी मी,
हा माझा अंत नाही.
पेटेन उद्या नव्याने,
हे सामर्थ्य नाशवंत नाही !
छाटले जरी पंख माझे,
पुन्हा उडेन मी.
अडवू शकेल मला,
अजुन अशी भिंत नाही .....!
माझी झोपडी जाळण्याचे,
केलेत कैक कावे.
जळेल झोपडी अशी,
आग ती ज्वलंत नाही.......!
रोखण्यास वाट माझी,
वादळे होती आतूर.
डोळ्यांत जरी गेली धूळ,
थांबण्यास उसंत नाही.....!
येतील वादळे, खेटेल तुफान,
तरी वाट चालतो.
अडथळ्यांना भिवून अडखळणे,
पावलांना पसंत नाही.......!
कणा - कुसुमाग्रज
ओळखलंत का सर मला ?
पावसात आला कोणी ?
कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी.
क्षणभर हसला, नंतर बसला , बोलला वरती पाहूनी ।
गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुनी।
माहेरवाशीण पोरीसारखी ,चार भिंतीत नाचली ।
मोकळया हाती जाईल कशी ? बायको मात्र वाचली .
भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते ते गेले.
आठवण म्हणून डोळ्यांमध्ये पाणी मात्र राहिले. कारभारणीला घेऊन संगे पडकी भिंत बांधतो आहे.
चिखल गाळ काढतो आहे.
खिशाकडे हात जाताच.... हसत हसत उठला..
पैसे नकोत सर मला, जरा एकटे पण वाटला..!
मोडून पडला संसार , तरी मोडला नाही कणा.
पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा ......!
पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा ......!
No comments:
Post a Comment