माझे इतर लेख वाचण्यासाठी ब्लॉगच्या होम पेज वर कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शनला जा आणि आपल्या आवडीचा ब्लॉग वाचा. आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना whatsapp, facebook द्वारे शेअर करा. किंवा पेजची लिंक तुमच्या whatsapp ग्रुपला share करा.धन्यवाद.....!

लग्न - आभार टिप्स & चारोळ्या

 भाग -3

लग्न प्रसंगी उपस्थित सर्वांचे मान्यवरांचे आभार मानताना  टिप्स 

 

निमंत्रणाचा स्वीकार करून आपण या सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहिलात ;

आपली उपस्थिती आपलं प्रेम 

मनाला भावून गेले, सुखावून गेलं ;

खरंतर आपल्या येण्यामुळे  

या मंगलक्षणांना उत्सवाचे भरते आले 

आणि आपण मनापासून दिलेल्या शुभेच्छा रुपी आशीर्वाद आणि मनात आमच्या या क्षणी शब्दात व्यक्त न करता येणारे कृतज्ञ भाव आले 

म्हणून आपल्या प्रती ऋण व्यक्त करणे ही केवळ औपचारिकता नाहीच ....

ती तर आमची मानसिकता आणि आपली संस्कृतीआहे. धन्यवाद !!!!

तुमचं प्रेम स्मरून येताना, 

तुमच्या मायेत चिंब भिजून जाताना; 

आणि  तुमच्या समोर उभा राहून स्वागत करताना डोळ्यांमधून झरून येतं;  मन आनंदाने भरुन जातं 

आपले प्रेम आपले आशीर्वाद हीच आपली शक्ती 

आपण लग्नाला आलात, आनंद वाटला .......


सुखी संसार 


सप्तपदीच्या फेऱ्यांची ,पाळली वचने दोघांनी !

संसाराच्या वेलीवर, फुले उमलली दोन्ही !!


होती सोबत तुझी म्हणून ,जीवनास या अर्थ आला !

दोन चिमणी पाखरा मुळे ,संसार सुखाचा झाला !!


इवलसं हे घरटे आपलं , प्रेमाचा इथे निवास आहे!

सौख्य आनंदाचा जणू घरात झुळझुळ झरा वाहे !!


दोन चिमुकल्या सवे आता ,आपण आनंदाने नाचू या !

त्याचे भविष्य साकारण्याचे , स्वप्न एकच पाहुया !!


अपेक्षांचं ओझं आपलं, त्यांच्यावर लादायचं नाही !

होणार ते आपला आधार , घाई मात्र करायची नाही !!


हसत-खेळत त्यांच्या ,जीवनास देऊ आकार !

होतील भविष्यात नक्की, स्वप्ने त्यांची साकार !!


संस्काराचे मूल्य दोघे ,या चिमुरड्यांना देऊ !

त्यांच्या वाटेचे सारे दुःख, आपणच वाटून घेऊ !!


फेडतील  आपले पांग,  होतील शिकवून मोठे !

आनंदाला या आपल्या , राहील  पारावर कोठे ? !!


आयुष्याचा आपल्या आपण,  ध्येय एकच ठेवू !

स्वच्छ चारित्र्य व मानवतेचे , शिक्षण त्यांना देऊ !!


 लग्नसमारंभाच्या सूत्रसंचालनात उपयुक्त अशा चारोळ्या

 

 लगीनगाठ प्रेमाची ,सात जन्माची !

 संसारात एकमेकांना,  समजून घेण्याची !!

 

लग्नसोहळा मांगल्याचा,  दोन जीवांनी फुलण्याचा

अनेकांच्या स्वप्नांना , नवी दिशा देण्याचा!!


 लग्न एक हे बंधन ,ते फार नाजूक !

 दोघांचे मन हे एक, प्रेम  असावे साजूक!!

 

 लग्नसोहळा प्रेमाचा , समजून घेण्याचा !

 प्रत्येक क्षणी ,आनंदाने संसार करण्याचा!!

 

 लग्नसोहळा मांगल्याचा ,  दोन जीवाच्या मिलनाचा ! येणाऱ्या सुखदुःखातून ,  सुखी संसार मांडण्याचा !!

 

लग्न म्हणजे रेशीमगाठ, दोन जीव एकत्र करण्याची !

स्वप्न मनी सजलेली , लग्नबंधनात बांधण्याची  !!


लग्न म्हणजे सहजीवन ,बंधन प्रेमाचे !

जिवलगाला खूप  खूप ,सुखात बघण्याचे !!


लग्न दोन कुटुंबांना, आणते एकत्र !

साजरा करतो ,समाज मान्य सर्वत्र !!


लग्न म्हणजे दोन जीव, बांधणे सप्तपदीने  !

सुरुवात होते संसाराची, मधुर सहजीवनाने!! 


लग्नाचे बंधन ,प्रीतीचे संबंध !

कायमचे निभवावेत ,दोघांनी हे ऋणानुबंध !!


लग्नाची ही बेडी ,सहजीवनाची जोडी !

सुखाची परिभाषा, प्रीती ची गोडी !!

No comments:

Post a Comment