माझं(आमचं) आणि देवाचे एक सुंदर नातं आहे
जिथे मी/आम्ही जास्त मागत नाही अन् देव मला (आम्हाला) कधीच कमी पडू देत नाही ....
मी असं म्हणत नाही की आयुष्यभर साथ असू दया
पण जो पर्यंत सोबत आहे तोपर्यंत पाठीवरती हात असू दया
येणाऱ्या प्रत्येक क्षणाला माझं एकच सांगणं आहे ,
बाकी काही नको, तुमची सोबत राहो हे एकच मागणं आहे.
कष्टक-यांची जात आपली आपणही हे शिकलं पाहिजे पिंपळाच्या रोपासारखे पाषाणावर ही टिकलं पाहिजे
काळ्या आईचा लेक कधी संकटांना झुकला का?
कितीही तापला सूर्य तरी समुद्र कधी सुकला का?
बशी म्हणाली कपाला श्रेय नाही नशिबाला
पिताना पितात बशीभर अन् म्हणताना म्हणतात कपभर...!
कप म्हणाला बशीला तुझा मोठा वशिला
धरतात माझ्या कानाला अन् लावतात तुला ओठाला...!
अन् म्हणतात या चहा प्यायला.
कुणी मागतो सुखशांती कुणी धनधान्याची रास ।
मी वेडा देवाकडे मागत राहतो तुझा सहवास ||
आयुष्य माझे फुलले तुमच्या सहवासातील क्षणांनी ।
साथ दिलीत अशी की ओंजळ भरली सुखांनी ॥
तुमच्या आठवणींनी आजही डोळ्यांत दाटतं पाणी।
पुसून टाकतो पाहून की पहात तर नाही ना कुणी ॥
नाही ठेवला हिशोब अश्रूंचा, किती वाहिले किती राहिले। लपलेले दुःख राहिले हृदयाच्या आडोशाला
अन् पहाणाऱ्याने मला केवळ हसतानाच पाहिले ।।
अश्रू वहातात...................
पण जे आतच रहातात त्यांच दुःख अधिक आहे ||
कधी तुमच्या विचारांनी आमच्या मनाला थकू दिलं नाही। हसत हसत जगताना तुम्ही कधी सुकू दिलं नाही ॥
मनात खूप काही असतं सांगण्यासारखं
पण....
काही वेळा शांत बसणंच बंर असतं ..
आतलं दुःख मनात ठेवून अश्रू
लपवण्यातच आपलं भलं असतं ..
एकांतात रडलं तरी चालेल
लोकांमध्ये मात्र हसावंच लागतं...
जीवन हे असंच असतं ते आपलं असलं
तरी इतरांसाठी जगावं लागतं ...
दु:खाचे डोंगर कोसळले तरी
आयुष्याने पुन्हा सावरायला शिकविले,
सुखाचे पडणारे हळूवार चांदणे
आयुष्याने पुन्हा पाहायला शिकविले,
फुलाच्या वाटेवरचा प्रितीचा गंध
आयुष्याने पुन्हा घ्यायला शिकविले,
आपल्यासारखी गोड माणसे भेटली
आणि
आयुष्याने पुन्हा जगायला शिकविले!!!
No comments:
Post a Comment