जीवनाला हवी असते प्रकाशाची साथ
अज्ञानाचा अंधार जाळी समईतली वात
दीपप्रज्वलनाने करूयात कार्यक्रमाची सुरुवात
प्रत्येकाच्या जीवनातील अज्ञानाचा अंध:कार दूर करण्यासाठी ज्योतीची आवश्यकता आहे.
इवल्याशा ज्योतीनं सारा परिसर झगमगून जावा
यासाठी मान्यवरांना मी विनंती करतो.................... दीपप्रज्वलन करुन कार्यमाचे उदघाटन करावं..
मान्यवर जेव्हा दीपप्रज्वलन करीत असतात तेव्हा...........
उजळणार्या दिव्यांच्या तेजाने उजळो आमची मती
आकांक्षांना आकाश आणि बुद्धीला मिळो गती
विद्यादेवी शक्ती दे ज्ञानदेवा सरस्वती
विद्यादेवी शक्ती दे ज्ञानदेव गणपती
शब्दांच्या घेऊन ज्योती,
उजळू अज्ञानाच्या राती
शब्दाशब्दाने जोडत जाऊ
(जगी) मानवतेची नाती.
लौकिक जीवनाचे प्रतिक म्हणजे प्रकाश
जीवनाचे ध्येय म्हणजे प्रकाश
अंधाराचा ठाव घेणे म्हणजे प्रकाश
आज उजळणान्या ज्योती या
ज्ञानाच्या आहेत
प्रतिभेच्या आहेत
कालागुणांच्या आहेत
कर्तृत्वाच्या आहेत
यशाच्या आहेत
एक ज्योत ज्ञानाची
.................प्रेमाची
.................स्नेहाची
दिवसाची सुरुवात होते सूर्याच्या किरणा ने दिवसाची सुरवात होते सूर्याच्या केशरी किरणाने आणि कार्यक्रमाची सुरुवात होते दीपप्रज्वलनाने
तमसो मा ज्योतिर्गमय
म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणाऱ्या पूजनाला भारतीय संस्कृतीत साधारण महत्त्व आहे तेव्हा श्रोतेहो दीपप्रज्वलनातून आपण अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे आपल्याला घेऊन जाण्याची प्रार्थना माता सरस्वतीला करावी
No comments:
Post a Comment