भाग 2
सुस्वागतम ! सुस्वागतम !! सुस्वागतम !!!
आनंदाचे डोही आनंद तरंग
आनंदाची अंग , आनंददाचे
आजचा दिवस म्हणजे शब्दांना हिरवे पान फुटण्याचा दिवस! आजचा दिवस म्हणजे ओठाना सुरेल गाणं स्फुरण्याचा दिवस !
आजचा दिवस म्हणजे दोन पाखरांना काहीतरी मिळण्याचा दिवस !
आणि आजचा दिवस म्हणजे चंद्रही खिडकीत डोकावण्याचा दिवस !
अशा या मंगल सोहळ्या प्रसंगी आपण वधू वरास शुभ आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहिला आहात म्हणून आपलं मनःपूर्वक स्वागत
काळजातले भाव हे नजरेने बघून कळत नसतात
पावलांचे बंद नेहमीच जुळत नसतात
येतात येथे माणसे लाखोंनी -हजारोनी
आपल्या सारखी माणसं भेटण्यासाठी योग असावा लागतो
हा योगच भेटीचा चि. सौ.का.............व चिरंजीव ....................
यांच्या विवाह सोहळ्यानिमित्त जुळून आलेला
आणि म्हणूनच आपल्या सारखी प्रेम देणारी माणसं कार्य करणारी माणसं या विवाह सोहळ्यासाठी उपस्थित राहिले आहेत आणि राहताहेत.
मी .................. आणि.................
या परिवारातील असलेला हा आनंदाचा सोहळा.
या सोहळ्याचे वैशिष्ट्य काय असेल तर आपल्यासारख्या सर्वांची उपस्थिती
(मंगल कार्यालय ठिकाण)........................
(गाव) ..................
(तालुका) ..............
( जिल्हा) ....................... या ठिकाणी संपन्न होत असलेल्या विवाह सोहळ्याचे साक्षीदार बनण्यासाठी सज्ज आहेत . त्याचबरोबर या सोहळ्याचे साक्षीदार बनण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित झाला आहात या ठिकाणी सर्वांचे मी पुन:श्च एकदा स्वागत करतो.
सुस्वागतम !सुस्वागतम !!सुस्वागतम !!!
चि. सौ. का. .................
ती जन्माला येतानाच घेऊन आली प्रेम आणि माया
तिच्या येण्यानं घराला आलं घरपण .
उंबरठ्यावर लक्ष्मीची पावले उमटली .
समृद्धीचा संकेत देणारी.
ती म्हणजे लळा.
ती म्हणजे जिव्हाळा.
दिवस पाखरांसारखे भुर्रर्रर्र दिशी उडून गेले
डोईचा खानदानी पदर ढळू न देता,
आज ती सासरी जाते ,
डोळ्यात आठवणींच्या पाकळीचे प्रतिबिंब
आणि आता बदलतील जुने अर्थ,
येतील नवे संदर्भ आणि नवी भाषा , नवा स्पर्श नवी आशा. लहानपण हटणार ,गाव सुटणार फक्त आठवणी
डोळ्यात आईच्या मायेचे काजळ
गाली आठवणींचा ओघळ,
बहीण-भावाची तळमळ
एवढंच आता तिच्या सोबतीला.......
चला तर मंडळी (आपली) आपण वाट पाहतोय आपल्या शुभाशीर्वादांच्या बळावरच या स्वप्नांच्या वाटेवर तिला जे जे हवं ते ते मिळावं या अपेक्षेने म्हणूनच आपणास या मंगल सोहळ्याचे निमंत्रण पाठवले आहे...........
वधू-वरांचे बोलल्यावर ती आगमन होत असताना
सनईचा मंजूळ स्वर आणि त्यात मिसळलेला चौघड्याचा गजर , मंगलमय कुमकुम आणि त्यावर उमटलेली सोनपावलं ,
सुगंधाने भरलेलं वातावरण , आप्तेष्टांची लगबग
मुखावर प्रसन्न हास्य आणि पापण्यांवर नव्या जीवनाची सुख स्वप्ने घेऊन प्रीतीची दोन पाखरं अनंत स्वप्न उराशी बाळगून प्रवेश करत आहेत.
इवल्याशा नवीन घरट्यात ते सजला आहे आपल्या ऋणानुबंधांच्या धाग्यांनी उभारण्यासाठी त्यांना हवा आहे पंखात बळ आपल्या आशीर्वादाने
बोहल्यावर वधू वर पुष्पहार घेऊन उभे ठाकले असताना नवरीचा मनातील भाव
रुपी जडले लोचन, पायी स्थिरावले मन ।
देहभाव हरपला , तुझं पाहता विठ्ठला ।।
दोन अनोळखी जीव कधी न भेटलेले
वेगळ्या वातावरणात कुठेतरी वाढलेले
लग्न बंधनात अडकल्यावर
ते इतके एकरूप कसे होतात ?
काहीच नातं नसतांना , रक्ताच्या नात्यापेक्षाही इतके कसे एकजीव होतात ? कसं काय असतं या नात्यात की हे नातं जन्मोजन्मीचं वाटायला लागतं !
लोकांची काळजी एकमेकांसाठी जगण्याची उर्मी कोठून येत असेल हे काहीच कळत नाही ! पण हे असं घडतं खरं !
हे नातंच एक जगणं होऊन जातं !
आयुष्य या नात्यास अर्पण केलं जातं !
म्हणून लग्न हे बंधन असलं तरी ते एक अतूट नातं असतं
वेळात वेळ काढून आगमन केलात आपण मनापासून मनापर्यंत आपले सुस्वागतम
उपस्थितीने वाढली आहे शोभा मंडपाची वधू-वरांच्या डोक्यावर पडल्या अक्षदा आशीर्वादाची आलात आपण मान्यवर आठवण प्रेमाची साठवून लक्षात ठेवा आपण सर्वांनी जायचं जेवण वधूवरांना झालाय आभाळ अगदी ठेंगणं सौख्यभरे नंदा हेच आमचे सांगणे सप्तपदी चालावी हातात हात धरून लाभो सुख शांती तुम्हाला पुन्हा भरभरून पाहुणे आले सारे साजशृंगार करून स्वागताला उगीच नाही नमस्कार करून आजचा भाग याचा जोडा शोभे वधू-वरांचा सुरे सुरे घुमे सनईचा सोहळा हा मांगल्याचा मंगल समयी मंगल गाणे मांगल्याचे सूरत राहणे आनंदाच्या या समयी याला लाखमोलाचे तुम्ही पाहू नये
ेक्सी सासरी जाणाऱ्या लेकीने आईला विचारले आई मी तिकडे नक्की कसे वागू ग आई ने दिलेल्या थोडक्यात पण अतिशय सुंदर उत्तर तुझ्या वहिनीने तुझ्या आई बाबांची जसं असं तुला वाटतं तसं तू तुझ्या सासू-सासर्यांची वाघ एवढेच सांग ना बाकी तुझं तू ठरव
दोन अनोळखी जीव कधी न भेटलेले वेगळ्या वातावरणात कुठेतरी वाढलेले लग्न बंधनात अडकल्यावर इतके एकरूप कसे होतात
लग्न बंधनात अडकल्यावर इतके एकरूप कसे होतात काहीच नातं नसतांना रक्ताच्या नात्यापेक्षाही इतके कसे जीवन एक एकजीव होतात काय असतं या नात्यात की हे नातं जन्म जन्माचं वाटायला लागतं
विवाह म्हणजे दोन जिवांचा मधुर मिलन सनई चौघड्यांच्या मंजुळ स्वरात नवजीवन केलेले आरोप पदार्पण सुख स्वप्नाच्या पाकळ्यांचे गुणमिलन सासर माहेरच्या नात्यांची मंगळसूत्रात केलेली पवित्र गुंफण यासाठीच हवा शुभ आशीर्वाद आपला एक विवाह आयुष्यातील एक मोहक वळण अजून पुरेसा परिचय झालेला नातं तरी हव्याहव्याशा वाटणाऱ्या आपल्या जोडीदाराच्या हातामध्ये हात देऊन आयुष्याची नव्याने सुरुवात करायच्या तो क्षण अशा प्रसंगी त्यांना जरूर असते ती सदिच्छा व आशीर्वादाची त्यासाठीच आपली उपस्थिती होती अगत्याची ती उपस्थिती
आपण इथे दर्शन आपले शतशः आभार
काही नाती फुलवायची मोरपिसारा सारखे
काही नाती जपायची ते बिलोरी कांकना सारखी
काही नाती संभा मनाच्या कुपीत 17 तारखेची
अशीच नाती दृढ होऊन संपन्न होणार हा शुभविवाह सोहळा
नवजीवनाची नवी पहाट सोनेरी किरणांनी नाहली मौन स्वरांची मौन भाषा सणात परिती उमगली चिंबचिंब मनोहर ता प्रीत मेंदीत बिजली हलके हलके प्रेमा बंधना विरून गेली लग्नाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा
लग्न म्हणजे प्रवास दोन मनांचा प्रवास लोचन आतील त्या मोहक भावनांचा कळत नकळत झालेल्या त्या अबोल भेटीचा प्रवास डोळ्यातील सप्तरंगी भाव ओठापर्यंत मिलनासाठी आतुरलेल्या दोन नद्यांचा सुगंधी फुलांच्या मुंडावळ्या नेसलेली तू हाता पायाच्या तळव्यावर नाजूक नक्षी तुला सांगत आहे चल पुढे ये मी तुझ्या सोबत आहे प्रेमाच्या नाजूक नजाकतीने मेंदी भरल्या अलगद पावलांनी प्रिय सख्याला आपले शेखर लाजेचा घुंगट ओढले तुझ्या पापण्या ओल्या जमिनीवर उद्याच्या सुंदर संसाराची भवितव्याची चित्र रेखाटण्यात दंग आहेत पण भेटा तुझी स्वप्न तुझ्यात संसारातील अस्तित्व टिपक्या टिपक्यांची जोडत सर्कस साकारणाऱ्या रांगोळी सारखा सावंत प्रेम सन्मान हे आहेत डोंगरातून मिळणारे प्रतिसाद प्रतिसादासाठी घालावी प्रथम आपल्या ओठातून साद तुझ्या नवजीवनाची ही आरंभ हर्षाचा सोनेरी बिलोरी स्वप्नांचा वर्षावर स्वप्नांचा वर्षाव होवो तुमच्या या रंभास आमच्या गोड गोड शुभेच्छा लग्न म्हणजे काय असतं आनंदाचं उदाहरणासह जबाबदारी चव्हाण असतं लग्न म्हणजे काय असतं पापण्यातून लपलेल्या नजरेत तिच्या बघून लागलं असतं लग्न म्हणजे काय असतं कपाळावरून कुंकवाला सौभाग्याचा मानतो लग्न म्हणजे काय असतं सनईच्या सुरात याचा वेगळा असतो
लग्न म्हणजे काय असतं पती मागे पाऊल टाकणाऱ्या मनात सहकार्याचं सुंदर जीवन असतं लग्न म्हणजे काय असतं तिच्या केसात गजरा म्हणणारा त्याचा प्रेमळ हात असतो लग्न म्हणजे काय असतं रात्र आणि सहा दरवळणारा सुगंध आत आलेला शृंगार असतो लग्न म्हणजे काय असतं भरजरी शालू ना मेंदीचा गंध व त्याच्या प्रेमाचा छंद असतो लग्न म्हणजे काय असतं घराला घरपण आणि हवहवसं वाटणारं बंधन असतं भटकणाऱ्या मनाला सावरणारा हात असतो देवघरातील स्तब्ध तिचा साथ असतो
लग्न म्हणजे काय असतं आई वडील भाऊ बहीण यांना त्यांचा पर्याय असतो जीवनाचा रंगलेला सुंदर डाव असतो लग्न म्हणजे काय असतं त्याच्या निष्काळजी स्वभावातला जबाबदारीचा कोण नसतं आणि तिच्या खर्चाला त्याच्या खिशाचं आंदण असतं लग्न म्हणजे काय असतं त्याच्या चुका ना तिचा पदर आणि तिच्या दुःखाला त्याचा खांदा असतो लग्न म्हणजे काय असतं तो चिडला तरी तिनं शांत राहायचं असतं कपातल्या वादळाला चहाबरोबर संपवायचं असतं लग्न म्हणजे काय असतं आनंदाचं उधाण असतं आणि जबाबदारीचं भान असतं
No comments:
Post a Comment